तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या वितरणात दुसऱ्यांदा गडबडीचा प्रकार; तक्रारीनंतर करण्यात आली चौकशी

तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या वितरणात दुसऱ्यांदा गडबडीचा प्रकार
तक्रारीनंतर करण्यात आली चौकशी

सिंदखेडराजा:- कोरोना संसर्गाच्या आणीबाणी सदृष्य धर्तीवर जनतेला अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून, शासनाकडून केल्या जाणाऱ्या धान्य वितरणामध्ये काही स्वस्त धान्य दुकानदाराकडून गडबड केल्या जात आहे. तालुक्यातील सोनोशी येथील अन्नधान्य वितरणात गडबड प्रकारानंतर पिंपळगाव सोनारा येथून दि. १० एप्रिल, शुक्रवारी दुसरी तक्रार तहसीलदार यांचेकडे करण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी दि. ११ एप्रिल, शनिवारी या प्रकरणाची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. 
पिंपळगाव सोनारा येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आलेले अन्नधान्य लाभार्थ्यांना योग्य भावात देण्याऐवजी चढ्या दराने दिला जातो. तसेच वजनाच्या संदर्भातही काहींना दोन ते तीन किलो धान्य कमी दिल्या जाते. या स्वरूपाची तक्रार गावातीलच रमेश तुकाराम ठोसरे, उद्धव श्रीराम ठोसरे, विश्वास विक्रम ठोसरे, प्रकाश श्रीराम गवई, तुळशीदास दिगंबर बिनोरकर आदि ग्रामस्थांची होती. मात्र लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष तहसीलदार यांच्यापर्यंत जाऊन तक्रार देण्याऐवजी भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. त्यावरुन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी पुरवठा निरीक्षक संदीप बंगाळे व तलाठी देविदास गरिबे यांना चौकशीसाठी पिंपळगाव सोनारा येथे रवाना केले. त्यानुसार बंगाळे व गरिबे यांनी स्वस्त धान्य दुकानदार मनोहर भिकाजी ठोसरे यांच्या दुकानात जाऊन पंचनामा केला. तसेच तक्रारकर्त्यांची लेखी बयाने घेतली. यावेळी सरपंच तोताराम भगवान ठोसरे, पोलीस पाटील इंद्रजीत दत्तात्रय ठोसरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मारुती धोंडू साखरे, गणेश पंजरकर, दिलीप ठोसरे, उपसरपंच प्रदीप मधुकर खिल्लारे, ग्रा. पं. सदस्य शिवाजी गुलाबराव ठोसरे तसेच बहुसंख्य लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा