खात्यातील रकमा काढण्यासाठी बँकांमध्ये उसळतेय गर्दी ; सोशल डिस्टनसिंगचा उडतोय फज्जा

खात्यातील रकमा काढण्यासाठी बँकांमध्ये उसळतेय गर्दी
सोशल डिस्टनसिंगचा उडतोय फज्जा 

सिंदखेडराजा:- कोरोनाचे सावट घोंगावत असतांना काम असलेच तर सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे निर्देश आहेत. असे असतांनाच विविध योजनांच्या रकमा बँकेत आल्याने बँक परिसरात एकच गर्दी उसळून सोशल डिस्टनसिंगची ऐसीतैसी होत असल्याचे चित्र तालुकाभरात दिसून येत आहे.
कोरोना संसर्गाच्या संभाव्य  धोक्यामुळे स्टे होम, स्टे सेफ, कीप सोशल डिस्टनसिंग अशा अनेकविध आवाहनाला तसेच यावर जालीम इलाज असलेल्या संचारबंदीला  मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद वाढतो आहे. जवळपास सर्वच माध्यमातून राज्य, देश व विदेशातील परिस्थिती जनतेपर्यंत पोहचत असल्याने जागृतीही येत आहे.
संचारबंदी दरम्यान विविध घटकातील कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडू नये, म्हणून शासनाकडून ऐनवेळी विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात रकमा जमा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवांसाठीची योजना, जनधन खाते, गॅसची जमा होणारी सबसिडी आदि स्वरुपात रकमा बँकेत जमा झालेल्या असल्याचे विविध सूत्रांकडून जनतेला माहीत झाले आहे. त्यामुळे आपापल्या खात्यातील रकमा काढण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. त्यामुळे यावर आवर घालण्यासाठी पोलिसांचे दंडुकेही कामी येत नसल्याची बिकट परिस्थिती आहे. 
यावर उपाय म्हणून सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या गावांची यादी तयार करीत, त्यांच्या रकमेच्या वाटपासाठी विशिष्ट दिवस ठरवून देणे क्रमप्राप्त असतांनाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.


दुसरबीड येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत उसळणाऱ्या गर्दीला बसण्यासाठी व त्याद्वारे सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी शाखाधिकारी मनीष कुमार यांनी मंडप टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तरीही ग्राहक त्यात बसत नसल्याचेही चित्र आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा