तूर पिकामध्ये गांजाची लागवड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांवर संशयाच्या चर्चा



तूर पिकामध्ये गांजाची लागवड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त  
पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांवर संशयाच्या चर्चा

सिंदखेडराजा:- 

तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून अंमली पदार्थ असलेल्या गांजाची तुरीच्या पिकातील लागवड मोडीत काढली आहे. ८१.६२ किलोग्रॅम वजनाची व साडेबारा लाखांचा ओल्या व सुक्या गांजाचा मुद्देमाल जप्त करीत, आरोपी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर यासंदर्भात मलकापूर पांग्रा येथील पोलिस चौकी संदर्भात संशयास्पद चर्चांनी वेग घेतला आहे.

साखरखेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मलकापूर पांग्रा शिवारात आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड, वय ६५ वर्षे ह्या शेतकऱ्याने गट नंबर ५०६ मधील शेतात तूर पिकासोबतच गांजाची लागवड केलेली आहे. अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना मिळाली. आपल्या कर्मचाऱ्यांना गुप्तपणे पाठवून स्थानिक गुन्हे शाखेने खातरजमा केली. त्यावरुन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तयारी करीत काल दि. १८ डिसेंबर, गुरुवारी दुपारनंतर त्या शेतात धाड टाकली. त्यावेळी नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी मादक वनस्पती असलेल्या गांजाची ७६ किलो ०६ ग्रॅम ओली झाडे, किंमत अंदाजे ११ लाख ४० हजार ९०० रुपये व ५ किलो ५६० ग्रॅम कोरडी झाडे, किंमत अंदाजे १ लाख ११ हजार २०० रुपये असा एकूण ८१.६२ किलोग्रॅम वजनाची व १२ लाख ५२ हजार १०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व वयस्कर शेतकरी सुधाकर संपतराव गायकवाड यास ताब्यात घेतले. 
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दिगंबर कन्हैयालाल कपाटे यांच्या फिर्यादीवरुन साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांच्या २०(अ), २० (ब)(ii)(क) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री उशीरा पर्यंत चाललेल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, जमादार गजानन दराडे, दिगंबर कपाटे, महिला जमादार वनिता शिंगणे, नाईक पोलीस विजय वारुळे, शिपाई दीपक वायाळ, मंगेश सनगाळे, मनोज खार्डे व चालक जमादार समाधान टेकाळे यांनी कर्तव्य बजावले.

चर्चा:-
अंमली पदार्थांच्या उपज वनस्पती लागवडीची माहिती बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळावी. त्यांनी तेथे येऊन कारवाई करावी. मात्र साखरखेर्डा ठाण्याची मलकापूर पांग्रा येथे पोलिस चौकी असूनही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नसावी? याबाबत चौकीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर संशयास्पद चर्चांनी पंचक्रोशीत वेग घेतला आहे. तर त्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा