देऊळगावराजा शहरातील ७१.६७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क प्रभाग क्र. १०(२) पिंपळनेर मध्ये सर्वाधिक ८७.२३ टक्के मतदान
देऊळगावराजा शहरातील ७१.६७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
प्रभाग क्र. १०(२) पिंपळनेर मध्ये सर्वाधिक ८७.२३ टक्के मतदान
देऊळगावराजा:- नगरपालिका निवडणुकीसाठी येथे काल दि. २० डिसेंबर, शनिवारी मतदान झाले. मात्र काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती. त्यामुळे त्यानंतर सर्व बूथ वरील मतदानाची संख्या घेऊन, त्याची सांख्यिकी करण्यास वेळ लागल्याने, एकूण एक मतदानसंख्या व टक्केवारी रात्री अगदीच उशीरा हाती आली आहे. शहरातील झालेल्या मतदानात एकूण ७१.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
शहरातील एकूण मतदार २९ हजार ३२६ त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ८८५ तर महिला मतदारांची संख्या १४ हजार ४४१ एवढी आहे. त्यापैकी १० हजार ९०६ पुरुष व १० हजार १११ महिलांनी अशा एकूण २१ हजार १७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच झालेल्या मतदानाची टक्केवारी ७१.६७ एवढी आहे.
प्रभागनिहाय मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्र. १(१) मध्ये ७४ टक्के, क्र. १(२) मध्ये ७९.०५ टक्के व क्र. १(३) मध्ये ७०.१० टक्के
प्रभाग क्र. २(१) मध्ये ६६.६० टक्के, क्र. २(२) मध्ये ५७.३९ टक्के, क्र. २(३) मध्ये ५९.४० टक्के,
प्रभाग क्र. ३(१) मध्ये ७६.२२ टक्के, क्र. ३(२) मध्ये ७४.२५ टक्के, क्र. ३(३) मध्ये ७९.७७ टक्के,
प्रभाग क्र. ४(१) मध्ये ६५.८२ टक्के, क्र. ४(२) मध्ये ८१.८० टक्के, क्र. ४(३) मध्ये ७१.२२ टक्के,
प्रभाग क्र. ५(१) मध्ये ७२.०५ टक्के, क्र. ५(२) मध्ये ६७.६५ टक्के,
प्रभाग क्र. ६(१) मध्ये ७७.५८ टक्के, क्र. ६(२) मध्ये ६४.३३ टक्के, क्र. ६(३) मध्ये ६६.६४ टक्के,
प्रभाग क्र. ७(१) मध्ये ६८.४४ टक्के, क्र. ७(२) मध्ये ७४.७१ टक्के
प्रभाग क्र. ८(१) मध्ये ७९.९२ टक्के, क्र. ८(२) मध्ये ६८.१० टक्के, क्र. ८(३) मध्ये ७३.६७ टक्के
प्रभाग क्र. ९(१) मध्ये ७८.६३ टक्के, क्र. ९(२) मध्ये ६९.८३ टक्के, क्र. ९(३) मध्ये ७२.५१ टक्के
प्रभाग क्र. १०(१) मध्ये ७२.६४ टक्के, क्र. १०(२) मध्ये ८४.५५ टक्के, क्र. १०(३) मध्ये ६४.८९ टक्के, क्र. १०(४) मध्ये ६७.०२ टक्के तर क्र. १०(५) मध्ये ७३.९३ टक्के एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क नोंदवला आहे.
आज मतमोजणी होणार असून, त्यामध्ये मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे, ते निश्चित होईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏