मुंबईसह राज्यातील एकूण २९ मनपांचे मतदान १५ जानेवारीला तर १६ जानेवारीला मतमोजणी


 मुंबईसह राज्यातील एकूण २९ मनपांचे मतदान १५ जानेवारीला तर १६ जानेवारीला मतमोजणी


मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा केली आहे. 

त्यामध्ये १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

आजच्या या घोषणेसह सर्वच महानगरपालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.👇

२० ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी दाखल करणे.

३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल.

२ जानेवारी २०२६ उमेदवारी मागे घेण्याची मुदत 

३ जानेवारी २०२६ निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी 

१५ जानेवारी २०२६ मतदान 

तर १६ जानेवारी २०२६

२९ महापालिकांमध्ये एकूण २८६९ जागा

आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 

यामध्ये १४४२ महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या ३४१, एसटीच्या ७७ तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील ७५९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा