आमदार उदंड जाहलेत ..! लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोजराव ....!!


 आमदार उदंड जाहलेत ..!

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोजराव ....!!


सिंदखेडराजा:- आ. श्रीमान मनोजराव, सर्वप्रथम आपल्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

आम्हाला इतिहास बदलवायचा आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन आपण आगेकूच करीत आहात. त्याबद्दल कदापिही संशय नाही. परंतु, सगळ्यांना सोबत घेऊन चालतांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर आपले निरीक्षण नक्कीच होत असते, हे आपण किंवा आपली सहकारी मंडळी यांनी विसरता कामा नये.

यापूर्वीही आमदार म्हणून डॉ. शिंगणे, डॉ. खेडेकर, आपले आजोबा तोतारामजी कायंदे, स्व. भास्कररावजी शिंगणे, स्व. जे. के. खरात या सगळ्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

आपले पिताश्री स्व. देवानंद भाऊ कायंदे यांनी ती क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःला अनेक कसोट्यांवर झोकून दिले होते. 

त्याचाच परिपाक म्हणून अनेक राजकीय समीकरणे पाहत मतविभाजन होत आपणांस लोकांनी निवडून दिलेले आहे.

आपण केवळ एका जातीचे आमदार नाहीत आणि नसू  ही नव्हे तर समाज ही परिभाषा समजून घेत आपण समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा ह्या अपेक्षेप्रमाणे आपण तेवढं प्रत्यक्ष रुपात करताही, त्याबद्दल आपले नक्कीच अभिनंदन ..!

याच सोबत आपण आजच्या दिवशी माझा भाऊ आणि मित्र सुभाष व भावजय मीना यांच्या वर्षा कन्येशी विवाहबंधनात अडकला होता, त्याबद्दलही शुभेच्छा ..!

आपण मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहात. त्यावेळी राजकीय विरोधक यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. हे प्रगतीतील अवरोधक असतात, हे मान्य आहे. त्या सगळ्यांना स्वतः जबाबदारी घेऊन आपण जनतेच्या मनातील भावना जाणून प्रत्यक्षात उत्तर देत आहात. हे प्रशंसनीयच परंतु, सर्वसामान्य जनतेला जर काही खटकत असेल तर त्यातील काही बाबतीत उल्लेख करणे आजच्या निमित्ताने गरजेचे आहे. 

त्याबाबत पत्रकार म्हणून निरीक्षणात आलेल्या आढाव्यात देऊळगावराजा, सिंदखेडराजा, देऊळगावमही, अंढेरा, मलकापूर पांग्रा, शेंदूरजन, दुसरबीड, किनगावराजा आदि परिसरात काही ठराविक लोक स्वतःला आपल्या जागी स्वतःच आमदार असल्याचे भासवत नव्हेतर शासकीय, प्रशासकीय यंत्रणेला टाचेखाली दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जो व्यक्ती स्वतःला सर्वसामान्य म्हणवतो व त्यानुसार वागण्याणा सदोदित अवलंब करतो. त्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर काही आपमतलबी लोक त्याला आणखी वरच्या स्तरावर घेऊन जात असतात, हा राजकीय पायंडा आहे. त्या नियमाला आपण अपवाद असू शकत नाहीत. या स्वयंभू आमदार लोकांची औकात लक्षात घेता, त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण मोठेपणाची भुरळ झटकून द्यावी व मतदार संघातील त्या - त्या भागातील तथाकथित आमदारांना आपल्या परीने हाताळावे. 

चांगले तर चांगले वाईट तर वाईट यावर परखड लिहीत डोळ्यात अंजन घालणारी पत्रकारिता प्रयोजनमूलक आहे. 

आजकालच्या पत्रकारितेत एकाबाजूला भाट तर दुसरीकडे कट्टर विरोधकांच्या भूमिकेत शत्रू मानणारे लिहितांना संतुलन ठेवत नाहीत. तर राजकीय इतिहासाच्या शून्य ज्ञानावर पत्रकारिता करणारेही अनेक आहेत.

आजचा दिवशी शुभेच्छा व चांगल्या दृष्टिकोनासाठी डोळ्यात झणझणीत अंजन ..!

जयहिंद ..! जय महाराष्ट्र ...!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा