मुख्याध्यापक पालवे यांचा भरगच्च सेवागौरव सोहळा संपन्न :: लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती

 मुख्याध्यापक पालवे यांचा भरगच्च सेवागौरव सोहळा संपन्न 

लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती 




सिंदखेडराजा:- लोणार पं. स. अंतर्गत खापरखेड घुले येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक शिवप्रसाद दादाराव पालवे यांच्या निवृत्तीनंतरचा सेवागौरव सोहळा लोणार व सिंदखेडराजा तालुक्यातील शैक्षणिक, कृषी, सामाजिक, राजकीय आदि क्षेत्रातील मंडळींच्या भरगच्च उपस्थितीत नुकताच पार पडला. 

बिबी येथील आनंद मंगल कार्यालयात दि. १ जुलै मंगळवारी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीराम आघाव, तर प्रमुख उपस्थितीत माजी आ. तोताराम कायंदे, माजी जि. प. अध्यक्षा श्रीमती नंदाताई देवानंद कायंदे, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, प्रभाकर ताठे, बद्रीनाथ बोडखे, लोणार पं. स. चे गटशिक्षणाधिकारी गजानन कुंभारे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, शरद घुगे, पी. एम. मापारी, शे. रा. चव्हाण, जंगलसिंग राठोड, गु. द. राठोड, संजय जायभाये, भागवत मापारी, गणेश कांगणे, शंकरराव जायभाये, अशोक उगलमुगले यांच्यासह लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिमा पुजनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शिवप्रसाद दादाराव पालवे व त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई, आई श्रीमती सुभद्राबाई यांचा मान्यवरांच्या हस्ते आहेर देत शाल, श्रीफळ, प्रतिमा व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विष्णू गायकवाड, तर आभारप्रदर्शन दीपक नागरे यांनी केले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी खापरखेड घुले, ता. लोणार व भंडारी, ता. सिंदखेडराजा येथील शैक्षणिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा