पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या   सिंदखेडराजा:- तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील वयोवृद्ध शेतकरी बाबुराव श्रीराम देशमुख यांनी सततची नापिकी व मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज या चिंतेपोटी स्वतःच्या शेतातील उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यासंदर्भात मृतक शेतकऱ्याचा पुतण्या अमोल संजयराव देशमुख (वय ३०) यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार बाबुराव श्रीराम देशमुख वय ६१ वर्षे, हे आज दि. २९ डिसेंबर २०२५, सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील मोटर पंप चालू करण्यासाठी गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःच्याच शेतातील उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत काहींना दिसले, त्यावरुन मिळालेल्या मोबाईल कॉल व  संदेशानुसार मी शेतात जाऊन खात्री केली असता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. माझे काका बाबुराव श्रीराम देशमुख, रा. मलकापूर पांग्रा  यांच्या...

विहीर नोंदणीचा अथवा काढण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही पूर्वापार परंपरा व ऑनलाईन नोंदणीतील बदलामुळे होतोय घोळ? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज

इमेज
  "पाठलाग बातमीचा" विहीर नोंदणीचा अथवा काढण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही  पूर्वापार परंपरा व ऑनलाईन नोंदणीतील बदलामुळे होतोय घोळ? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज   सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी):- तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील प्रल्हाद बजेबा पंजरकर या शेतकऱ्याच्या विहीरीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंद प्रकरणाच्या "दीसना" मधील दि. २७ डिसेंबर, शनिवारी प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे तालुकाभरातील शेतकरी तसेच महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. वृत्त प्रकाशित होताच आणखी काही शेतकऱ्यांच्या विहिरीची नोंद सुद्धा गायब झाली असल्याची माहिती काहींनी संपर्क साधून सांगितल्याने समोर आली आहे.  त्यातून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता, शेतकरी वर्गाला बदलांची माहिती नाही. त्यामुळे गैरसमजातून हे प्रकार घडत असल्याचेही समोर आले आहे. आज दि. २८ डिसेंबर, रोजी रविवार असल्याने संबंधित खात्याच्या अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क साधावा की नाही? याबाबत "दीसना" परिवाराच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. त्यास्तव समाजमाध्यमांवरुन संबंधितांना संदेश दिला असता, सिंदखेडराजा तहसी...

विहीर अस्तित्वात असतांनाही तलाठ्याने केली नोंद गायब शंकाकुशंकात्मक चर्चांना उधाण न्याय कधी मिळतो? याकडे लक्ष

इमेज
  विहीर अस्तित्वात असतांनाही तलाठ्याने केली नोंद गायब  शंकाकुशंकात्मक चर्चांना उधाण  न्याय कधी मिळतो? याकडे लक्ष  सिंदखेडराजा:- तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीची असलेली नोंद तलाठ्याने सातबारा उताऱ्यावरून चक्क गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याने तलाठ्यास प्रत्यक्ष भेटून, नव्हेतर तहसीलदार यांनाही निवेदन दिले. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. शेवटी आता त्या शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून, त्यावर कारवाई होते की नाही? याबाबत शेतकरी वर्गात शंकाकुशंकात्मक चर्चेला उधाण आले आहे. पिंपळगाव सोनारा येथील प्रल्हाद बजेबा पंजरकर यांची शेती गावानजीक परंतु, चिखली तालुक्यातील मेरा बु. शिवारातील गट नंबर ५९१ मध्ये आहे व शेतीचे महसूल खाते सुध्दा मेरा बु. च्या रेकॉर्ड मध्ये आहे. त्याच शेतामध्ये पूर्वापार विहीर आहे. त्याची नोंद सुध्दा महसूल दप्तरात होती. परंतु 'आले तलाठ्यांच्या मना तेथे कुणाचेही चालेना' या उक्तीनुसार कुठलीही सूचना न देता, पंचनामा न करता, अगदीच बेकायदेशीरपणे तलाठ्याने त्या विहीरीची नोंदच सातबारा उ...

CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इमेज
 CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना,  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सिंदखेडराजा:- तालुक्यातील एका गावात दोन अल्पवयीन मुलांनी एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी दि. २४ डिसेंबर रोजी तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. संस्कार, सामाजिक जाणीव आणि बालसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. “इतक्या लहान वयात अशी विकृती कशी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलीच्या ३५ वर्षीय आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तालुक्यातील एका गावात, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शेजारी हे कुटुंब वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजता ११ वर्षीय मुलगी घरात एकटी झाडझुड करीत असताना, शेजारी राहणारे अंदाजे १४ व १५ वर्षे वयाचे दोन अल्पवयीन मुलगे तिच्या घरी आले. यावेळी १४ वर्षीय मुलाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला,...

अनपेक्षितपणे डॉ. शिंगणे यांचा उमेदवार सौरभ तायडे विजयी: प्रस्थापितांना अक्षरशः लोळविले तर देऊळगावराजात माधुरी शिपणेने लावला झेंडा

इमेज
  अनपेक्षितपणे डॉ. शिंगणे यांचा उमेदवार सौरभ तायडे विजयी: प्रस्थापितांना अक्षरशः लोळविले तर देऊळगावराजात माधुरी शिपणेने लावला झेंडा सिंदखेडराजा:-  येथील पालिका निवडणुकीत माजी मंत्री डॉ. शिंगणे यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ तायडे यांनी बड्याबड्या उमेदवारांना अक्षरशः लोळवत एकहाती विजय मिळविला आहे. ह्या नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. तर राजकीय क्षेत्रातील अनपेक्षित निकालामुळे मतदारसंघातील  राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत सौरभ विजय तायडे यांना ४२८७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार शाम किसनराव मेहेत्रे यांना ४११८ मते मिळाली. शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार अतिष बाळाजी तायडे यांना ३४६३ मते मिळाली.याशिवाय बहुजन समाज पार्टीचे रंगनाथ आसाराम खाटीकमारे यांना १२९,अपक्ष दिलीप भिकाजी चौधरी यांना १५८,अपक्ष ॲड. सैय्यद मुबीन सैय्यद नईम यांना ४६ मते मिळाली असून नोटा ४६ मते पडले आहे. विजयी नगरसेवक व त्यांना पडलेले मतदान पुढील प्रमाणे आहेत.प्रभाग १ श्रेया उमेश खरात - राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) - ६४९, संतोष ...

देऊळगावराजा शहरातील ७१.६७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क प्रभाग क्र. १०(२) पिंपळनेर मध्ये सर्वाधिक ८७.२३ टक्के मतदान

इमेज
  देऊळगावराजा शहरातील ७१.६७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क  प्रभाग क्र. १०(२) पिंपळनेर मध्ये सर्वाधिक ८७.२३ टक्के मतदान  देऊळगावराजा:- नगरपालिका निवडणुकीसाठी येथे काल दि. २० डिसेंबर, शनिवारी मतदान झाले. मात्र काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती. त्यामुळे  त्यानंतर सर्व बूथ वरील मतदानाची संख्या घेऊन, त्याची सांख्यिकी करण्यास वेळ लागल्याने, एकूण एक मतदानसंख्या व टक्केवारी रात्री अगदीच उशीरा हाती आली आहे. शहरातील झालेल्या मतदानात एकूण ७१.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहरातील एकूण मतदार २९ हजार ३२६ त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ८८५ तर महिला मतदारांची संख्या १४ हजार ४४१ एवढी आहे. त्यापैकी १० हजार ९०६ पुरुष व १० हजार १११ महिलांनी अशा एकूण २१ हजार १७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच झालेल्या मतदानाची टक्केवारी ७१.६७ एवढी आहे. प्रभागनिहाय मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्र. १(१) मध्ये ७४ टक्के, क्र. १(२) मध्ये ७९.०५ टक्के व क्र. १(३) मध्ये ७०.१० टक्के  प्रभाग क्र. २(१) मध्ये ६६.६० टक्के, क्र. २(२...

तूर पिकामध्ये गांजाची लागवड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांवर संशयाच्या चर्चा

इमेज
तूर पिकामध्ये गांजाची लागवड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त   पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांवर संशयाच्या चर्चा सिंदखेडराजा:-  तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून अंमली पदार्थ असलेल्या गांजाची तुरीच्या पिकातील लागवड मोडीत काढली आहे. ८१.६२ किलोग्रॅम वजनाची व साडेबारा लाखांचा ओल्या व सुक्या गांजाचा मुद्देमाल जप्त करीत, आरोपी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर यासंदर्भात मलकापूर पांग्रा येथील पोलिस चौकी संदर्भात संशयास्पद चर्चांनी वेग घेतला आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मलकापूर पांग्रा शिवारात आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड, वय ६५ वर्षे ह्या शेतकऱ्याने गट नंबर ५०६ मधील शेतात तूर पिकासोबतच गांजाची लागवड केलेली आहे. अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना मिळाली. आपल्या कर्मचाऱ्यांना गुप्तपणे पाठवून स्थानिक गुन्हे शाखेने खातरजमा केली. त्यावरुन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तयारी ...

मुंबईसह राज्यातील एकूण २९ मनपांचे मतदान १५ जानेवारीला तर १६ जानेवारीला मतमोजणी

इमेज
 मुंबईसह राज्यातील एकूण २९ मनपांचे मतदान १५ जानेवारीला तर १६ जानेवारीला मतमोजणी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा केली आहे.  त्यामध्ये १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.  आजच्या या घोषणेसह सर्वच महानगरपालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.👇 २० ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी दाखल करणे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २ जानेवारी २०२६ उमेदवारी मागे घेण्याची मुदत  ३ जानेवारी २०२६ निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी  १५ जानेवारी २०२६ मतदान  तर १६ जानेवारी २०२६ २९ महापालिकांमध्ये एकूण २८६९ जागा आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.  यामध्ये १४४२ महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या ३४१, एसटीच्या ७७ तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील ७५९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

मतदारांनो निवडणूक आपल्याच हातात घ्या ..!

इमेज
  मतदारांनो निवडणूक आपल्याच हातात घ्या ..! नाहीतर पाच वर्षे पस्तावण्याची वेळ येईल ...!! त्यांना फक्त आणि फक्त निवडून यायचे आहे ....!!! दीसना ✍️ देऊळगावराजा/सिंदखेडराजा  सिंदखेडराजा मतदारसंघात देऊळगावराजा व सिंदखेडराजा ह्या दोन नगरपालिका आहेत. काही वर्षांच्या गॅपनंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. फॉर्म भरणे सुरुही झाले आहे. पहिल्या दिवशीचे चित्र पाहता दोन्हीही ठिकाणी कुणीही अर्ज दाखल केलेला नाही. मात्र सोशल मीडियावर उमेदवारांचा महापूर लोटला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा  मॅनिफेस्टो जाहीर न करता बहुसंख्यांना काहीही करुन फक्त निवडून यायचे, एवढेच दृश्य दिसते. त्यामुळे मतदारांनी सावध होत, ही निवडणूक काळजीपूर्वक आपल्या हातात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर नको ते उमेदवार एकदा का निवडून आले की पस्तावण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी मतभेद विसरून आपल्या परिसरातील सर्वांनी एकत्र या. तेथील समस्या अडीअडचणी यांचा अभ्यास करुन नोंद ठेवा. इच्छुक उमेदवारासमोर त्याची मांडणी करा. जर उमेदवार समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तयार असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्गाने उमेदवाराची हम...
इमेज
तो मुख्याध्यापक निलंबित .. पुढेही कारवाई करण्याची विधवेची मागणी सिंदखेडराजा:- तालुक्यातील किनगावराजा पोलिस ठाण्यात अटक झालेल्या भानगडीबाज तथाकथित केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक बुरकुल याला निलंबित करण्यात आले असल्याचे वृत्त हाती आले आहे. याचवेळी तो बडतर्फ व्हावा अशी मागणीही सामाजिक शैक्षणिक, कृषी, व्यावसायिक आदि बऱ्याच क्षेत्रातून व्यक्त होत आहे. देऊळगावराजा तालुक्यात देऊळगावमही येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्याकपदी कार्यरत असलेला दामोदर माणिकराव बुरकुल या आरोपीने दुसरबीड येथील पतसंस्थेत खोटी माहिती देऊन बनावट कागदपत्रे सादर केली. त्या माध्यमातून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड झाली नाही. म्हणून पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी त्यासंदर्भात किनगावराजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत तथ्य समोर आले. म्हणून आरोपी दामोदर माणिकराव बुरकुल यास काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याची माहिती देऊळगावराजा येथील शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने दामोदर माणिकराव बुरकुल यास कारणे बजाव नोटीस देण्यात आली होती. याचवेळी वरिष्ठ अधिक...

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

इमेज
खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच  चर्चेचे एकच पेव फुटले सिंदखेडराजा:- तालुक्यातील दुसरबीड येथील पतसंस्थेत खोटी बनावट कागदपत्रे सादर करत  जि. प. शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकाने कर्ज घेतले आहे. त्याप्रकरणी त्या आरोपी मुख्याध्यापकास अटक होऊन जामीन सुद्धा मंजूर झाला आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाने कारवाईची कुठलीही पावले उचलली नसल्याची दबक्या आवाजात शंका कुशंकात्मक चर्चा होत आहे. सत्यजित अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा दुसरबीड, चे व्यवस्थापक दर्शन चोपडा यांनी यासंदर्भात किनगावराजा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतसंस्थेमध्ये आरोपी शिक्षक दामोदर माणिकराव बुरकुल, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, रा. शिंगणे नगर, देऊळगावराजा याने सन २०२० मध्ये खोटे बनावट कागदपत्रे सादर करुन ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामध्ये जे हमीपत्र होते, त्यावर गटशिक्षणाधिकारी यांच्या बनावट सह्या व शिक्के होते.  सन २०२३ मध्ये याप्रकरणी पोलिसांनी गु. र. नं. २९२/२०२३ कलम ४२०, ४६८, ४७१ भादंवि नुसार गुन्हा ...

मुख्याध्यापक पालवे यांचा भरगच्च सेवागौरव सोहळा संपन्न :: लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती

इमेज
  मुख्याध्यापक पालवे यांचा भरगच्च सेवागौरव सोहळा संपन्न  लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती  सिंदखेडराजा:- लोणार पं. स. अंतर्गत खापरखेड घुले येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक शिवप्रसाद दादाराव पालवे यांच्या निवृत्तीनंतरचा सेवागौरव सोहळा लोणार व सिंदखेडराजा तालुक्यातील शैक्षणिक, कृषी, सामाजिक, राजकीय आदि क्षेत्रातील मंडळींच्या भरगच्च उपस्थितीत नुकताच पार पडला.  बिबी येथील आनंद मंगल कार्यालयात दि. १ जुलै मंगळवारी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीराम आघाव, तर प्रमुख उपस्थितीत माजी आ. तोताराम कायंदे, माजी जि. प. अध्यक्षा श्रीमती नंदाताई देवानंद कायंदे, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, प्रभाकर ताठे, बद्रीनाथ बोडखे, लोणार पं. स. चे गटशिक्षणाधिकारी गजानन कुंभारे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, शरद घुगे, पी. एम. मापारी, शे. रा. चव्हाण, जंगलसिंग राठोड, गु. द. राठोड, संजय जायभाये, भागवत मापारी, गणेश कांगणे, शंकरराव जायभाये, अशोक उगलमुगले यांच्यासह लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती...

कॉंग्रेसच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी सुनील जायभाये

इमेज
कॉंग्रेसच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी सुनील जायभाये  सिंदखेडराजा:- तालुक्यातील दुसरबीड येथील कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते सुनील वसंतराव जायभाये यांची सिंदखेडराजा ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती केली असल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. ह्या पत्रामध्ये पंधरा दिवसांच्या आत कार्यकारिणी तयार करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. पक्ष बळकटीसाठी जोमाने प्रयत्न करण्याचेही नियुक्ती पत्रात म्हटले आहे. ह्या नियुक्ती पत्राची एक प्रत जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे देण्यात आली आहे.

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा?

इमेज
कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा? सिंदखेडराजा:- अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे राजकीय दृष्ट्या खळबळजनक वृत्त आज दि. २६ जून, गुरुवारी येऊन ठेपले आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता, संपूर्ण प्रकरण गुलदस्त्यातच असल्याची माहिती हाती आली आहे. कॉंग्रेसच्या प्रखर विचारांची धुरा खांद्यावर घेऊन, पडत्या काळातही एकनिष्ठ राहिलेल्या रिंढे यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला असावा? यासंदर्भात राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांच्या चर्चांना ऊत आला आहे, एवढे मात्र खरे ..!

राजकारण्यांनो .. बेगडी लोकांपासून सावधान ..

इमेज
  राजकारण्यांनो .. बेगडी लोकांपासून सावधान .. सिंदखेडराजा:- मतदारसंघात ज्यांची छुट भैय्या ओळख आहे, त्या लोकांनी कुठलाही पूर्वीचा राजकीय इतिहास माहीत नसतांना सत्तेसोबत आम्ही युवा नेतृत्व आहोत, अन् विद्यमान आमदार केवळ आमचे अन आमचेच ऐकतात, हे सांगत सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करणे सुरू केले आहे. ह्या प्रकरणामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचे दिसून आले आहे. हे निरीक्षण एका साध्या घटनेतून आले आहे. त्याचं असं झालं की, माझ्या जवळच्या नात्यातील तसेच जन्मापासूनच जगणे व त्यानंतर संघर्ष करीत, कौटुंबिक स्तरावर उभा झालेला एक भाऊ ह्याने मला सोबत चालण्याचा आग्रह केला. कुठल्याही सकारात्मक बाबीसाठी जर जमत असेल तर सदा न कदा हो म्हणणारा मी, त्याच्या सोबत गेलो. तिथे म्हणजे त्याठिकाणी गेल्यावर काही जीवाभावाच्या भेटी झाल्या. त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु, वैयक्तीक पातळीवर मी राजकीय नसल्याचे त्यांना ज्ञात असल्याने "दादा" कुणाच्यातरी सोबत असावा असा त्यांचा सार्थ विश्वास होताच नव्हेतर त्यातील अनेकांनी तो व्यक्तही केला. कुणी गुरु, कुणी दादा, कुणी सोयर...

आमदार उदंड जाहलेत ..! लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोजराव ....!!

इमेज
 आमदार उदंड जाहलेत ..! लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोजराव ....!! सिंदखेडराजा:- आ. श्रीमान मनोजराव, सर्वप्रथम आपल्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा ..! आम्हाला इतिहास बदलवायचा आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन आपण आगेकूच करीत आहात. त्याबद्दल कदापिही संशय नाही. परंतु, सगळ्यांना सोबत घेऊन चालतांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर आपले निरीक्षण नक्कीच होत असते, हे आपण किंवा आपली सहकारी मंडळी यांनी विसरता कामा नये. यापूर्वीही आमदार म्हणून डॉ. शिंगणे, डॉ. खेडेकर, आपले आजोबा तोतारामजी कायंदे, स्व. भास्कररावजी शिंगणे, स्व. जे. के. खरात या सगळ्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आपले पिताश्री स्व. देवानंद भाऊ कायंदे यांनी ती क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःला अनेक कसोट्यांवर झोकून दिले होते.  त्याचाच परिपाक म्हणून अनेक राजकीय समीकरणे पाहत मतविभाजन होत आपणांस लोकांनी निवडून दिलेले आहे. आपण केवळ एका जातीचे आमदार नाहीत आणि नसू  ही नव्हे तर समाज ही परिभाषा समजून घेत आपण समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा ह्या अपेक्षेप्रमाणे आपण तेवढं प्रत्यक्ष रुपात करताही, त्याबद्दल आपले नक्कीच अभिनंदन ..! या...

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा

इमेज
  शिंगणे, कायंदे परिवार .. अन  मी दीसना  खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा  (दीपक सत्यभान नागरे) सिंदखेडराजा:- नवनिर्वाचित आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांच्या वर्तनाचा पत्रकार म्हणून निरीक्षण व अभ्यास करीत, त्यातून जे काही आकलन झाले, त्यासंदर्भात मी एक वृत्त प्रकाशित केले. त्यातून काही जळकुट्यांची 'चांगलीच ठणकली' म्हणा किंवा खास गावरान भाषेत 'चांगलीच खकानली' त्यातील ज्यांची पार्श्वभूमी स्वार्थातून पलटूराम अशी राहिलेली आहे. अशांनी कुठलाही प्रकारचा राजकीय, सामाजिक आदि इतिहास माहीत नसतांना, फक्त कुठलातरी राजकीय लाभ मिळावा व आपण केवढे पायचाटू आहोत? हे प्रकाशात यावे, ह्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करीत, थयथयाट करणे हाती घेतले आहे. त्याला हे उत्तर मी देत आहे. माझी वैचारिक भूमिका ही सदैव शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीला आधारित आहे. त्यातूनच स्व. सुरेशभाऊ सोनुने यांनी माझे शिक्षक असलेले वडील स्व. सत्यभान बाळाजी नागरे यांना विचारले व मला संघटनात्मक कार्यासाठी मी १९८१ पासून कॉग्रेसच्या राजकारणात आणले. तेव्हापासून मी एन‌एस‌युआय या विद्यार्थी चळवळी...

ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांचा वकील संघातर्फे सत्कार

इमेज
 ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांचा वकील संघातर्फे सत्कार  सिंदखेडराजा:- ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांची भारत सरकार कडून नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाचे उपविधिक सल्लागार हेमंतकुमार यांनी नोटरी अधिनियम १९५२ (१९५२ चे ५३) अनुसरुन त्या संदर्भातील प्रमाणपत्र जारी केले आहे.  या यशाबद्दल सिंदखेडराजा तालुका वकील संघाच्या वतीने ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांचा वकील संघातर्फे  आज दि. २४ फेब्रुवारी, सोमवारी  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ अधिवक्ता ॲड.ठाकरे, ॲड. चव्हाण, ॲड. निशीकांत राजे, ॲड. ठोसरे, ॲड. राजीव मंगळवेढे, ॲड. राहुल विघ्ने, ॲड. देवउपाध्ये, ॲड. अर्पित मिनासे, ॲड. फारुख शेख, ॲड. राहुल साळवे, ॲड. दीपक राजे, ॲड. रुपाली कुलकर्णी, ॲड. अश्विनी सावजी, ॲड. उबाळे, ॲड. आरेफ पठाण, ॲड. सचिन देशमुख, ॲड. गौतम कंकाळ, ॲड. हाडे, रामेश्वर मेहेत्रे, ॲड. गजानन कोरडे आदि प्रमुख उपस्थितीत होते.  सत्कार समारंभाचे आयोजन व यशस्वी करण्यासाठी सिंदखेडराजा तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. प्रदीप सोनकांबळे, उपाध्यक्ष‌ ॲड.मोहसीन शेख, सचिव ॲड. विकास पवार, ॲड....

वास्तविक पत्रकारिता करावी का ..?

इमेज
  खऱ्याचं खरं .. खोट्याचं खोटं .. वास्तविक पत्रकारिता  करावी का ..? नुकतीच एक बातमी निदर्शनास आली  जिल्ह्यातील एका तथाकथित  नामांकित पत्रकाराने  ती टाकली होती. जी बाब कुठेही घडू शकत नाही,  असा राजकीय अंदाज  जिल्ह्यातील त्या मतलबी  पत्रकाराने घेतल्याचे दिसून आले. पण अंदाज राजकीय होता. मात्र त्यात नवल असे की, वृत्ताची सत्यता पडताळून पाहणे  गरजेचे असतांना .. व्यावसायिक दृष्टिकोनातून  जाहिरातीची बरसात होईल, या हिशोबातून संपादकानेही ते वृत्त प्रकाशित केले. ते वृत्त वाचतांना  लोण्याचा भाव मात्र  आवर्जून आठवला. त्या पत्रकाराने किती आणि काय लिहावं? दरम्यान  नुकताच पार पडलेला एक प्रसंग समोर आला.  सोहळाच असावा  असा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी सामाजिक क्षेत्रातील  एक प्रभावी व्यक्तिमत्त्व  ज्याने मला निमंत्रित केले,  ती सोबत होती. सोहळा पार पडला. माझ्या सारख्याने  जाणीवा व नेणीवा ठेवत  जे जसे घडले त्यानुसार  वृत्तांकन केले. त्यात तो राजकीय जे काही बोलला  ते जसेच्या तसे लिहिले हो...

संत चोखोबांच्या जन्मस्थान विकासासाठी हेवेदावे विसरु या - आ. मनोज कायंदे

इमेज
  संत चोखोबांच्या जन्मस्थान विकासासाठी हेवेदावे विसरु या - आ. मनोज कायंदे  आंतरराष्ट्रीय धर्तीवर संशोधन केंद्र निर्माण व्हावे - हर्षवर्धन सपकाळ  सिंदखेडराजा:- संत चोखोबांच्या जन्मस्थानाचा विकास जन्मोत्सवाच्या प्रणेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. त्यासाठी आपापसातील हेवेदावे विसरण्याचे आवाहनही  आ. मनोज कायंदे यांनी केले. संत चोखोबांच्या ७५७ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन आज दि. १४ जानेवारी, मंगळवारी मेहुणाराजा, ता. देऊळगावराजा येथे करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात पुढे बोलतांना आ. कायंदे यानी अध्यात्माला विज्ञानाची जोड देत विकासपथावर मार्गरत राहण्याची गरज व्यक्त केली. तर हा जन्मोत्सव हा लोकोत्सव होण्यासाठी पुढील जन्मोत्सव तीन दिवसांचा असेल असे अभिवचन त्यांनी दिले. मागील काळात माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आणलेल्या साडेचार कोटी निधीचाही उल्लेख त्यांनी केला.  यावेळी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. तोताराम कायंदे, सरपंच नंदाताई बोंद्रे, संतोष खांडेभराड, माजी जि. प. उपाध्यक्ष गंगाधर जाधव, प्रा. कमलेश खिल्लारे, भगवान मुंढे, देविदास ठाकरे, राजू चित्ते,...