साखरखेर्डा परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडितच अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत ..

 साखरखेर्डा परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडितच

अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत ..




साखरखेर्डा:- येथील व परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन तब्बल २४ तास उलटून गेलेला आहे. यासंबंधीची माहिती जाणकार सूत्रांकडून घेतली असता मेहकर वरुन पुरवठा जाणूनबुजून खंडित केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

साखरखेर्डा व परिसरातील वीजपुरवठा काल दि. ११ जुलै, गुरुवारी दुपारी चार वाजेपासून खंडित झालेला आहे. ह्या पुरवठ्या दरम्यान मध्यठिकाणी असलेल्या देऊळगाव माळी येथील वीजपुरवठा मात्र चालू होता. 

साखरखेर्डा वासीयांनी काल दि. ११ जुलै, दुपारी अंदाजे ४.०० वाजेपासून पासून तर आज सायंकाळी वृत्त लिहिपर्यंत मधला एक तासाचा कालावधी वगळता खंडित वीजपुरवठ्याचा सामना केला. दर शुक्रवारी येथे आठवडी बाजार भरत असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत चालू होईल अशी अपेक्षा भंग पावली आहे.

तर कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. येथील कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कॉल उचलला जात नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.

एकंदरीत स्थानिक तसेच राज्य व राष्ट्रीय नव्हेतर पक्षीय पातळीवरील स्वतःला मोठे म्हणणारे नेते नेमके काय करीत आहेत?

या बाबतीत साशंकतापूर्वक चर्चांनी परिसरात वेग घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वीजपुरवठा खंडित होण्याचा हा प्रकार अनुभवावा लागत असल्याने परिसरातील जनता पुन्हा एकदा सर्वच नियंत्रण स्वतःच्या हाती घेणार असल्याची परिस्थिती निर्माण होते आहे.

यामागे नेमके कोणते षडयंत्र आहे? व ते कुणी रचले आहे? याबाबतही संभाव्यता बोलल्या जात आहे, एवढे मात्र निश्चित.

वृत्त लिहिपर्यंत वीजपुरवठा मात्र खंडितच होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा