लोकसभा निकालापूर्वी नागरिकांना कायदेशीर इशारा
लोकसभा निकालापूर्वी नागरिकांना कायदेशीर इशारा
विनोद नरवाडे, ठाणेदार, किनगावराजा
सिंदखेडराजा:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल उद्या दि. ४ जून, मंगळवारी असून, आचारसंहिता दि. ६ जून गुरुवार पर्यंत लागू आहे. या दरम्यान अशांतता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही कार्य करण्यात येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
यासंदर्भात किनगावराजा ठाणेदार विनोद नरवाडे यांनी पत्र जारी केले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, निकाल घोषित झाल्यावर कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कॉमेंट, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर अशी कुठलीही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही ॲप्लिकेशन द्वारे कुणीही प्रसारित करु नये. कुणाच्याही विरोधात घोषणाबाजी करु नयेत. डीजे वाजवू नये, विनापरवाना मिरवणूक काढू नये. व्हॉट्सॲपच्या गृप ऍडमिन यांनी ओन्ली ऍडमिन असे सेटिंग करावे. अन्यथा एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर कायदा व सु्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या सदस्यासह गृप अडमिनला सुद्धा जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, असे निक्षून सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏