तो मुख्याध्यापक निलंबित ..

पुढेही कारवाई करण्याची विधवेची मागणी



सिंदखेडराजा:- तालुक्यातील किनगावराजा पोलिस ठाण्यात अटक झालेल्या भानगडीबाज तथाकथित केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक बुरकुल याला निलंबित करण्यात आले असल्याचे वृत्त हाती आले आहे. याचवेळी तो बडतर्फ व्हावा अशी मागणीही सामाजिक शैक्षणिक, कृषी, व्यावसायिक आदि बऱ्याच क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

देऊळगावराजा तालुक्यात देऊळगावमही येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्याकपदी कार्यरत असलेला दामोदर माणिकराव बुरकुल या आरोपीने दुसरबीड येथील पतसंस्थेत खोटी माहिती देऊन बनावट कागदपत्रे सादर केली. त्या माध्यमातून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड झाली नाही. म्हणून पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी त्यासंदर्भात किनगावराजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत तथ्य समोर आले. म्हणून आरोपी दामोदर माणिकराव बुरकुल यास काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती.

त्याची माहिती देऊळगावराजा येथील शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने दामोदर माणिकराव बुरकुल यास कारणे बजाव नोटीस देण्यात आली होती. याचवेळी वरिष्ठ अधिकारी यांना कागदोपत्री सुद्धा माहिती देण्यात आली होती.

त्या नोटीसला समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

म्हणून आरोपी दामोदर माणिकराव बुरकुल यांना निलंबित केले असल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे.

बुरकुल नामक ह्या आरोपी असलेल्या मानव प्राण्यावर अनेक आरोप असल्याचे कळत आहे.

यापूर्वी त्या आरोपीने अपंग, अनेक आर्थिक बँका व पतसंस्थेतून कर्ज घेऊन फसवले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

नव्हेतर आरोपी दामोदर माणिकराव बुरकुल याच्यावर एक प्लॉट ज्यावर घर बांधकाम झालेले अशा मालमत्तेला दोघांना विकल्या गेल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यातून ह्या आरोपी दामोदर माणिकराव बुरकुल याला कारणीभुत ठरवत त्याला सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी त्याने फसवलेल्या श्रीमती अर्चना अशोक सानप यांनी केली आहे.

यासगळ्या प्रकरणात पुढे त्या आरोपीला गुन्हेगारीत गुंतविण्यात येरे की वाचविण्यासाठी प्रयत्न होतात हे पाठीराखा असलेल्या व्यक्तीवर अवलंबून आहे, एवढे मात्र खरे ..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा