ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांचा वकील संघातर्फे सत्कार
ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांचा वकील संघातर्फे सत्कार
सिंदखेडराजा:- ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांची भारत सरकार कडून नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाचे उपविधिक सल्लागार हेमंतकुमार यांनी नोटरी अधिनियम १९५२ (१९५२ चे ५३) अनुसरुन त्या संदर्भातील प्रमाणपत्र जारी केले आहे.
या यशाबद्दल सिंदखेडराजा तालुका वकील संघाच्या वतीने ॲड. ज्ञानेश्वर जायभाये यांचा वकील संघातर्फे आज दि. २४ फेब्रुवारी, सोमवारी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ अधिवक्ता ॲड.ठाकरे, ॲड. चव्हाण, ॲड. निशीकांत राजे, ॲड. ठोसरे, ॲड. राजीव मंगळवेढे, ॲड. राहुल विघ्ने, ॲड. देवउपाध्ये, ॲड. अर्पित मिनासे, ॲड. फारुख शेख, ॲड. राहुल साळवे, ॲड. दीपक राजे, ॲड. रुपाली कुलकर्णी, ॲड. अश्विनी सावजी, ॲड. उबाळे, ॲड. आरेफ पठाण, ॲड. सचिन देशमुख, ॲड. गौतम कंकाळ, ॲड. हाडे, रामेश्वर मेहेत्रे, ॲड. गजानन कोरडे आदि प्रमुख उपस्थितीत होते.
सत्कार समारंभाचे आयोजन व यशस्वी करण्यासाठी सिंदखेडराजा तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. प्रदीप सोनकांबळे, उपाध्यक्ष ॲड.मोहसीन शेख, सचिव ॲड. विकास पवार, ॲड. शेळके यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏