२ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन
२ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन
महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे.
महाराष्ट्रात तब्बल ३६ जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांची कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. 'महाराष्ट्र पोलीस' आज २ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा ६१ वा वर्धापन दिन आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती १६६१ साली झाल्याचे आढळते. त्यावेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून त्या भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर १६७२ साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला. भारताच्या १९३६ मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे १९४७ मध्ये, स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे ठेवले गेले.
राज्य पुनर्गठन अधिनियम,१९५६ नंतर, मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन, गुजरात पोलिस, म्हैसूर पोलिस (नंतर नाव बदलून कर्नाटक पोलिस) आणि महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी झाली.
अखेर २ जानेवारी १९६१ साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरीत्या स्थापना झाली.
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏