कोरोना पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या फुलशेतीचे नुकसान; पंचनामा करण्यास नकार; वरिष्ठांनी दखल घेत आदेश देण्याची गरज
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना पार्श्वभूमीवर
शेतकऱ्याच्या फुलशेतीचे नुकसान
पंचनामा करण्यास नकार
वरिष्ठांनी दखल घेत आदेश देण्याची गरज
सिंदखेडराजा:- शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीचे चित्र एक एक करीत समोर येत आहेत. याचवेळी सावखेड तेजन येथील एका प्रकरणावरुन शासकीय स्तरावरुन पंचनामे व सर्व्हे करण्यास नकार देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ स्तरावरुन तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सावखेड तेजन येथील विजय विघ्ने ह्या शेतकऱ्याने यावर्षी सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने, नगदी पिकातील नवीन प्रयोग म्हणून फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या सर्व्हे क्र. ४२ मधील दीड एकर शेती क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर चांगला भाव मिळेल. तसेच उन्हाळ्यात औरंगाबाद, पुणे अगदी मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत फुलांची विक्री करण्याची विजय विघ्ने यांची उमेद होती. मात्र ऐनवेळी कोरोना संसर्गाचे संकट आल्याने संचारबंदी झाली. त्यामुळे यावर्षी थोडी अधिक कमाई करण्याची शेतकऱ्याची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. सुमारे तीन लाख रुपयांच्या या नुकसानीचा सर्व्हे व पंचनामा व्हावा म्हणून त्यांनी स्थानिक तलाठी यांना विनंती केली असता, आपल्यास वरुन आदेश नसल्याचे उत्तर मिळाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदिंच्या नेतृत्वात गावागावात समित्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र यातील काही मंडळी नेमणुकीच्या गावाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे ग्रामस्थ किंतुपरंतु करत सांगत असतात.
यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या गावात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, ह्याचा सर्व्हे करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन देण्याची मागणी होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏