चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा
चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा सिंदखेडराजा:- नजीकच्या चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणी माजी आमदार यांच्या भूमिकेला लक्ष करीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख असलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरळसरळ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात चिखला काकड, ता. लोणार येथील प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या जातीयवादी विखारी भूमिकेमुळे अस्वस्थ झाल्याचे राजीनामा पत्रात विदित करीत सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी राजीनामा मंजूर करुन आपला श्वास मोकळा करण्याचे राजीनामा पत्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले आहे. ह्या राजीनामा पत्रात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेचे संस्थापक माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रवाहित करण्याचे काम शिव...

आपल्या हितविरहित सेवेचा मोबदला आपणास ईश्वर जरूर करतील. कारण असे की माझ्या माहितीप्रमाणे आज च्या काळात 99% पत्रकार /वार्ताहर एखाद्या व्यक्तीच्या फक्त फुस लावण्यावरच काही हि मनघडत ( Concucted) बातम्या प्रकाशित करतात.आपला सदैव जय जय कार होवो. अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र! जय हिंद.
उत्तर द्याहटवा