अनपेक्षितपणे डॉ. शिंगणे यांचा उमेदवार सौरभ तायडे विजयी: प्रस्थापितांना अक्षरशः लोळविले तर देऊळगावराजात माधुरी शिपणेने लावला झेंडा

 


अनपेक्षितपणे डॉ. शिंगणे यांचा उमेदवार सौरभ तायडे विजयी: प्रस्थापितांना अक्षरशः लोळविले तर देऊळगावराजात माधुरी शिपणेने लावला झेंडा


सिंदखेडराजा:- 
येथील पालिका निवडणुकीत माजी मंत्री डॉ. शिंगणे यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ तायडे यांनी बड्याबड्या उमेदवारांना अक्षरशः लोळवत एकहाती विजय मिळविला आहे.
ह्या नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. तर राजकीय क्षेत्रातील अनपेक्षित निकालामुळे मतदारसंघातील  राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत सौरभ विजय तायडे यांना ४२८७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार शाम किसनराव मेहेत्रे यांना ४११८ मते मिळाली. शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार अतिष बाळाजी तायडे यांना ३४६३ मते मिळाली.याशिवाय बहुजन समाज पार्टीचे रंगनाथ आसाराम खाटीकमारे यांना १२९,अपक्ष दिलीप भिकाजी चौधरी यांना १५८,अपक्ष ॲड. सैय्यद मुबीन सैय्यद नईम यांना ४६ मते मिळाली असून नोटा ४६ मते पडले आहे.
विजयी नगरसेवक व त्यांना पडलेले मतदान पुढील प्रमाणे आहेत.प्रभाग १ श्रेया उमेश खरात - राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) - ६४९, संतोष प्रकाश मेहेत्रे - भाजपा - ४६५, प्रभाग २- कैलास नारायण मेहेत्रे -  ५५२ शिवसेना (शिंदे ), सोनाली गजानन मेहेत्रे - ५२२ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ), प्रभाग ३-निलेश देविदास ठाकरे -५९५ राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार),सिंधू जगन ठाकरे - ३९३राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ),प्रभाग ४- पूजा मंगेश खुरपे - ५०५ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ), आवेश खान नाजीम खान - ४३५राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार),प्रभाग ५- संगीता किशोर म्हस्के - ५२२ शिवसेना (शिंदे ),कैलास नागोराव म्हस्के - ४६२ राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार),प्रभाग ६ - जासमीन अजीम तांबोळी - ७५२ राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार),खान हाजेरा नुजहत फारूक अली खान - ९८६ राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार),प्रभाग ७- गौतम प्रकाश खरात - ५१० शिवसेना (शिंदे सेना), अंबिका कैलास कोरडे - ४२५ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), प्रभाग ८- पोर्णिमा ओम भुसारे -४९० राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार),कृष्णा माणिक मेहेत्रे - ३७९ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), प्रभाग ९- पुष्पा रामदास बारवकर - ५१७ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार),दिलीप नारायण आढाव - ४३५ राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार) प्रभाग १०- दिपाली योगेश मस्के - ५६४ शिवसेना (शिंदे सेना),संदीप सखाराम मेहेत्रे - ७०४ शिवसेना (शिंदे सेना) हे विजयी झाले आहेत.

देऊळगावराजा पालिका अध्यक्षपदी माधुरी शिपणे विजयी 
देऊळगावराजा:- येथील नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माधुरी तुषार शिपणे ह्या विजयी झाल्या आहेत. तर पालिकेतील नगरसेवकांचे एकूण २१ संख्याबळ बघता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सर्वात जास्त ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना शिंदे गट मिळून स्थापन केलेल्या नगरविकास आघाडीने ७ जागा मिळवल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे ३ नगरसेवक निवडून आले असून शिवसेना उबाठा गटाचे २ नगरसेवक निवडून आले आहेत.
विजयी झालेल्या नगरसेवकात प्रभाग क्र. १(अ) मध्ये मीना सुभाष दराडे, क्र. १(ब) मध्ये संदीप कोंडीराम शिंदे, प्रभाग क्र. २(अ) मध्ये वैशाली विकास कासारे, क्र. २(ब) मध्ये नमीराबी अतिक शेख, प्रभाग क्र. ३(अ) मध्ये प्रदीप विठ्ठल वाघ, क्र. ३(ब) मध्ये वनिता राजेश भुतडा, प्रभाग क्र. ४(अ) मध्ये रुकसाना नजीर खान, क्र. ४(ब) मध्ये अनवर अली शेख, प्रभाग क्र. ५(अ) मध्ये विद्या अतिश कासारे, क्र. ५(ब) मध्ये विष्णू अर्जुन झोरे, प्रभाग क्र. ६(अ) मध्ये उषा दत्तात्रय गीते, क्र. ६(ब) मध्ये निशिकांत छबुराव भावसार, प्रभाग क्र. ७(अ) मध्ये शिवाजी हरिभाऊ मेहेत्रे, क्र. ७(ब) मध्ये शीतल अतिश खराट, प्रभाग क्र. ८(अ) मध्ये काशिफखान आलमखान कोटकर, क्र. ८(ब) मध्ये रंजना अनिल रामाने, प्रभाग क्र. ९(अ) मध्ये अलका प्रवीण धन्नावत, क्र. ९(ब) मध्ये नासेर अब्दुल रज्जाक बागवान, प्रभाग क्र. १०(अ) मध्ये दिशा किशोर खांडेभराड, क्र. १०(ब) मध्ये रंजना गोविंदराव झोरे, तर क्र. १०(क) मध्ये राजेंद्र तुकाराम खांडेभराड यांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा