कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शेतकऱ्याच्या फुलशेती नुकसानीची कृषी विभागाने घेतली दखल

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या
शेतकऱ्याच्या फुलशेती नुकसानीची कृषी विभागाने घेतली दखल
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला पंचनामा





सिंदखेडराजा:- कोविड महामारीमुळे कोंडी झाल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीचे चित्र करीत समोर आहेत. सावखेड तेजन येथील एका नुकसानीचा संबंधित तलाठ्याने पंचनामा करण्यास नकार दिल्याचे प्रकरण "दीसना" ने प्रकाशात आणले होते. तालुका कृषी अधिकारी यांनी याची दखल घेत काल दि. २४ एप्रिल, शुक्रवारी स्वतः पंचनामा केला आहे.
सावखेड तेजन येथील विजय विघ्ने ह्या शेतकऱ्याने यावर्षी सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने, नगदी पिकातील नवीन प्रयोग म्हणून फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या सर्व्हे क्र. ४२ मधील दीड एकर शेती क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर चांगला भाव मिळेल. तसेच उन्हाळ्यात औरंगाबाद, पुणे अगदी मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत फुलांची विक्री करण्याची विजय विघ्ने यांची उमेद होती. मात्र ऐनवेळी कोविड महामारीचे संकट उभे टाकल्याने संचारबंदी झाली. त्यामुळे यावर्षी थोडी अधिक कमाई करण्याची शेतकऱ्याची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली. या नुकसानीचा पंचनामा व्हावा म्हणून त्यांनी स्थानिक तलाठी यांना विनंती केली असता, आपल्यास वरुन आदेश नसल्याचे उत्तर मिळाले होते. ह्याबाबत "दीसना" ने वृत्तांत प्रकाशित करताच तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी दखल घेत, काल दि. २४ एप्रिल, शुक्रवारी दुपारी सावखेड तेजन येथील विजय विघ्ने यांचे शेत गाठले व सुमारे एक लाख पंचवीस हजारापर्यंत नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
सावखेड तेजन येथील भाजीपाला तसेच फुलशेती करणाऱ्या दोन शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.


कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदिंच्या नेतृत्वात गावागावात समित्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र यातील काही मंडळी नेमणुकीच्या गावाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे ग्रामस्थ किंतुपरंतु करत सांगत असतात.
यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या गावात पिकांचे नुकसान झाले आहे, ह्याचा सर्व्हे तसेच पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा