राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु होणार - वर्षा गायकवाड

 राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु होणार - वर्षा गायकवाड



सिंदखेडराजा:- राज्यातील  इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्वच शाळा सुरु होणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे. आज राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी राज्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते पाचवी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा आतापर्यंत बंदच होत्या. मात्र येत्या १ डिसेंबर पासून ह्या सर्वच शाळा सुरु होतील, असे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले. याचवेळी ह्या सर्व शाळा सुरु करण्यासाठी पूर्वतयारीची प्रक्रिया सुरु झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारच्या ह्या निर्णयामुळे पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, एवढे मात्र निश्चित ..!

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
स्वागत ....चांगला निर्णय
Najeem khan म्हणाले…
अतिशय चांगला निर्णय 🌺