साखरखेर्डा उपसरपंचपदी दर्शन गवई यांची अविरोध निवड

साखरखेर्डा उपसरपंचपदी दर्शन गवई यांची अविरोध निवड 



सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दर्शन गवई यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

सरपंच सौ. पुनमताई महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४ एप्रिल, शुक्रवारी साखरखेर्डा ग्रामपंचायतीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत सौ. छाया सुनिल गवई यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सादर केला. यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सदस्यांच्या आपसात झालेल्या चर्चेत दर्शन गवई यांनी अर्ज दाखल करावा असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार दर्शन गवई यांचा एकमेव अर्ज सादर करण्यात आला. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेनंतर सरपंच सौ. पुनम महेंद्र पाटील यांनी दर्शन गवई यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्राम विकास अधिकारी मनोज मोरे, मावळत्या उपसरपंच छाया सुनिल गवई, महेंद्र पाटील, माजी उपसरपंच शेख रफीक तांबोळी, भागवत मंडळकर, संदिप खिल्लारे, राजू डुकरे, दिलीप बेंडमाळी आदि उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने सर्व प्रक्रियेदरम्यान सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सरपंच सौ. पुनमताई महेंद्र पाटील यांनी कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढू नये यासाठी शासकीय नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे व गावातील नागरिकांनी स्वतःहून संचारबंदीतील नियम पाळण्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तर बाजार गल्लीतील ग्राहकांच्या गर्दीवर  नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे  निर्देश दिले.


दर्शन गवई हे शिक्षक तथा पत्रकार आहेत. तसेच एकेकाळी साखरखेर्डासह सिंदखेडराजा तालुक्यातील राजकारणावर स्वतःचा वेगळा ठसा व प्रभाव असलेल्या बुद्धीवासी प्रा. ज्ञानेश्वर गवई यांचे चिरंजीव आहेत. बु. प्रा. ज्ञानेश्वर गवई हे आपल्या संपूर्ण हयातीत जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांचे तसेच सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे उपाख्य मोठे साहेब यांचे कट्टर समर्थक व निष्ठावान सहकारी होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा