युवकांचा समयोचित अभिनव उपक्रम

युवकांचा समयोचित अभिनव उपक्रम


मोहाडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा येथील युवकांचा अभिनव उपक्रम ..
सर्व गावकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत येथील युवक दरवर्षी शिवजयंती साजरी करतात ..
त्यात धांगडधिंग्यापेक्षा समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर असतो.
यावर्षी वर्गणी जमा केली व त्याचा समयोचित वापर करीत अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
त्यांनी काय व कसे केले ही घडामोड खाली वाचा त्यांच्याच शब्दांत
◆" *समाजाचा पैसा समाजासाठी....।।"*
_शिवजयंती उत्सव समिती मोहाडी.
*नमस्कार मित्रहो ...🙏*      कोरोनामुळे आज सर्वत्र वाईट परिस्थिती आहे. सर्वत्र विशेषतः ग्रामीण भागात आजही आरोग्य सुविधा आणि संरक्षण साहित्य यांची कमतरता आहे. हे साहित्य अजूनही गोरगरीब पर्यंत पोहोचलेले नाही.अपुल्या मोहाडी गावातही थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती आहे. यासाठी काही करता येईल का, या दृष्टीने.. *शिवजयंती उत्सव समिती मोहाडी* यांनी प्रयत्न करण्याचे ठरवीले.
      दरवर्षी अपुल्या गावात १९ फेब्रुवारीला शिवजयंती सामाजिक सलोख्यात आणि अगदी अत्यल्प खर्चात पार पडते. खर्चाचा आपण हिशेब चावडीवर लावतो.उरलेला पैसा बँकेत ठेवतो. पण यावर्षीची बेतलेली भीषण परिस्थिती बघता... या पैशाचा सुयोग्य विनीमय करण्याचे सदस्यांनी ठरविले. त्यातूनच सुरू झाले मिशन.. *" समाजाचा पैसा समाजासाठी "*       त्यातूनच ग्रामीण भागातील आजच्या काय गरजा आहेत, कोणत्या सुविधांची कमतरता आहे, याची त्या त्या क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली. आणि त्यातून तीन मुख्य गरजा पुढे आल्या १)धनधान्य २)जनजागृती आणि ३)आरोग्य सुविधा. पैकी पहीली धनधान्याची गरज आज सरकारने पूर्ण केली आहे.अजूनही जर कुणी गावकरी उपाशी राहत असेल तर त्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.दुसरी गोष्ट जनजाग्रृती त्यासाठी प्रशासनाच्या मदतीने घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे ठरले. तिसरी गोष्ट आरोग्यसुविधा त्यात मास्क आणि साबण किंवा सँनीटायजर यांची कमतरता जाणवली. आणी मग मास्क आणि साबण यांचे सर्वानुमते वाटप करण्याचे ठरले.
      मग सुरू झाली साहित्य जमवाजमव..साखरखेर्डा येथे आपल्या व्यवसायात प्रसिद्ध असलेले टेलर बाळू जैन यांच्याकडून मास्क शिवण्याचे ठरविले. त्यांनी हलाखीची परिस्थिती असूनही या सामाजिक कार्यात मदत केली अगदी अत्यल्प खर्चात त्या कुटुंबाने दिवस रात्र जागून आठशे मास्क तयार करून दिले. शुभम मेडिकल स्टोअर मालक मा.गोपाल मामा मानतकर यांनी ३०० डेटॉल साबण उपलब्ध करून दिले. आणि श्याम खरात यांच्या श्री दत्त क्लिनिकल लॅब यांनी मास्क जंतुविरहीत करण्यास मदत केली. साहित्य तयार झाले प्रत्येक घरी दोन मास्क आणि एक साबण वाटप करण्याचे ठरले.
      त्यादृष्टीने प्रशासनातील कर्मचारी मा.तलाठी, मा.ग्रामसेवक, मा.सरपंच, मा.पोलिस पाटील, आणि मा. ठाणेदार संग्राम पाटील साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले. आणि उपक्रम राबविण्यास होकार दिला. आणी मग मंगळवारी वाटप करण्याचे ठरले. त्यासाठी उपयुक्त कोरोना जनजागृती फलक ,स्लोगन आणि आपल्या मीशन चा लोगो तयार करण्यात आला. जनजागृतीसाठी कोरोना नीयम व जनजागृती ऑडिओ क्लिप स्पीकरसाहित्य उपलब्ध करण्यात आले.
      मंगळवारी सकाळी ठीक ९:०० वाजता मा.सरपंच आणि प्रशासनातील अधिकारी गावातील मान्यवर आणि मोजकेच गावकरी यांच्या उपस्थितीत सर्व खबरदारीचे आणि कायद्याचे नियम पाळून उद्घाटन पार पडले. याप्रसंगी  आपल्या  गावासाठी  आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे  प्रशासकीय कर्मचारी  गावातील दुकानदार  पोलीस कर्मचारी  यांचे कौतुक आणि धन्यवाद मानण्यात आले. आणी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन वाटप सुरू झाले.
      त्यासाठी मावळ्यांची एक टीम तयार करण्यात आली. त्यांना सुरक्षा साहित्य आणि हँडग्लोव्हज ,मास्क ,सँनीटायझरपुरवण्यात आले. सकाळी नऊ ते साडे बारा पर्यंत घरोघरी जाऊन मास्क आणि सोप यांचे वाटप सुरक्षा नियम पाळून करण्यात आले. सोबत स्पीकर द्वारे जनजागृतीसाठी सर्वांना कोरोनावीषयी नियम आणि खबरदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांचीही मोलाची मदत झाली. गावातील दुकानदार लोकांनाही साहित्य देण्यात आले. तसेच आपल्या गावातील साखरखेडा येथे स्थायिक झालेल्या ग्रामस्थांनाही मास्क आणि साबणाचे वाटप करण्यात आले.
      दुसऱ्या दिवशी बुधवारी साखरखेर्डा पोलीस स्टेशन कर्मचारी आणि सरकारी दवाखाना कर्मचारी यांनाही मास्क आणि साबण यांचे वितरण करण्यात आले. अपुल्या गावाला मदत आणि सहकार्य करण्यासाठी त्यांचे धन्यवाद मानण्यात आले. अशाप्रकारे *"समाजाचा पैसा समाजासाठी"* हे मिशन पार पडले. अजूनही जर काही गरजा अपूर्ण असतील तर अवश्य सांगाव्यात...त्याही आपण होईल तशा सामाजिक सहकार्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
      या उपक्रमास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद. प्रशासकीय अधिकारी, मा. सरपंच, गावातील मान्यवर मंडळी, मा.ठाणेदार संग्राम पाटील साहेब, अंगणवाडी आणि आशा सेविका, छत्रपती शिवरायांचे सर्व मावळे, सर्व मा.सदस्य, यांचेही धन्यवाद.
      मित्रहो.. समाजाला आज अशा उपक्रमांची आणि आपल्या मदतीची गरज आहे. समाजाचा जो पैसा अशा संस्था जवळ आहे, त्यांनीही समाजासाठी उत्तरदायीत्व म्हणून तो काही प्रमाणात खर्च करण्याची आज गरज आहे. या उपक्रमाचा उद्देश कुठलीही प्रसिद्धी किंवा वाहवा मिळवण्याचा नाही. तर समाजाला आपण होऊन मदत करण्याची आणि समाजाविषयी असलेल्या आपल्या कर्तव्यांची परिपूर्ती करण्याचा आहे. आणि हीच जाणते राजे छत्रपती शिवरायांची आम्हा मावळ्यांना शिकवण आहे. यापुढेही असेच सहकार्य राहू द्या हीच विनंती. या कामात नकळत काही चूकभूल झाली असल्यास समितीच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
*धन्यवाद...🙏**आपुल्याच सेवेत...**शिवजयंती उत्सव समिती मोहाडी**छत्रपती शिवरायांचे सर्व मावळे मोहाडी**आणि समस्त गावकरी मंडळी मोहाडी*◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा