शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा
शिंगणे, कायंदे परिवार ..अन मी दीसना
खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो ..
हा घ्या ढळढळीत पुरावा
(दीपक सत्यभान नागरे)
सिंदखेडराजा:- नवनिर्वाचित आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांच्या वर्तनाचा पत्रकार म्हणून निरीक्षण व अभ्यास करीत, त्यातून जे काही आकलन झाले, त्यासंदर्भात मी एक वृत्त प्रकाशित केले. त्यातून काही जळकुट्यांची 'चांगलीच ठणकली' म्हणा किंवा खास गावरान भाषेत 'चांगलीच खकानली' त्यातील ज्यांची पार्श्वभूमी स्वार्थातून पलटूराम अशी राहिलेली आहे. अशांनी कुठलाही प्रकारचा राजकीय, सामाजिक आदि इतिहास माहीत नसतांना, फक्त कुठलातरी राजकीय लाभ मिळावा व आपण केवढे पायचाटू आहोत? हे प्रकाशात यावे, ह्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करीत, थयथयाट करणे हाती घेतले आहे.
त्याला हे उत्तर मी देत आहे.
माझी वैचारिक भूमिका ही सदैव शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीला आधारित आहे. त्यातूनच स्व. सुरेशभाऊ सोनुने यांनी माझे शिक्षक असलेले वडील स्व. सत्यभान बाळाजी नागरे यांना विचारले व मला संघटनात्मक कार्यासाठी मी १९८१ पासून कॉग्रेसच्या राजकारणात आणले. तेव्हापासून मी एनएसयुआय या विद्यार्थी चळवळीत सक्रिय होतो. त्यानंतर अनेक महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली. त्याच काळात आताचे माजी आमदार व शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते डॉ. शशिकांत खेडेकर (माझे वडील व यांचे वडील स्व. नरसिंगराव रुस्तुमराव खेडेकर एकाच शाळेत शिक्षक तर होतेच, परंतु सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे उपाख्य मोठे साहेब यांचे प्रमुख कार्यकर्ते होते व माझी स्व. माय व यांच्या आई सुमनबाई ज्यांना आम्ही सर्व बाई म्हणून संबोधतो, ह्या दोघी सख्ख्या बहिणींप्रमाणे मैत्रीणी होत्या. त्यामुळे डॉ. शशिकांत खेडेकर उर्फ माझा विकासदादा हा माझा मोठा भाऊ आहे.) विकास दादा नागपूर येथून आल्यावर राज्यातील व जिल्ह्यातील आमचा नेता होता. त्याच दरम्यान जि. प. निवडणूका जाहीर झाल्यावर डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सोबत मला सुद्धा सावखेड तेजन ह्या मतदार संघासाठी विचारणा झाली होती. नव्हेतर डॉ. खेडेकर यांनी मुलाखतीसाठी मला सोबत बुलढाणा येथील कॉग्रेस भवन पर्यंत नेले होते. परंतु, मला उभे राहायचे नसल्याने मी तेथे जाऊनही मुलाखतीला गैरहजर राहिलो होतो.
त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या त्यांचा उल्लेख इथे करीत नाही. परंतु, तेव्हा पासून आतापर्यंत मी मोठ्या साहेबांच्या जातीभेद विरहीत विचारांसोबत आहे.
१९९५ ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या प्रचारार्थ, स्व. मुन्ना सेठ शिंगणे व स्व. किशोर चौधरी यांना सांगून स्वतः स्ट्रॅटेजी निर्माण केली. त्याला अनुसरून रात्रीचा दिवस करुन मी काय काय प्रकार अवलंबवित, अन कस कश्या प्रकारे काम केले हे त्यावेळी माझ्या सोबतीला असणारे केवळ मतदारसंघातीलच नव्हेतर जिल्ह्यातील अनेक जण जाणतात. याच निवडणूक काळात, माझे उंबरखेड येथील मित्र स्व. देवानंद खंडुजी कायंदे यांची व माझी मैत्री आणखीच घट्ट झाली. दोघेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कार्यकर्ते असल्याने, मी देवानंद भाऊंच्या गजानन महाराजांच्या नावाने असलेल्या संस्थेला जोडल्या गेलो. त्या संस्थेच्या माध्यमातुन पाणलोट विकास कार्यक्रमाची कामे होणार असल्याचे आम्हाला कळले. त्यावेळी त्यांनी मला अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथून परत आल्यावर, भाऊंनी माझी संस्थेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक केली. त्याच काळात डॉ. राजेंद्र शिंगणे हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी कुणालाही न सांगता माझ्या माघारी, माझ्या घरी येऊन आईवडिलांची भेट घेऊन, माझ्या संदर्भात विचारपूस केली. माझी राहणी व बोलणे खेडवळपणाचेच असल्याने मी शिक्षित आहे कि नाही, असे त्यांना वाटायचे. परंतु, आईवडिलांच्या भेटीनंतर त्यांना माझ्या शिक्षणाविषयी कळले. तू एवढा शिकलेला असून सुद्धा, ते नेमकेपणाने जाणवत नसल्याचे म्हणत प्रेमाने झापले. इकडे देवानंद भाऊ अन मी त्यांच्या निळ्या राजदूत गाडी वरुन देऊळगावराजा परिसरातील खेडोपाडी जाऊन, पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांसाठी लोकांच्या भेटीगाठी घेत सर्व्हे सुध्दा करीत होतो. दरम्यानच्या काळात नंदाताई जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या त्यावेळी देवानंद भाऊंनी मला बुलढाणा येथे खूप वेळा सोबत नेले होते. नव्हेतर देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांच्या लग्नासाठी देवानंद भाऊ, नंदाताई, त्यावेळचा छोटा सतीश व पं. स. सभापती विठ्ठल मैनाजी पारेकर आम्ही तीन ते चार दिवस नाशिक परिसरात मुक्कामी होतो.
इकडे देवानंद भाऊंच्या संस्थेच्या पाणलोट क्षेत्र विकासाची कामे सुरु होणार होती. त्याचवेळी मी साखरखेर्डा येथील डॉ. शिंगणे साहेबांच्या संस्थेत मुलाखत दिलेली होती. तेथे शिक्षक म्हणून नियुक्ती होणार असे समजताच मी देवानंद भाऊंच्या कानावर ही गोष्ट घातली. त्याच्या पुढच्याच शनिवारी डॉ. शिंगणे साहेब हे देऊळगावराजा येथील रेस्ट हाऊस वर आले असता, आम्ही दोघेही साहेबांना भेटलो. तिथे साहेबांच्या समक्ष आमची चर्चा झाली. त्यावेळी देवानंद भाऊंनी पाणलोटसाठी निधी येण्यात असून कामे सुरु करायची असल्याने माझी गरज लागणार हे साहेबांना सांगितले. तेव्हा साहेबांनी देवानंद भाऊंना, आपण दिलेले पद व नोकरी अस्थायी असल्याचे भाऊंना स्पष्ट केले व शाळेतील शिक्षकाच्या नोकरीत शेवटी पेन्शन प्राप्त होईल असे सांगत, आता निर्णय दीपकने घ्यावा म्हणत, चेंडू माझ्या कोर्टात ढकलून दिला.
यामुळे मी चांगलाच गोंधळून गेलो. निर्णयच घेता येईना. त्यावेळी देवानंद भाऊंनीच मला साहेबांच्या भूमिकेत भविष्य आहे, त्यामुळे मला शाळेत रुजू व्हावे, असा आग्रही सल्ला दिला.
दरम्यानच्या काळात ज्यांना मी राजकीय व पत्रकारितेतील गुरु मानत होतो, त्या स्व. सुरेशभाऊ सोनुने यांचे अपघाती निधन झाले, माझ्यासारख्या अनेकांना तो अत्यंत मोठा धक्का होता. त्या दिवसापासून शिव, फुले, शाहू व आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा मी राजकारणातून मागे होत, पत्रकारितेत अधिक सक्रिय झालो व अजूनही सक्रियच आहे व खेडवळ राहणी व बोलणे कायमच आहे.
त्याचाच परिणाम हा आहे की, "सांच को आंच नही" या उक्तीच्या भूमिकेतून आज ठासून उत्तर देत आहे.

छान दादा
उत्तर द्याहटवाअशा गोष्टीचा जास्त विचार करावयाचा नसतो, सर..
उत्तर द्याहटवारेस्टहाऊसवर डॉ शिंगणे साहेबांना वेळोवेळी भेटणे, विनंती करण्यासाठी मी पण सोबत होतो. साहेबांच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्याध्यापक यांना निरोप देण्यासाठी, तसेच पद मान्यता पासून नेमणुकी पर्यंत मी दीपक सोबत होतो. ....माझी मोटरसायकल आणि दीपक....दे राजा ...बुलडाणा ....साखरखेडा ....अजूनही आठवते.....
उत्तर द्याहटवाकोणाची खकानली समजलं नाही सर.. पणं जाऊ दया एवढं मनावर नाही घ्यायचं
उत्तर द्याहटवाLet it be. Sirji.
उत्तर द्याहटवाJabardast. ..
Badhiya sir 🙏
उत्तर द्याहटवाभाऊ आपल्या बाबांवर एक लेख अपेक्षित, वसंतराव नाईक, अर्जुनराव कस्तुरे, बाळकृष्ण वासनिक, शंकराव राख यांच्या सोबतचा सहवास व त्यांचे सोबतचे कार्य. कदाचित आपल्याला ही तो वारसा लाभला.
उत्तर द्याहटवा