देऊळगावराजात राजकीय वादातून रक्तरंजित संघर्ष? दोन गट आमनेसामने; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, सात जखमी
देऊळगावराजात राजकीय वादातून रक्तरंजित संघर्ष? दोन गट आमनेसामने; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, सात जखमी देऊळगावराजा: शहरात सोमवारी (५ ऑक्टोबर) सायंकाळी दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीने शहर हादरले. या हिंसक संघर्षात दोघांचा मृत्यू, तर सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचा नगरसेवक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता असल्याचे वृत्त आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, देऊळगावराजा पोलीस ठाण्याच्या गेटजवळच दोन गट आमनेसामने आल्याचे सांगण्यात येत आहे. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, दोन्ही बाजूंनी तलवारी तसेच इतर धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही वेळातच परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कव्वालीच्या कार्यक्रमातील वादातून संघर्ष पेटल्याची प्राथमिक माहिती या घटनेमागे शहरातील एका कव्वाली कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादा...