💥 सावधान .. आता आपल्याला सुरु होतील भ्रमणध्वनी कॉल्स ..
💥 सावधान .. आता आपल्याला सुरु होतील भ्रमणध्वनी कॉल्स .. मित्रांनो, जेंव्हा सुख, दुःख व त्यातून निर्माण होणाऱ्या काही तातडीच्या गरजांचा प्रसंग येतो. त्यावेळी कोठून का होईना आपली गरज भागली पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. ह्याच गरजेतून निर्माण झालेल्या अगतिकतेच्या प्रसंगाचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक जण टपून बसलेले असतात. असाच प्रसंग पुढे येतोय तो म्हणजे कोरोना विषाणूची लस. त्याची गरज प्रत्येकाला आहे. त्यातल्या त्यात ही लस सर्वात अगोदर आपल्यालाच मिळावी, असा प्रत्येकाचा अट्टाहास असणार आहे. याचाच फायदा घेण्यासाठी इंटरनेटवर अनेक भामटे टपून बसलेले असू शकतात. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करा. अशा प्रकारचा कॉल आपल्याला येऊ शकतो. त्यात आपला आधारकार्ड नंबर मागितल्या जाईल. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, असे सांगितल्या जाईल. त्या नंतर ते भामटे पुन्हा कॉल करीत आपल्याकडून ओटीपी घेतील. एवढी प्रक्रिया पूर्ण झाली की दुसऱ्या बाजूला आपल्या खात्यातील रक्कम काढून घेऊन आपली फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा, व हा मेसेज आपल्या निकटवर्तीयांना फॉरवर्ड करा. जेणेकरुन आपल्या सोबत आप...