सोशल मीडियावर राहणाऱ्या आपण सर्वांनी व्हायरल पासून थोडं सावध राहण्याची गरज
सोशल मीडियावर राहणाऱ्या आपण सर्वांनी व्हायरल पासून थोडं सावध राहण्याची गरज ..🙏
मित्रांनो,
जेंव्हा पासून लॉकडाऊन म्हणजे संचारबंदी जरि झाली, तेंव्हापासून जवळपास सर्वच जण सोशल मीडियावर राहू लागलो आहोत. त्याचे महत्वाचे कारण हे वेळ घालविणे जरी असले तरी त्यातून मिळणारी महत्वाची माहिती व विविध प्रकारे होणारे मनोरंजन आदि बाबीही महत्वाच्या आहेत.
परंतु आपल्यापैकी अनेक जणांना हे माहीत नाही, की जेव्हापासून सोशल मीडिया तयार झाला आणि सर्वसामान्य व्यक्तिसुद्धा त्याला वापरायला लागला, तेंव्हापासूनच या सगळ्यांना टारगेट करीत काही माथी कामाला लागली. तुम्ही आम्ही नव्हेतर आपण सर्वजण नवीन काही पोस्ट ज्या लिखित, दृश्य फोटो अथवा व्हिडिओ स्वरूपात आल्या की वाचण्याचा, पाहण्याचा किंवा ऐकण्यासाठी आसुसलेले असतो. त्याचा एकदा फडशा पाडला की मग त्या संदर्भातील चर्चा, प्रतिक्रिया, दावे, प्रतिदावे यातून ते मुद्दे सर्वत्र पसरतात. त्यातून समाजमनात घर करतात. आणि त्यातून समाजाची मानसिकता कशा प्रकारचे बनते, याचे प्रात्यक्षिकही सुरुवातीच्या काळात ह्या टारगेट करणाऱ्या लोकांनी केले. त्याचा परिणाम साधकबाधक कसा होतो? याचेही आलेख, सांख्यिकी माहितीतून अवलोकन करण्यात आले. ह्या गोष्टीचा फायदा विविध स्तरावर घेतल्या गेला असला तरीही राजकारणात मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला.
सध्या भारताची लढाई कोरोना विषाणू विरुद्ध असली तरीही याला वेगळ्या पद्धतीने हाताळणी करीत दुय्यम ठेवत संभ्रम निर्माण करणारे अनेकजण कार्यरत आहेत. त्यांची विशिष्ट विचारशैली आहे. यामध्ये वेगवेगळ्या कल्पना वापरुन समाजाच्या विविध स्तरावर दुही पसरवायची. त्यासाठी प्रसंगी खोट्या बातम्यांचा वापर करायचा. यातून मानसिक गुलाम असलेले भक्त निर्माण करायचे. त्याद्वारे इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा ही विचारशैली त्या गुलामांमध्ये पक्की रुजवायची. आणि हे गुलाम मग कट्टरपंथी करीत त्यांच्याद्वारे उद्देश साध्य करण्यासाठी एकाचवेळी तुटून पडायचे. हे सर्व करीत असताना स्वतःचा मेंदू व मन वापरत एकतेचा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन यांच्या विरोधात उभे राहणाऱ्यांना प्रथम टारगेट करायचे आणि संभ्रमित वातावरणातून सर्वसामान्य जनतेच्या अगतिकतेचा गैरफायदा घ्यायचा.
सोशल मीडियावर असे लोक ठळकपणे वेळोवेळी आपल्याला आढळून येत असतात.
सध्या धार्मिक भेदभाव निर्माण करण्यासाठी हे लोक बेभान होऊन कामाला लागलेले आहेत.
यातूनच राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व त्यांची सर्व टीम यांनाही टारगेट करण्यासाठी हे मानसिक गुलाम जंग जंग पछाडत आहेत.
त्यातून संचारबंदी संदर्भात आताच्या महत्वाच्या वळणावर संभ्रमित करणाऱ्या अनेक पोस्ट येऊ शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे. मला काय त्याचे? ही वृत्ती कृपया त्यागा
आणि डोळ्यात तेल घालून सावध राहा, सजग राहा, सामाजिक एकता जोपासण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करा.
🇮🇳 जयहिंद ...!🇮🇳

टिप्पण्या
Social media चे trend नुसार मत व्यक्त केली जात आहे व तसा mind set बनताे