राजकारण्यांनो .. बेगडी लोकांपासून सावधान ..
राजकारण्यांनो ..
बेगडी लोकांपासून सावधान ..
सिंदखेडराजा:- मतदारसंघात ज्यांची छुट भैय्या ओळख आहे, त्या लोकांनी कुठलाही पूर्वीचा राजकीय इतिहास माहीत नसतांना सत्तेसोबत आम्ही युवा नेतृत्व आहोत, अन् विद्यमान आमदार केवळ आमचे अन आमचेच ऐकतात, हे सांगत सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करणे सुरू केले आहे.
ह्या प्रकरणामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचे दिसून आले आहे.
हे निरीक्षण एका साध्या घटनेतून आले आहे.
त्याचं असं झालं की, माझ्या जवळच्या नात्यातील तसेच जन्मापासूनच जगणे व त्यानंतर संघर्ष करीत, कौटुंबिक स्तरावर उभा झालेला एक भाऊ ह्याने मला सोबत चालण्याचा आग्रह केला. कुठल्याही सकारात्मक बाबीसाठी जर जमत असेल तर सदा न कदा हो म्हणणारा मी, त्याच्या सोबत गेलो.
तिथे म्हणजे त्याठिकाणी गेल्यावर काही जीवाभावाच्या भेटी झाल्या. त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु, वैयक्तीक पातळीवर मी राजकीय नसल्याचे त्यांना ज्ञात असल्याने "दादा" कुणाच्यातरी सोबत असावा असा त्यांचा सार्थ विश्वास होताच नव्हेतर त्यातील अनेकांनी तो व्यक्तही केला. कुणी गुरु, कुणी दादा, कुणी सोयरे, कुणी भाऊ म्हणत स्वागतही केले. घरी येण्याचे आमंत्रणही दिले.
परंतु, मी कुठेही गेलो नाही. फक्त रमेश ह्या मित्राला भेटून परतलो.
त्या दरम्यान मी जेव्हा तेथे पोहोचलो होतो, त्यावेळी तिथून घरकाम करणारी ताई गेल्यावर म्हणजे अगदी पहाटेच आमची बहिण जालन्यावरुन घरी पोहोचली. तिथे बसलेलो असतांना माझ्या संघर्षवीर भावाने ती आल्याचे पाहिले अन मग आम्ही दोघेही तिच्याकडे गेलो. ख्याली खुशालीचे बोलणे झाल्यावर, कुठलाही आविर्भाव न ठेवणारी आमची बहिण, आपला धर्म निभवतांना "बाहेर काहुन आत बसा ना" म्हणाली. पण परिपेक्ष राजकारणी आहे. आपण आपली मर्यादा पाळली पाहिजे, असे जाणून मी म्हणालो की, बाहेरच "वारसोई" बसतो. त्यानंतर आमची बहिण आत गेली.
त्यानंतर सत्तेच्या माध्यमातून स्वतःचा उदोउदो करणारेही भेटले. त्यात आजूबाजूला राजकीय वर्दळ वाढली. अनेकजण अवतीभवती जमले, काही ओळखीचे तर बहुतांश अनोळखी. त्याच दरम्यानचा एक प्रसंग म्हणजे माझ्या कानावर असे आले की, मी नसतो तर ते निवडूनच आले नसते; असं एकजण बोलला. ऐकतांना मला अगदीच रमणीय वाटले. त्याचवेळी गर्दीतील एक घटक असलेल्या माझ्यातील अभ्यासक जागा झाला. आजूबाजूच्या मंडळीची विचारपूस करून, मी त्या छुटभैय्याचा इतिहास घेतला. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, तसेच स्वतःच्या गल्ली, वार्ड, शहरात कुठल्याही प्रकारची राजकीय ओळख एवढं काहीही नसलेला, परंतु, फक्त स्वतःचं इन शर्ट, बूट वगैरे असं रुबाब पाडणारं राहणीमान यातून इतरांना भुरळ पाडायची. त्यातून एका वर्तुळात यायचं एवढी जबर इच्छाशक्ती त्या तरुणात दिसली.
त्या निरीक्षणातून जे कसलेले राजकारणी आहेत, ते अश्या ऐऱ्यागैऱ्यांना आपले राजकीय कसब वापरुन कसे दूर ठेवतात, हे अनुभवले असल्याचा व तेच ऐरेगैरे आता आपली बेगडी छाप पाडून नवीन राजकारण्यांना विविध क्लृप्त्या लढवत फशी पाडण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ठळकपणे दिसून आले आहे.
यामुळेच सत्तेसाठी राजकारण करतांना जे राजकारणी नवीन प्रयोग करतील, त्या सगळ्यांनी वेळीच सावध होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादनात्मक आवाहन या लेखातून करीत आहे.
नाहीतर 'गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता' असे म्हणण्याची वेळ येऊ नये.
राम ..! राम ....!!
जय महाराष्ट्र ....!!!🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏