कोविड १९ च्या आपत्ती काळात अन्न - धान्य पुरवठ्यात गडबडस्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल दुकानाचा परवाना रद्द
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोविड १९ च्या आपत्ती काळात अन्न - धान्य पुरवठ्यात गडबड
स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल
दुकानाचा परवाना रद्द
सिंदखेडराजा:- सध्या कोविड १९ या साथीच्या रोग प्रसारामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांनाही तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानदाराने जादा दराने तसेच प्रमाणापेक्षा कमी अन्न धान्य वितरण केल्याचा प्रकार काल दि. ८ एप्रिल रोजी उघड झाला होता. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यातून यंत्रणेमार्फत दुकानदाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.
तालुक्यातील सोनोशी येथील शिवानंद गजानन आघाव ह्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याने स्वस्त धान्य दुकानदार भास्कर वामन साळवे यांचेकडून गहू व तांदूळ घेतले. त्यावेळी साळवे यांनी धान्य कमी दिल्याचे तसेच रक्कमही जादा घेतल्याचा प्रकार घडला. ह्या प्रकरणाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला. त्याची तक्रार पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावरुन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी घेत प्रकरणाची चौकशी व कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी पुरवठा विभागाचे संदीप दिनकर बंगाळे, मंडळ अधिकारी केवट व तलाठी कटरे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यात सोनोशी येथील स्वस्त धान्य दुकानदार भास्कर वामन साळवे हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले.
तेंव्हा त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करीत, गावातीलच अन्य दुकानदाराकडे शिधापत्रिका धारकांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
तसेच संदीप बंगाळे यांनी किनगावराजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन दुकानदार भास्कर वामन साळवे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७, साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५६ व भादंवि १८६० च कलम १८८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिसना निर्भय, निर्भिड ब्लॉग आम्हाला अजुन राज्यस्तरीय व देशपातळीवरील मुद्यांवर आपले मत वाचण्यास मिळावे एवढी अपेक्षा
उत्तर द्याहटवाजसजसे प्रसंग येतील,
उत्तर द्याहटवातसतसे लिखाण करायचा प्रयत्न राहील.��