कुटुंब छतावर झोपायला गेले असतांना झाली १ लाख ८४ हजारांची चोरी

  • कुटुंब छतावर झोपायला गेले असतांना
  • झाली १ लाख ८४ हजारांची चोरी


सिंदखेडराजा:- उन्हाळा असल्याने कुटुंब छतावर झोपायला गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने मिळून १ लाख ८४ हजार रु. चा मुद्देमाल लंपास केल्याची घटना तालुक्यातील बाळसमुद्र येथे काल दि. २८ एप्रिल, मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाळसमुद्र येथील विठ्ठल श्रीकिसन मेरत यांनी यासंदर्भात साखरखेर्डा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २७ एप्रिल, सोमवारी रात्री सुमारे १० वा. घरातील सर्व कामकाज आटोपून त्यांची पत्नी सुनीता, मुलगी देवता व मुलगा ऋषिकेश हे सर्वजण झोपण्यासाठी छतावर गेले होते. त्यानंतर सकाळी म्हणजे काल दि. २८ एप्रिलला सकाळी ५.०० वा. विठ्ठल व त्यांची पत्नी सुनीता दोघेही उठून खाली आले. त्यावेळी घराचा दरवाजा लोटून घेतलेल्या स्वरुपात, तर कुलूप तोडून बाजूला ठेवलेले आढळले. तर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी १ लाख रु. तसेच गहुपोत, झुंबर, अंगठ्या आदि सोन्याचे ८४ हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले.
ह्या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुरतसिंग इंगळे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा