चिखली येथील हत्येचा लागला छडा ..! चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी



चिखली येथील हत्येचा लागला छडा ..!
चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी
सिंदखेडराजा:- चिखली येथील हमरस्त्यावरील दुकानात घुसून दुकान मालकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जनतेत क्षोभ निर्माण होत असतांनाच परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आरोपींना शोधण्याची ठाणेदार लांडे यांची तारेवरची कसरत फलदायी ठरली आहे. त्यामुळे जनतेच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
तालुक्यातील साखरखेर्डा येथे ठाणेदार म्हणून कायद्याचा आदर निर्माण करीत कर्तव्यरुपी दबदबा निर्माण करणारे अशोक लांडे हे कोणत्याही गुन्ह्याचा तपास लावण्यात यशस्वी ठरले होते. जिल्ह्याबाहेर झालेल्या त्यांच्या बदलीनंतर अनेक सुजाण जण व्यथित झाले होते. मात्र चिखली येथे त्यांची बदली झाल्यावर कायद्याचा प्रभाव व दबदबा कायम ठेवण्यासाठी अशोक लांडे यांचे प्रयत्न सुरू झाले होते. दि. १६ नोव्हेंबर, मंगळवारी रात्री अचानकपणे चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानात रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेश पोपट यांची हत्या झाली. या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहराच्या व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर गावात निर्माण झालेल्या वेगळ्या वातावरणाला सांभाळत गुन्हेगारांना शोधण्याची जबाबदारी ठाणेदार लांडे यांचेवर आली. त्यात तारेवरची कसरत करीत तपास सुरु होता. 
यासंदर्भात हाती आलेल्या वृत्तानुसार घटनेतील तीनही आरोपींचा छडा लागला असून, तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ह्यातील एक आरोपी देऊळगावराजा व दोन आरोपी अंढेरा पोलीस ठाणे क्षेत्रातील असल्याची माहिती आहे.  चिखली ठाणेदार अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी झाल्यावर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असेही कळते.

buldhana news (2)
 

टिप्पण्या

  1. भयावह घटनेची जबरदस्त मांडणी... खूप छान सर... आम्हाला तुमचा अभिमान आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. पोलीस विभागावरील विश्वास वाढवण्यास मदत व केलेल्या तपास कार्याबद्दल अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  3. चिखली येथील सामान्य माणसाला धक्का देणारी घटना... ठाणेदार साहेबांचं कौतुक करावं तितकं थोडं...

    उत्तर द्याहटवा
  4. खूप चांगले झाले त्या चोरट्याना पकडले।

    उत्तर द्याहटवा
  5. या आरोपींची गावभर धिंड काढून जी दहशत चिखली वासीयांच्या मनात बसलेली आहे ती काढावी

    उत्तर द्याहटवा
  6. गुन्हेगार पकडला ही खूप मोठी गोष्ट आहे गुन्हेगारांवर योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक गुन्हेगारावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये एखादा गुन्हे करायच्या अगोदर त्याने दहा वेळा विचार केला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  7. खुप छान काम केल्याबद्दल सर,धन्यवाद,साहेब

    उत्तर द्याहटवा
  8. ला॑डे,साहेब, तुमच्या,सारखे, अधिकारी,असले,तर,बुलढाणा, सारख्या,जिल्या,मधे,कोणाचे,धाडस,होणार,नाही,

    उत्तर द्याहटवा
  9. खुप छान काम केल्याबद्दल सर्व पोलीस कर्मचारी व सहकारींचे अभिनंदन,🌹

    उत्तर द्याहटवा
  10. अभिनंदन सर !
    सर्व पोलीस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन !!
    पुनश्च एकवार अभिनंदन!!!

    उत्तर द्याहटवा
  11. Congratulations to concern police officer well done sir criminals arrested in 2 weeks.
    Vinayak Soman Vasai

    उत्तर द्याहटवा
  12. खर तर तुम्ही आज जे काम केले त्या बद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असेच चांगले काम केल्यामुळे त्यांच्या मुळे लोकांचा मनामधे जी भीती बसली होती ती बाहेर काढली , पण चुकीचे काम जो करतो तो कधीतरी फसतो. जय हिंद. सैलुट सर जी.

    उत्तर द्याहटवा
  13. ऐसे बाहदुर अफसर को और उन के टिम को दिल से सलाम

    उत्तर द्याहटवा
  14. तुरंत निकाल encounter करायला पाहिजेत यांच

    उत्तर द्याहटवा
  15. आपल्या अप्रतिम कामगिरी बाबत अभिनंदन तसेच सर्व टीमला धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  16. यापुढे असे गुन्हे घडू नये म्हणून त्या चोरांना कठोर शिक्षा द्या

    उत्तर द्याहटवा
  17. फक्त फाशी तपास लावल्याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  18. अशा लोकांना भर रस्तयावर लोकांसमोर त्या दुकानासमोर
    बेगम मार देत. नंतर त्यांना रोडवर फाशी दयायला हवी
    तेव्हा असे धाडस कोणीही करणार नाही. तरच खरा न्याय झाला समजा. नाहीतर मग आरोपी म्हणे सुटला जामीन वर
    असे व्हायला नको.
    समजा

    उत्तर द्याहटवा
  19. अशा पोलिसांबद्दल खरोखर अभिमान बाळगणे गरजेचे आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा