आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..! मनात काहूर अन हुरहूर ...!!

 


आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..!

मनात काहूर अन हुरहूर ...!!

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे दि. १९ जुलै २०२१ रोजी मला कॉल करुन एका व्यक्तीने व्हीटी सरांच्या निधनाची बातमी कळवली.

विश्वास बसतच नव्हता, कारण रोज किंवा तिसऱ्या दिवशी भेट होत होती. मात्र त्यांना हृदयविकार असल्याचे माहीत होते. त्यामुळे जागदरी, ता. सिंदखेडराजा येथे संपर्क साधून विचारले असता, ती माहिती खरी असल्याचे सांगण्यात आले. प्रचंड हादरलो. 

आठवणींनी मनात काहूर उठले. जागदरी ह्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक एक बाब समोर ठेऊन, काय काय अन कसे कसे नियोजन करायचे? चर्चेतून ठरत होते. त्याचवेळी त्यात खिळ घालणाऱ्या घटकांचा कसा बंदोबस्त करायचा हेही नजरेसमोर होते.

त्याच दृष्टिकोनातून व्हीटी सरांच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वीच राजकीय, सामाजिक आदि विविध प्रकारची  उपाययोजना करण्यासाठी बुलढाणा येथे जाऊन आलो होतो. दिवसभर सोबत होतो. त्यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवदास रिंढे सोबत होते. गावाच्या विकासासाठी राजकारण विरहित फक्त मैत्री जपणारा शिवदास आमच्या सोबत दिवसभर होता. 

जागदरी गावाच्या विकासासाठी व्हीटी सरांची मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे कसे इच्छित दिशेने चालले होते.

मात्र अचानक काळाने घाला घातला.

जनसेवेची इच्छा अन त्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा असणाऱ्या व्हीटी सरांना आपल्यातून हिरावून नेले.

अजूनही सातत्याने आठवण येत असते. आठवण आली की मन खिन्न होते. मनात प्रचंड काहूर माजते, हुरहूर वाटते.

व्हीटी सरांच्या प्रेरणादायी शिकवणींच्या स्मृतींना ..

जड अंतःकरणाने विनम्र अभिवादन ..!🌷🙏


टिप्पण्या

निनावी म्हणाले…
भावपूर्ण श्रद्धांजली

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!