अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले;
रेतीसह टिप्पर पोलीस ठाण्यात जमा 


सिंदखेडराजा:- कोविड महामारीचे भयावह संकट उभे ठाकले असतांनाही खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक करण्याचा माफियांचा उद्योग सुरुच असल्याचा प्रकार पुन्हा  एकदा समोर आला आहे. त्यामुळे महसूल चोरी करणाऱ्या या माफियांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना देऊळगावराजा तालुक्यातील रेतीमाफिया हे देऊळगावराजा व चिखली तालुक्यातील मार्गांचा वापर करीत सिंदखेडराजा तालुक्यात शिरकाव करुन रेती तस्करी करीत असल्याचे गुप्त सूत्रांकडून कळले. या रेती तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी तलाठी आनंद राजपूत, देविदास गरिबे व नितीन जुमडे यांचे पथक निर्माण करीत संपर्कात राहून मार्गदर्शन केले. त्यानुसार काल दि. २४ एप्रिल, शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दरेगाव गावात शिरणाऱ्या नंबर नसलेल्या एका टिप्परला अडविण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नव्हती. हे टिप्पर रवी भास्कर लाड, रा. डिग्रस, ता. देऊळगावराजा याच्या मालकीचे असून शंकर महादेव मांटे हा चालक असल्याचे आढळून आले. ह्या पथकाने साखरखेर्डा ठाणेदार संग्राम पाटील यांच्याशी संपर्क करीत रात्री १०.३० वा. रेतीसह हे टिप्पर पोलिसांच्या सुपूर्द केले आहे.
यामुळे रेतीमाफिया हे कोणत्याही परिस्थितीत चोरुन तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरी करीत शासनाचा महसूल बुडविणाऱ्या रेतीमाफियांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याची अपेक्षा सुज्ञ जणांकडून दबक्या स्वरात व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!