खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

 


खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या,

परिसरात हळहळ ..


सिंदखेडराजा:- तालुक्यातील खैरव येथील दिनकर बाळाजी भुसारी वय ७२ वर्षे यांनी विषारी औषधी प्राशन करीत आत्महत्या केली आहे.

कर्करोगाने ग्रस्त असलेल्या दिनकर भुसारी यांच्याकडे अंदाजे अडीच एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी व नातू पणतू आदि सदस्य आहेत. पिढ्यानपिढ्याची गरीबी, त्यात कर्करोगाचे आजारपण, पेरणी व पिकांची मशागत आदि बाबींवर झालेला खर्च, त्यामुळे औषधी घेण्यासाठीही रक्कम नव्हती. त्यातच पीक परिस्थिती बरी असतांनाच पावसाने दिलेली उघडीप त्यातून येत्या काळातील संभाव्य नापिकी आदि अनेक चिंतांमधून त्यांनी काल दि. २५ ऑगस्ट, शुक्रवारी विषारी औषधी प्राशन केली. उपचारासाठी देऊळगाव मही येथे नेल्यावर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील इस्पितळात हलविले असता, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे. 

यासंदर्भात माजी सरपंच संजय तळेकर, पोलीस पाटील बबन घुगे आदिंनी संबंधित गावपातळीवरील कर्मचारी यांना माहिती दिली आहे.

जालना येथे शवविच्छेदन झाल्यावर आज दुपारी बारा वा. सुमारास खैरव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अत्यंत गरिबी परिस्थिती असलेल्या दिनकर भुसारी यांच्या आत्महत्येमुळे हळहळ तसेच कुटुंबियांबद्दल पंचक्रोशीतील नागरिकांमधून सहानुभूती व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा