अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून, पोलीस ठाण्यात जमा ..
अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून, पोलीस ठाण्यात जमा ..
रेती माफियांच्या मुसक्या आवळणे शक्य ..
तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आनंद राजपूत, देविदास गरिबे व प्रशांत पोंधे यांचे पथक दि. २८ एप्रिल, मंगळवारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी कार्यरत होते. त्यावेळी डिग्रस, ता. देऊळगावराजा येथून अवैध रेती वाहतूक करणारे एक टिप्पर खैरव मार्गे डोरवीकडे येत असल्याची गुप्त माहिती पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार हे पथक डोरवी येथे दबा धरुन बसले होते. रात्री बरोबर १२ वाजता टिप्पर डोरवी शिवारात येताच त्यास थांबवण्यात आले. ज्ञानेश्वर दिनकर वाघ, यांच्या मालकीच्या टिप्पर चालक सतीश शिवअप्पा जाधव, दोघेही रा. डिग्रस, ता. देऊळगावराजा याला रॉयल्टी व वाहतूक पास संदर्भात विचारणा केली असता कोणतीच कागदपत्रे आढळून आली नाही.
त्यामुळे पंचनामा करीत, हे टिप्पर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या आणीबाणी सदृष्य काळातही गेंड्याची कातडी असलेल्या रेतीमाफियांचे अवैध कारनामे सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पकडण्यात आलेले टिप्पर डिग्रस, ता. देऊळगावराजा येथीलच आहे. यामुळे डिग्रस परिसर रेतीमाफियांचा मुख्य अड्डा म्हणून कार्यरत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. एका पाठोपाठ एक होणाऱ्या या प्रकारांवर सिंदखेडराजा व देऊळगावराजा प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठांनी ठोस उपाययोजन्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏