मोबाईल टॉवरवर चढून, दोरीने गळफास घेत उडी मारत, वयस्कर इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न


 मोबाईल टॉवरवर चढून, दोरीने गळफास घेत उडी मारत, 

प्रौढ इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न



सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिवरा आश्रम येथे एका प्रौढ व्यक्तीने मोबाईल टॉवरवर चढून तेथे दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना आज सकाळी ११.०० वा. सुमारास घडली आहे.
हिवरा आश्रम येथील रमेश रामभाऊ सरकटे हा अंदाजे ५५ वर्षांचा प्रौढ इसम सकाळी ११.०० वा. च्या सुमारास मोबाईल टॉवरवर चढला, तेथे जाऊन त्याने पोलिसांना पुकारले. कर्तव्यावर हजर असलेल्या बीट जमादार प्रवीण गवई, नितीन राजे जाधव, तुका लक्ष्मण इनामे, निवृत्ती पोकळे आदिंनी घटनास्थळ गाठले. त्याचवेळी ठाणेदार स्वप्नील नाईक यांनीही लगोलग कळविले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यावर रमेश सरकटे याने एक चिठ्ठी खाली फेकत, पोलिसांना त्यावर कारवाई करण्याचे म्हटले. दरम्यान ठाणेदार स्वप्नील नाईक हे आपल्या आणखी काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
सरकटे याने फेकलेली ती चिठ्ठी खाली येताच पोलिसांनी कारवाई करण्याची हमी दिली. मात्र आता आपले काम झाले म्हणत, रमेश सरकटे याने सोबत असलेली दोरी टॉवरच्या पाईपला बांधून फास तयार केला. हे होत असतांनाच पोलिस व काही युवक टॉवरवर चढले. मात्र सरकटे जवळ पोहचण्याआधीच त्याने फासात मान गुंतवून खाली उडी घेतली. मात्र पोलिस व युवकांनी ताबडतोब त्याची सुटका करीत खाली घेतले. ताबडतोब त्याला मेहकर येथील खाजगी दवाखान्यात भरती केले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
ह्या घटनेचे चित्रण समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे.
तर चिठ्ठीत गल्लीतील सातआठ लोकांची नावे असल्याचे व त्यांच्यावर सरकटे याने कुठल्यातरी घरगुती, कौटुंबिक बाबीच्या कारणावरुन संशय घेतल्याचे व त्याबाबतीत अगोदर बैठकही झाली होती. मात्र त्यात ठरलेले रमेश सरकटे यास मान्य नव्हते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
वृत्त लिहीपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.



फोटो:- टॉवरवर चढलेला वयस्कर इसम वर्तुळात दिसत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा