दिवंगत जिल्हा परिषद शिक्षकांच्या कुटुंबियांना शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केली आर्थिक मदत

 



दिवंगत जिल्हा परिषद शिक्षकांच्या कुटुंबियांना शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केली आर्थिक मदत 


सिंदखेडराजा:- जिल्हापरिषदेच्या शिक्षकांच्या अचानक मृत्यूनंतर तालुक्यातील शिक्षकांनी वर्गणी जमा केली. काल दि. ३० जुलै, शुक्रवारी दोन्ही कुटुंबियांच्या घरी पोहचून, धनादेशाद्वारे ही आर्थिक मदत कुटुंबियांना प्रदान केली आहे.

तालुक्यातील जागदरी येथील रहिवासी व झोटिंगा येथील जि. प. शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले विष्णू त्र्यंबक जायभाये उर्फ व्ही. टी. सर व बारलिंगा येथील रहिवासी व उमरद येथील जि. प. शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवहरी किसन डोईफोडे या दोहोंचे नुकतेच निधन झाले आहे.
ह्या दोन्ही शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी तालुक्यातील जि. प. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी व कार्यालयातील कर्मचारी आदिंनी आर्थिक स्वरुपात वर्गणी जमा केली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी व काही शिक्षकांनी जागदरी व बारलिंगा येथे पोहचत कुटुंबाला एक लाखाच्यावरील मदतीची रक्कम मान्यवरांच्या हस्ते धनादेशाद्वारे प्रदान केली. गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने, नंदकिशोर शिंगणे, अशोक नागरे आदिंनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी मदनराव आंधळे, गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने, नंदकिशोर शिंगणे, अशोक नागरे, भानुदास लव्हाळे, तेजराव देशमुख, गैबीनंद घुगे, माधव देशमुख, रंगनाथ गावडे, गणेशराव डिघोळे, विलास आघाव, संतोष सोनुने, सुधाकर पऱ्हाड, शिवाजी डिघोळे, कैलास ढोलेकर, शिवशंकर डोईफोडे, शरद नागरे, आकाश आटोळे, रफिक खान, अश्फाक, मुख्तार, रफिक, अकिल, महादू लहाने, दिलीप चव्हाण, श्रीधर जायभाये, भानुदास दराडे, अशोक कांगणे, सतीश खेडेकर, अनिल आघाव, जगन शिंदे, संजय भालेराव, प्रभाकर धोंगडे, अविनाश पालवे, संजय उगलमुगले, अनिल वलटे, मोहन देशमुख, माणिकराव घुगे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन संजय उगलमुगले व शिवशंकर डोईफोडे यांनी केले. 
शेवटी दिवंगत शिक्षक व्ही. टी. जायभाये व शिवहरी डोईफोडे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा