पोस्ट्स

२ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन

इमेज
  २ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात तब्बल ३६ जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांची कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. 'महाराष्ट्र पोलीस' आज २ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा ६१ वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती १६६१ साली झाल्याचे आढळते. त्यावेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून त्या भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर १६७२ साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला. भारताच्या १९३६ मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे १९४७ मध्ये, स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव...

२३ डिसेंबर, राष्ट्रीय शेतकरी दिवस .. यासंदर्भात जाणून घेऊ या ..

इमेज
  आज २३ डिसेंबर,  राष्ट्रीय शेतकरी दिवस .. यासंदर्भात जाणून घेऊ या .. शेतकरी आंदोलनात यावर्षी  राष्ट्रीय शेतकरी दिवस  म्हणजेच राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जात आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असा दावा केंद्र सरकार करत आहे. पण काही शेतकरी या कायद्यांच्या विरोधात असून कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये अनेक बैठका या मुद्दयावर झाल्या पण अजून निर्णय निघालेला नाही. दरम्यान देशात शेतकरी आंदोलनाचा जोर असताना आज राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी २३ डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी हा दिन का साजरा केला जातो याचा एक मोठा इतिहास आहे. आज आपण हाच इतिहास जाणून घेणार आहोत... राष्ट्रीय किसान दिवस हा दिवस देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जंयतीनिमित्त साजरा केला जातो.हा दिवस खूप महत्त्वपुर्ण आहे, कृषी क्षेत्रातील नवीन गोष्टी आणि शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचे ध्येय्य हा दिवसामुळे मिळते. किसान दिवस शेतकऱ्यांच्या समोर येणाऱ्या विविध मुद्दयांविषयी सुचित करण्याचे का...

आज 22 डिसेंबर, राष्ट्रीय गणित दिवस माहिती

इमेज
  राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो ? राष्ट्रीय गणित दिवस 2021 महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो.  चला राष्ट्रीय गणित दिनाचा इतिहास, राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व आणि भारतात राष्ट्रीय गणित दिवस कसा साजरा केला जातो यावर एक नजर टाकूया... प्राचीन काळापासून, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, भास्कर दुसरा, श्रीनिवास रामानुजन इत्यादींसारख्या गणितात विविध विद्वानांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे हे आपल्याला माहीत आहे.  अगदी लहान वयात, श्रीनिवास रामानुजन यांनी एक विशिष्ट प्रतिभा दाखवली.  अनंत मालिका, संख्या सिद्धांत, गणितीय विश्लेषण इत्यादी अनेक उदाहरणे त्यांनी मांडली आहेत. राष्ट्रीय गणित दिनाचा इतिहास 22 डिसेंबर 2012 रोजी, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात घोषणा केली की, दरवर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा ...

राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु होणार - वर्षा गायकवाड

इमेज
 राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु होणार - वर्षा गायकवाड सिंदखेडराजा:- राज्यातील  इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्वच शाळा सुरु होणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे. आज राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते पाचवी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा आतापर्यंत बंदच होत्या. मात्र येत्या १ डिसेंबर पासून ह्या सर्वच शाळा सुरु होतील, असे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले. याचवेळी ह्या सर्व शाळा सुरु करण्यासाठी पूर्वतयारीची प्रक्रिया सुरु झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या ह्या निर्णयामुळे पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, एवढे मात्र निश्चित ..!

चिखली येथील हत्येचा लागला छडा ..! चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी

इमेज
चिखली येथील हत्येचा लागला छडा ..! चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी सिंदखेडराजा:- चिखली येथील हमरस्त्यावरील दुकानात घुसून दुकान मालकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जनतेत क्षोभ निर्माण होत असतांनाच परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आरोपींना शोधण्याची ठाणेदार लांडे यांची तारेवरची कसरत फलदायी ठरली आहे. त्यामुळे जनतेच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. तालुक्यातील साखरखेर्डा येथे ठाणेदार म्हणून कायद्याचा आदर निर्माण करीत कर्तव्यरुपी दबदबा निर्माण करणारे अशोक लांडे हे कोणत्याही गुन्ह्याचा तपास लावण्यात यशस्वी ठरले होते. जिल्ह्याबाहेर झालेल्या त्यांच्या बदलीनंतर अनेक सुजाण जण व्यथित झाले होते. मात्र चिखली येथे त्यांची बदली झाल्यावर कायद्याचा प्रभाव व दबदबा कायम ठेवण्यासाठी अशोक लांडे यांचे प्रयत्न सुरू झाले होते. दि. १६ नोव्हेंबर, मंगळवारी रात्री अचानकपणे  चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानात रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेश पोपट यांची हत्या झाली....

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय पुन्हा मातृतीर्थात ..

इमेज
  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय पुन्हा मातृतीर्थात ..            दीसना ✍️ सिंदखेडराजा:- मतदारसंघातील पाणी समस्या निर्मूलनासाठी देऊळगावराजा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्या कार्यालयाची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर ते कार्यालय तेथून स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून म. जी. प्रा. चे तेच कार्यालय  देऊळगावराजा येथे स्थलांतरित करण्यात पुन्हा यश आले आहे. त्यामुळे देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर व चिखली आदि तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बळ प्राप्त झाले आहे. सिंदखेडराजा व देऊळगावराजा ह्या दोन शहरात २५ वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई होती. नव्हेतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही शहरातील तोच मुद्दा खूप गाजला होता. त्यावेळी छत्री ह्या निशाणीवर अपक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे व त्यांच्या समर्थकांनी ह्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करुन निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत डॉ. शिंगणे हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळी भाजप व सेना युतीतील श...

दिवंगत जिल्हा परिषद शिक्षकांच्या कुटुंबियांना शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केली आर्थिक मदत

इमेज
  दिवंगत जिल्हा परिषद शिक्षकांच्या कुटुंबियांना शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केली आर्थिक मदत  सिंदखेडराजा:- जिल्हापरिषदेच्या शिक्षकांच्या अचानक मृत्यूनंतर तालुक्यातील शिक्षकांनी वर्गणी जमा केली. काल दि. ३० जुलै, शुक्रवारी दोन्ही कुटुंबियांच्या घरी पोहचून, धनादेशाद्वारे ही आर्थिक मदत कुटुंबियांना प्रदान केली आहे. तालुक्यातील जागदरी येथील रहिवासी व झोटिंगा येथील जि. प. शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले विष्णू त्र्यंबक जायभाये उर्फ व्ही. टी. सर व बारलिंगा येथील रहिवासी व उमरद येथील जि. प. शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवहरी किसन डोईफोडे या दोहोंचे नुकतेच निधन झाले आहे. ह्या दोन्ही शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी तालुक्यातील जि. प. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी व कार्यालयातील कर्मचारी आदिंनी आर्थिक स्वरुपात वर्गणी जमा केली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी व काही शिक्षकांनी जागदरी व बारलिंगा येथे पोहचत कुटुंबाला एक लाखाच्यावरील मदतीची रक्कम मान्यवरांच्या हस्ते धनादेशाद्वारे प्रदान केली. गटशिक्षणाधिकारी तुकाराम आ...

सेवानिवृत्तीबद्दल विद्यालयातील नाईक यांचा सपत्नीक सत्कार करीत भावपूर्ण निरोप

इमेज
  सेवानिवृत्तीबद्दल विद्यालयातील नाईक यांचा सपत्नीक सत्कार करीत भावपूर्ण निरोप सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयातील नाईक यांचा सपत्नीक सत्कार करीत सेवानिवृत्त झाल्यामुळे भावपूर्ण निरोप देण्यात आला. आज दि. ३१ जुलै, शनिवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश ठोसरे तर सत्कारमूर्ती नाईक बबनराव सखाराम खिल्लारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता खिल्लारे यांच्यासह वसंत पाटील, बाबुराव साबळे प्रमुख उपस्थितीत होते. निरोप समारंभात प्रारंभी शाल, श्रीफळ, कपडे, साडीचोळी, चांदीची मूर्ती व भेटवस्तू देऊन बबनराव खिल्लारे व सुनीता खिल्लारे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना बबन खिल्लारे यांनी शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सहकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्याचीच भूमिका ठेवली. त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने केलेल्या कार्यात खारीचा वाटा उचलता आला याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी रमेश ठोसरे, वसंत पाटील आदिंनी मनोगतातून बबनराव खिल्लारे यांनी कर्तव्याच्या वेळेच्या पलीकडे जाऊन दिलेल्या स...

मिस यु व्ही. टी. ... मानवतेचा पुजारी हरवलाय ...

इमेज
  मिस यु व्ही. टी. ... मानवतेचा पुजारी हरवलाय ...            दीसना✍️ एक सामाजिक प्रसंग होता. माझ्यासमोर व्हीटी होते. माझ्याकडून नवी नवी ओळख होती. बोलतांना दीपक दादा, दीपक दादा असा उच्चार सुरु होता. मी म्हटले की, तुम्ही मला दादा म्हणत जाऊ नका. तुम्ही इव्हाया जवायाचे माझ्यापेक्षा सिनिअर आहात. व्हीटींनी ताबडतोब प्रतिप्रश्न केला, तुमची रिटायरमेंट कधी? मी म्हणालो २०२४ तर, प्रत्त्युत्तरात ते म्हणाले माझी २०२६. मला काहीच बोलता येईना. त्यानंतर ह्या ना त्या कारणाने संबंध वाढत गेले. मी त्यांना माझे मामेकुळ म्हणायचो. कारण जागदरी व सावखेड तेजन येथे आमचे मामेकुळ व मामा म्हणजे जायभाये. त्यानंतर वेळोवेळी संपर्क येत गेल्याने संबंध दृढ होत गेले. काही महिन्यांपूर्वी आम्हा दोघांमध्ये लसावी, मसावीच्या स्वरुपात डॉ. शिंगणे आले. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक मैत्रीच्या नात्याची वीण आणखी घट्ट झाली. देऊळगावराजा पासून मैत्रीचे गणगोतच मोठ्ठे असल्याने मला नातेवाईक व नाती एवढी माहीत नाहीत. त्यामध्ये व्हीटींनी मला नात्यांची माहिती देऊन भर घातली. कुणाचेही काहीही काम असो, त्याने व्हीटीं...

कोरोना योद्ध्यांचा सत्कार व कौतुक करावे तेवढे थोडेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जय्यत तयारी करणार नागरिकांनी काळजी घेण्याची गरज विकासकामांसाठी निधीची तरतूद करणार पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

इमेज
  कोरोना योद्ध्यांचा सत्कार व कौतुक करावे तेवढे थोडेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जय्यत तयारी करणार  नागरिकांनी काळजी घेण्याची गरज विकासकामांसाठी निधीची तरतूद करणार  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा:- वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या कोरोना संसर्गाची भीती आजही कायम आहे. पहिली लाट जाऊन दुसरी आली. ती नियंत्रणात येत असतांनाच तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाचे नियम व वैयक्तिक जीवनात त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन करीत आशासेविका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आदिंनी संसर्गाच्या कठीण काळात केलेल्या कार्याबद्दल करावे तेवढे कौतुक व सन्मान कमीच असल्याचे तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.   आज दि. २७ जून, रविवारी तालुक्यातील साखरखेर्डा येथे मानतकर परिवारातर्फे चिसौकां वैष्णवी राधिका गोपाल मानतकर व चि. अमोल पुष्पा विष्णू बोरे यांच्या विवाहपूर्व आयोजित "सत्कार कोरोना योद्ध्यांचा" ह्या "स्तुत्य" कार्यक्रमात डॉ. शिंगणे बोलत...