मतदारांनो निवडणूक आपल्याच हातात घ्या ..!

 मतदारांनो निवडणूक आपल्याच हातात घ्या ..!

नाहीतर पाच वर्षे पस्तावण्याची वेळ येईल ...!!

त्यांना फक्त आणि फक्त निवडून यायचे आहे ....!!!


दीसना ✍️

देऊळगावराजा/सिंदखेडराजा 

सिंदखेडराजा मतदारसंघात देऊळगावराजा व सिंदखेडराजा ह्या दोन नगरपालिका आहेत. काही वर्षांच्या गॅपनंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. फॉर्म भरणे सुरुही झाले आहे. पहिल्या दिवशीचे चित्र पाहता दोन्हीही ठिकाणी कुणीही अर्ज दाखल केलेला नाही. मात्र सोशल मीडियावर उमेदवारांचा महापूर लोटला आहे.

त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा  मॅनिफेस्टो जाहीर न करता बहुसंख्यांना काहीही करुन फक्त निवडून यायचे, एवढेच दृश्य दिसते.

त्यामुळे मतदारांनी सावध होत, ही निवडणूक काळजीपूर्वक आपल्या हातात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर नको ते उमेदवार एकदा का निवडून आले की पस्तावण्याची वेळ येऊ शकते.

त्यासाठी मतभेद विसरून आपल्या परिसरातील सर्वांनी एकत्र या. तेथील समस्या अडीअडचणी यांचा अभ्यास करुन नोंद ठेवा. इच्छुक उमेदवारासमोर त्याची मांडणी करा. जर उमेदवार समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तयार असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्गाने उमेदवाराची हमी घ्या. 

सामाजिक, राजकीय, वैचारिक भूमिका, विशेषतः आर्थिक इत्यादि क्षेत्राच्या दृष्टीने उमेदवाराच्या चारित्र्याची तपासणी करा.

काहीही करुन त्यांच्या वरवरच्या आश्वासने, प्रलोभने, आमिषे आदि बाबींवर भुलून जाऊ नका.

उमेदवारांना पालीकेत जनतेसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आहे की नाही? याबाबत विचारणा करा.

आणि हो उमेदवार हा आपल्या नात्यातला, जातीतला, पंथातला, धर्मातला ह्या बाबी स्पष्टपणे विसरुन जाऊन त्याची पात्रता तपासा जर पात्र ठरत असेल तरच त्याला गृहीत धरा. सगळ्या उमेदवारांची संवैधानिक तुलना करा.

त्यानंतरच मतदान कुणाला द्यायचे? ते ठरवा नाहीतर पाच वर्षे पस्तावण्याशिवाय आपल्या हाती काहीच असणार नाही, एवढे मात्र निश्चित आहे ..!

म्हणून पुन्हा एकदा लेख वाचा.

आपले आणखी काही प्रश्न, अपेक्षा, सूचना असल्यास 8007471886 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!