वास्तविक पत्रकारिता करावी का ..?
खऱ्याचं खरं ..
खोट्याचं खोटं ..
वास्तविक पत्रकारिता
करावी का ..?
नुकतीच एक बातमी निदर्शनास आली
जिल्ह्यातील एका तथाकथित
नामांकित पत्रकाराने
ती टाकली होती.
जी बाब कुठेही घडू शकत नाही,
असा राजकीय अंदाज
जिल्ह्यातील त्या मतलबी
पत्रकाराने घेतल्याचे दिसून आले.
पण
अंदाज राजकीय होता.
मात्र त्यात नवल असे की,
वृत्ताची सत्यता पडताळून पाहणे
गरजेचे असतांना ..
व्यावसायिक दृष्टिकोनातून
जाहिरातीची बरसात होईल,
या हिशोबातून
संपादकानेही ते वृत्त प्रकाशित केले.
ते वृत्त वाचतांना
लोण्याचा भाव मात्र
आवर्जून आठवला.
त्या पत्रकाराने
किती आणि काय लिहावं?
दरम्यान
नुकताच पार पडलेला
एक प्रसंग समोर आला.
सोहळाच असावा
असा एक कार्यक्रम होता.
त्या कार्यक्रमासाठी सामाजिक क्षेत्रातील
एक प्रभावी व्यक्तिमत्त्व
ज्याने मला निमंत्रित केले,
ती सोबत होती.
सोहळा पार पडला.
माझ्या सारख्याने
जाणीवा व नेणीवा ठेवत
जे जसे घडले त्यानुसार
वृत्तांकन केले.
त्यात तो राजकीय जे काही बोलला
ते जसेच्या तसे लिहिले होते.
वृत्त लिहिल्यावर
सहजच त्या सामाजिक
व्यक्तीला वाचायला दिले.
वाचल्यावर तो म्हणे
यातील एवढा एक भाग
टाळावा लागतो.
आपला माणूस सांगतो,
मग तो भाग वगळला.
त्यावेळी त्याच सामाजिक व्यक्तीला
सांगितले की,
त्या राजकीय माणसाच्या
बोलण्याची फिनिशिंग कर ..
तर तो म्हणाला की,
ऐ .. दा ..
मी तुलं फक्त
काही भाग वगळायचा
एवढं सांगितलं ..
पण
त्यो आपलाच हे
तरीही,
त्या राजकीय व्यक्तीच्या
बोलण्याची फिनिशिंग करायचा
भाग मह्याकडं नहीं बरं का ..!
मी म्हणालो की,
त्या तथाकथितांच्या सिस्टीमलं
याबाबत सुधारणा करायचं सांग ..
तर
तो सामाजिक धुरंधर म्हणे की,
सिस्टीम मधला माणूस आपला असूनबी
त्यो मोठेपणाचा शिकार ठरतो की काय? याबाबत काय सांगावं ब्वाॅ ..?
इथंच झाली सगळ्या बातमीची समाप्ती ..
पण
तिथंच त्यालं सांगितलं की,
यापुढं
त्या व्यक्तीने जर बोलतांना ट्रॅक सोडला तर
मी तुपलं एकही ऐकणार नाही.
आता तुम्हीच सांगा काय करावं? ब्वाॅ ..??🙏

बिलकुल बरोबर.... विरोध हा विचाराचाच असला पाहिजे व्यक्तीचा नाही....
उत्तर द्याहटवा