डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे आपणांस लग्नवाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! ह्या निमित्ताने आढावा गोतावळ्याचा ..!
डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे आपणांस लग्नवाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!
ह्या निमित्ताने आढावा गोतावळ्याचा ..!
लहानपणापासून ज्यांना बघत आपण मोठे होतो. त्यांचा काहीना काही प्रभाव आपल्यावर असतोच.
माझ्या मामाच्या गावी म्हणजेच सावखेड तेजन येथे मी लहानाचा मोठा झालो. तेथे खेळत बागडत असतांना माय सोबत, द्रोपदाबाईला भेटण्यासाठी चेपटे कुटुंबियांच्या वाड्यातही जायचो. त्यातील प्रमुख व्यक्ती म्हणजे द्रोपदाबाईंचे पती व माझ्या वडिलांचे मित्र म्हणजेच आमच्या मुक्ताबाईचे बंधू तुकाराम चेपटे हे होते. वाड्यात गेलो की, द्रोपदा मावशी सोबतच ज्यांचा लळा लागला व सणासुदीला ज्या माहेरी यायच्या त्या आमच्या मुक्ताबाई.
मला जसे आठवते त्यानुसार त्याकाळी सावखेड तेजन येथील राजकीय वर्तुळात आमची मामा मंडळी स्व. बाजीराव जायभाये, स्व. विश्वनाथ जायभाये दुकानदार, स्व. कारभारी जायभाये, विघ्ने, मांटे, बुधवत यांच्यासह डोईफोडे, सोनुने आदि अनेक व्यक्ती कार्यरत होत्या.
त्यांना मार्गदर्शन देण्यात तढेगाव येथील स्व. बाबुराव कुटे, सिनगांव जहाँगीर येथील सौंदाजी पाटील डोईफोडे यांच्यासह हिंमतराव पाटील बंगाळे, पांग्री येथील वाघ, पिंपरखेड येथील चव्हाण यांच्यासह अनेक मंडळी कार्यरत होती. त्यांची अनुयायी मंडळी म्हणजे दुसऱ्या क्रमांकवरील सावखेड तेजन येथील मामा स्व. बाजीराव जायभाये, स्व. तुकाराम चेपटे, सिनगाव जहाँगीर येथील आश्रुजी डोईफोडे, रुम्हणा येथील त्र्यंबकदादा कायंदे, तढेगाव येथील स्व. शिवानंद कुटे, सोबतच माझे वडील स्व. सत्यभान नागरे, हिवरखेड, अर्जुनराव गीते, सिनगाव, स्व. शिवाजी जायभाये, हनवतखेड आदि अनेक व्यक्ती कार्यरत होत्या.
लहान असतांना या मंडळींच्या बैठकीत चहापाणी देण्याचे काम माझ्यासारख्या बाळगोपाळ मंडळींकडे असायचे.
दरम्यानच्या काळात तोतारामजी कायंदे हे आमदार झाले होते.
तेंव्हा ते आमच्या मुक्ताबाईंचे पती असल्याचे मायने सांगितले होते.
बालपणी माझ्या वडिलांनी संस्कार करतांना सामाजिक, राजकीय परिवेश सोडत, जातीपातीच्या भिंती तोडत, शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, भगवानबाबा, सेवालाल महाराज, वसंतराव नाईक आदि महापुरुषांचा फक्त वैचारिक वारसा जपण्याचा, जोपासण्याचा, संवर्धित करण्याचा मोलाचा परिपाठ आमच्या बाल मनावर रुजविला. तो अजूनही कायम आहे, नव्हेतर मरेपर्यंत कायम राहील.
त्यानंतर युवावस्थेपर्यंत स्व. भास्कररावजी शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन कार्य केले. त्याशिवाय कॉलेजच्या निवडणुकी सोडून सार्वत्रिक राजकीय क्षेत्रांतील घडामोडीत एवढे कार्यरत राहिलो नाही.
ह्या सगळ्या बाबीत मात्र नातेवाईकांपेक्षा मित्र गणगोत झाले व तेच प्राधान्य क्रमावर राहिले.
सोशल मीडियावर संपर्कात आलेल्या डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे यांच्या वैवाहिक जीवनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळच्या पोस्टमुळे हा सर्व चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये तरळला.
डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे आपणांस वैवाहिक वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!
🌹🙏

Ok
उत्तर द्याहटवासुंदर दादा
उत्तर द्याहटवालग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
उत्तर द्याहटवा🎋💐🎂🎉🎈🎁🎊👑
👌
उत्तर द्याहटवाHappy Marriage Anniversary
उत्तर द्याहटवामला आठवते लहानपणी त्याकाळी आमदार साहेबांच्या म्हणजेच मुक्ता मावशी यांच्या कमांडर जीप मध्ये सावखेड ते दे. राजा गेलो होतो.
उत्तर द्याहटवा