सोशल मीडियावर राहणाऱ्या आपण सर्वांनी व्हायरल पासून थोडं सावध राहण्याची गरज
सोशल मीडियावर राहणाऱ्या आपण सर्वांनी व्हायरल पासून थोडं सावध राहण्याची गरज ..🙏
मित्रांनो,
जेंव्हा पासून लॉकडाऊन म्हणजे संचारबंदी जरि झाली, तेंव्हापासून जवळपास सर्वच जण सोशल मीडियावर राहू लागलो आहोत. त्याचे महत्वाचे कारण हे वेळ घालविणे जरी असले तरी त्यातून मिळणारी महत्वाची माहिती व विविध प्रकारे होणारे मनोरंजन आदि बाबीही महत्वाच्या आहेत.
परंतु आपल्यापैकी अनेक जणांना हे माहीत नाही, की जेव्हापासून सोशल मीडिया तयार झाला आणि सर्वसामान्य व्यक्तिसुद्धा त्याला वापरायला लागला, तेंव्हापासूनच या सगळ्यांना टारगेट करीत काही माथी कामाला लागली. तुम्ही आम्ही नव्हेतर आपण सर्वजण नवीन काही पोस्ट ज्या लिखित, दृश्य फोटो अथवा व्हिडिओ स्वरूपात आल्या की वाचण्याचा, पाहण्याचा किंवा ऐकण्यासाठी आसुसलेले असतो. त्याचा एकदा फडशा पाडला की मग त्या संदर्भातील चर्चा, प्रतिक्रिया, दावे, प्रतिदावे यातून ते मुद्दे सर्वत्र पसरतात. त्यातून समाजमनात घर करतात. आणि त्यातून समाजाची मानसिकता कशा प्रकारचे बनते, याचे प्रात्यक्षिकही सुरुवातीच्या काळात ह्या टारगेट करणाऱ्या लोकांनी केले. त्याचा परिणाम साधकबाधक कसा होतो? याचेही आलेख, सांख्यिकी माहितीतून अवलोकन करण्यात आले. ह्या गोष्टीचा फायदा विविध स्तरावर घेतल्या गेला असला तरीही राजकारणात मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला.
सध्या भारताची लढाई कोरोना विषाणू विरुद्ध असली तरीही याला वेगळ्या पद्धतीने हाताळणी करीत दुय्यम ठेवत संभ्रम निर्माण करणारे अनेकजण कार्यरत आहेत. त्यांची विशिष्ट विचारशैली आहे. यामध्ये वेगवेगळ्या कल्पना वापरुन समाजाच्या विविध स्तरावर दुही पसरवायची. त्यासाठी प्रसंगी खोट्या बातम्यांचा वापर करायचा. यातून मानसिक गुलाम असलेले भक्त निर्माण करायचे. त्याद्वारे इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा ही विचारशैली त्या गुलामांमध्ये पक्की रुजवायची. आणि हे गुलाम मग कट्टरपंथी करीत त्यांच्याद्वारे उद्देश साध्य करण्यासाठी एकाचवेळी तुटून पडायचे. हे सर्व करीत असताना स्वतःचा मेंदू व मन वापरत एकतेचा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन यांच्या विरोधात उभे राहणाऱ्यांना प्रथम टारगेट करायचे आणि संभ्रमित वातावरणातून सर्वसामान्य जनतेच्या अगतिकतेचा गैरफायदा घ्यायचा.
सोशल मीडियावर असे लोक ठळकपणे वेळोवेळी आपल्याला आढळून येत असतात.
सध्या धार्मिक भेदभाव निर्माण करण्यासाठी हे लोक बेभान होऊन कामाला लागलेले आहेत.
यातूनच राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व त्यांची सर्व टीम यांनाही टारगेट करण्यासाठी हे मानसिक गुलाम जंग जंग पछाडत आहेत.
त्यातून संचारबंदी संदर्भात आताच्या महत्वाच्या वळणावर संभ्रमित करणाऱ्या अनेक पोस्ट येऊ शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे. मला काय त्याचे? ही वृत्ती कृपया त्यागा
आणि डोळ्यात तेल घालून सावध राहा, सजग राहा, सामाजिक एकता जोपासण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करा.
🇮🇳 जयहिंद ...!🇮🇳

खरं आहे सर
उत्तर द्याहटवा100/_खरी पोस्ट आहे. हा गुलाम मेडीया कोणत्याही प्रसंगी इंग्रजा सारखी निती वापरून समाजामध्ये कोणत्याहीगोष्टीला संप्रदाय वळण देऊन समाजात फुट टाकण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव जी ठाकरे यांची धर्मनिरपेक्ष भुमिका असल्याने आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाबरोबर सर,
उत्तर द्याहटवाSocial media चे trend नुसार मत व्यक्त केली जात आहे व तसा mind set बनताे
बरोबर आहे सर.पण आपण सर्वांनी संदेशाची शहानिशा केली पाहिजे.आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर चिकित्सा केली पाहिजे.धार्मिक भावना भडकविणारे,जातीय तेढ निर्माण करणारे संदेश कुणीही प्रसारित करू नये.अशा जागतिक महामारीच्या काळात सगळेच संकटाचा सामना सर्वांनी एकदिलाने करायला पाहिजे.कुणीही व्यक्तीने अथवा माध्यमांनी अफवा किंवा चुकीची माहिती प्रसारित करू नये असे मला वाटते धन्यवाद!
उत्तर द्याहटवा