गॅस सिलेंडरच्या आगीत घर भस्मसात, ९ लाखांचे नुकसान; कुटुंब बेघर

 गॅस सिलेंडरच्या आगीत घर भस्मसात, 

 लाखांचे नुकसान; कुटुंब बेघर




सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथे काल सकाळी स्वयंपाक सुरु असतांना एकाएकी गॅस सिलेंडरने पेट घेतला व आग लागली. त्यामुळे माळवदाचे असलेले संपूर्ण घर आगीत भस्मसात झाले आहे. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन, ९ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
साखरखेर्डा येथे नंदकुमार लक्ष्मणराव देव यांच्या घरात काल दि. २२ एप्रिल, सोमवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास स्वयंपाक सुरु होता. त्यावेळी गॅस सिलेंडरने एकाएकी पेट घेतला. काही कळण्याच्या आतच घरालाही आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी विशेषतः युवकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र काही मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले. या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. आगीच्या या घटनेत ४ खोल्यांचे माळवदाचे घर व ४५ टिनपत्रे  किंमत ५ लाख रुपये, फर्निचर २ लाख ३५ हजार रुपये, घरगुती व कौटुंबिक सामान ७५ हजार रुपये, पुजेचे व चांदीची पारंपरिक भांडी ४० हजार रुपये, मंगळसूत्र व सोन्याचे दागिने ४५ हजार रुपये व इतरही सामान व वस्तू सगळे मिळून ९ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सरपंच पती सुनील जगताप, गॅस एजन्सीचे उल्हास देशपांडे, अमित रामभाऊ जाधव, सीताराम श्रीकृष्ण काळे, जालमसिंग तुळशीरामसिंग पंढेरे, शैलेश शरदचंद्र शुक्ल यांच्या उपस्थितीत मंडळाधिकारी रघुनाथ सोळंके, पटवारी संजय शिंगणे, प्रशांत पोंधे यांच्यासह बीट जमादार बाजीराव खंडुजी खरात यांनी घटनेचा पंचनामा केला.

गॅस एजन्सीचे संचालक उल्हास देशपांडे यांनी देव कुटुंबियांना तात्काळ गॅसचे कनेक्शन देऊन २० हजार रुप

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा