लॉकडाऊन दरम्यान पायदळी घरी परतणाऱ्या सहा परप्रांतीय युवकांना मारहाण

लॉकडाऊन दरम्यान पायदळी घरी परतणाऱ्या सहा परप्रांतीय युवकांना मारहाण




सिंदखेडराजा:- एकीकडे कोरोना लॉकडाऊन दरम्यान पायदळी चालत स्वगृही परतणाऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी अनेक जण पुढे येत असतांनाच या प्रवाशांची लूटमार करण्याच्या हेतूने मारहाण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना आज दुपारी समोर आली आहे.
सत्यकुमार, वय ४८ वर्षे, संजयकुमार, ३१ वर्षे, जितेंद्रकुमार, २३ वर्षे, राजेशकुमार, २८ वर्षे, संदीपकुमार, ३० वर्षे व त्रिलोककुमार, ३४ वर्षे हे मूळचे पहाडपुर चंदौली, उत्तरप्रदेश मधील सहा कामगार जालना एमआयडीसी मध्ये एका कंपनीत कामाला होते. लॉकडाऊनमध्ये वाढ होत गेल्यामुळे, तसेच इतर कुठलेही काम मिळत नसल्याने उपासमार होण्याच्या भीतीने हे सहाही जण उत्तरप्रदेशात गावी परतण्यासाठी जालना येथून पायदळी निघाले होते. वाटेने मार्गक्रमण करीत असतांना आज दि. २४ एप्रिल, शुक्रवारी दुपारी ते सिंदखेडराजा ते सावखेड तेजन दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला काळेपाणी भागातील एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. त्यावेळी पल्सर दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण त्या ठिकाणी आले. त्यांनी या सहाही जणांना चाकूचा धाक दाखवित मोबाईल व जवळ असलेली रक्कम देण्यासाठी दरडावले. मात्र सहाही युवक प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्यावर चाकू व दगडांनी हल्ला केला. यामध्ये सत्यकुमार व जितेंद्रकुमार हे जखमी झाले. मात्र त्यानंतर या सहाही जणांनी प्रतिकार करण्यास सुरुवात केल्यावर तिघेही भामटे तेथून पल्सरवरुन फरार झाले.
किनगावराजा येथील गजानन काळूसे, विलास झोरे व त्यांच्या मित्रांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली रस्त्यानेच त्यांची गाठ पडली. त्यावेळी आपण प्रथमोपचार केले असून आपल्याला गावी जाणे महत्वाचे असल्याने तक्रार करणार नसल्याचे या युवकांनी सांगितले.
ह्या घटनेमुळे तालुकाभरात चर्चेला उधाण आले असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या त्या भामट्यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अद्दल घडविण्याची मागणी होत आहे.
x

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा