पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुटुंब छतावर झोपायला गेले असतांना झाली १ लाख ८४ हजारांची चोरी

कुटुंब छतावर झोपायला गेले असतांना झाली १ लाख ८४ हजारांची चोरी सिंदखेडराजा:- उन्हाळा असल्याने कुटुंब छतावर झोपायला गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने मिळून १ लाख ८४ हजार रु. चा मुद्देमाल लंपास केल्याची घटना तालुक्यातील बाळसमुद्र येथे काल दि. २८ एप्रिल, मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाळसमुद्र येथील विठ्ठल श्रीकिसन मेरत यांनी यासंदर्भात साखरखेर्डा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २७ एप्रिल, सोमवारी रात्री सुमारे १० वा. घरातील सर्व कामकाज आटोपून त्यांची पत्नी सुनीता, मुलगी देवता व मुलगा ऋषिकेश हे सर्वजण झोपण्यासाठी छतावर गेले होते. त्यानंतर सकाळी म्हणजे काल दि. २८ एप्रिलला सकाळी ५.०० वा. विठ्ठल व त्यांची पत्नी सुनीता दोघेही उठून खाली आले. त्यावेळी घराचा दरवाजा लोटून घेतलेल्या स्वरुपात, तर कुलूप तोडून बाजूला ठेवलेले आढळले. तर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी १ लाख रु. तसेच गहुपोत, झुंबर, अंगठ्या आदि सोन्याचे ८४ हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास के...

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून, पोलीस ठाण्यात जमा ..

इमेज
अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून, पोलीस ठाण्यात जमा .. रेती माफियांच्या मुसक्या आवळणे शक्य .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील डोरवी येथे दि.२८ एप्रिल, मंगळवारच्या उत्तररात्री बरोबर १२ वाजता २ ब्रास अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर महसूल पथकाने पकडून पोलीस ठाण्यात जमा केले आहे. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आनंद राजपूत, देविदास गरिबे व प्रशांत पोंधे यांचे पथक दि. २८ एप्रिल, मंगळवारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी कार्यरत होते. त्यावेळी डिग्रस, ता. देऊळगावराजा येथून अवैध रेती वाहतूक करणारे एक टिप्पर खैरव मार्गे डोरवीकडे येत असल्याची गुप्त माहिती पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार हे पथक डोरवी येथे दबा धरुन बसले होते. रात्री बरोबर १२ वाजता टिप्पर डोरवी शिवारात येताच त्यास थांबवण्यात आले. ज्ञानेश्वर दिनकर वाघ, यांच्या मालकीच्या टिप्पर चालक सतीश शिवअप्पा जाधव, दोघेही रा. डिग्रस, ता. देऊळगावराजा याला रॉयल्टी व वाहतूक पास संदर्भात विचारणा केली असता कोणतीच कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे पंचनामा करीत, हे टिप्पर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आह...

अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरूच ..

इमेज
अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरूच .. पुन्हा दोन वाहने पकडली रेतीमाफियांंच्या अवैध कारनामे उखडून फेकण्यासाठी मुळावर घाव घालणे शक्य .. सिंदखेडराजा:- अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी दोन वाहने पकडून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी सुरु केलेल्या या मोहिमेमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे. मात्र  जेथून रेती उत्खनन करुन वाहतूक करण्यात येते त्यागावतच कारवाई का केल्या जात नाही? असाही प्रश्न यातून निर्माण होत आहे. तालुक्यातील जळगाव येथे दि. २५ एप्रिल रोजी सूर्योदयापूर्वीच नंबर नसलेले एक टिप्पर रेती वाहतूक करतांना आढळले. त्यावेळी तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व मंडळाधिकारी रविंद्र घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकातील तलाठी गजानन टेकाळे, श्रीमंत पांडव, प्रवीण झिने, ब्रम्हानंद साळवे यांनी त्यास थांबवून विचारणा केली असता चालक सय्यद अहमद सय्यद अजगर व मालक शिवप्रसाद उद्धव मांटे, दोघेही रा. डिग्रस, ता. देऊळगावराजा यांच्याजवळ रॉयल्टी व वाहतूक पास आढळून आली नाही. त्यामुळे तीन ब्रास रेती असलेल्या टिप्परचा पंचनामा करीत ...

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

इमेज
अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले; रेतीसह टिप्पर पोलीस ठाण्यात जमा  सिंदखेडराजा:- कोविड महामारीचे भयावह संकट उभे ठाकले असतांनाही खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक करण्याचा माफियांचा उद्योग सुरुच असल्याचा प्रकार पुन्हा  एकदा समोर आला आहे. त्यामुळे महसूल चोरी करणाऱ्या या माफियांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना देऊळगावराजा तालुक्यातील रेतीमाफिया हे देऊळगावराजा व चिखली तालुक्यातील मार्गांचा वापर करीत सिंदखेडराजा तालुक्यात शिरकाव करुन रेती तस्करी करीत असल्याचे गुप्त सूत्रांकडून कळले. या रेती तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी तलाठी आनंद राजपूत, देविदास गरिबे व नितीन जुमडे यांचे पथक निर्माण करीत संपर्कात राहून मार्गदर्शन केले. त्यानुसार काल दि. २४ एप्रिल, शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दरेगाव गावात शिरणाऱ्या नंबर नसलेल्या एका टिप्परला अडविण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नव्हती. हे टिप्पर रवी भास्कर लाड, रा. डिग्रस, ता. देऊळगावराजा याच्या मालकीचे असून शंकर महादेव मांटे हा चालक असल्याचे...

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शेतकऱ्याच्या फुलशेती नुकसानीची कृषी विभागाने घेतली दखल

इमेज
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शेतकऱ्याच्या फुलशेती नुकसानीची कृषी विभागाने घेतली दखल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला पंचनामा सिंदखेडराजा:- कोविड महामारीमुळे कोंडी झाल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीचे चित्र करीत समोर आहेत. सावखेड तेजन येथील एका नुकसानीचा संबंधित तलाठ्याने पंचनामा करण्यास नकार दिल्याचे प्रकरण "दीसना" ने प्रकाशात आणले होते. तालुका कृषी अधिकारी यांनी याची दखल घेत काल दि. २४ एप्रिल, शुक्रवारी स्वतः पंचनामा केला आहे. सावखेड तेजन येथील विजय विघ्ने ह्या शेतकऱ्याने यावर्षी सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने, नगदी पिकातील नवीन प्रयोग म्हणून फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या सर्व्हे क्र. ४२ मधील दीड एकर शेती क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर चांगला भाव मिळेल. तसेच उन्हाळ्यात औरंगाबाद, पुणे अगदी मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत फुलांची विक्री करण्याची विजय विघ्ने यांची उमेद होती. मात्र ऐनवेळी कोविड महामारीचे संकट उभे टाकल्याने संचारबंदी झाली. त्यामुळे यावर्षी थोडी अधिक कमाई करण्याची शेतकऱ्याची सर्व स्वप्ने धु...

साखरखेर्डा उपसरपंचपदी दर्शन गवई यांची अविरोध निवड

इमेज
साखरखेर्डा उपसरपंचपदी दर्शन गवई यांची अविरोध निवड  सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दर्शन गवई यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच सौ. पुनमताई महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४ एप्रिल, शुक्रवारी साखरखेर्डा ग्रामपंचायतीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत सौ. छाया सुनिल गवई यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सादर केला. यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सदस्यांच्या आपसात झालेल्या चर्चेत दर्शन गवई यांनी अर्ज दाखल करावा असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार दर्शन गवई यांचा एकमेव अर्ज सादर करण्यात आला. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेनंतर सरपंच सौ. पुनम महेंद्र पाटील यांनी दर्शन गवई यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्राम विकास अधिकारी मनोज मोरे, मावळत्या उपसरपंच छाया सुनिल गवई, महेंद्र पाटील, माजी उपसरपंच शेख रफीक तांबोळी, भागवत मंडळकर, संदिप खिल्लारे, राजू डुकरे, दिलीप बेंडमाळी आदि उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने सर्व प्रक्रियेदरम्यान सो...

लॉकडाऊन दरम्यान पायदळी घरी परतणाऱ्या सहा परप्रांतीय युवकांना मारहाण

इमेज
लॉकडाऊन दरम्यान पायदळी घरी परतणाऱ्या सहा परप्रांतीय युवकांना मारहाण सिंदखेडराजा:- एकीकडे कोरोना लॉकडाऊन दरम्यान पायदळी चालत स्वगृही परतणाऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी अनेक जण पुढे येत असतांनाच या प्रवाशांची लूटमार करण्याच्या हेतूने मारहाण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना आज दुपारी समोर आली आहे. सत्यकुमार, वय ४८ वर्षे, संजयकुमार, ३१ वर्षे, जितेंद्रकुमार, २३ वर्षे, राजेशकुमार, २८ वर्षे, संदीपकुमार, ३० वर्षे व त्रिलोककुमार, ३४ वर्षे हे मूळचे पहाडपुर चंदौली, उत्तरप्रदेश मधील सहा कामगार जालना एमआयडीसी मध्ये एका कंपनीत कामाला होते. लॉकडाऊनमध्ये वाढ होत गेल्यामुळे, तसेच इतर कुठलेही काम मिळत नसल्याने उपासमार होण्याच्या भीतीने हे सहाही जण उत्तरप्रदेशात गावी परतण्यासाठी जालना येथून पायदळी निघाले होते. वाटेने मार्गक्रमण करीत असतांना आज दि. २४ एप्रिल, शुक्रवारी दुपारी ते सिंदखेडराजा ते सावखेड तेजन दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला काळेपाणी भागातील एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. त्यावेळी पल्सर दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण त्या ठिकाणी आ...

युवकांचा समयोचित अभिनव उपक्रम

इमेज
युवकांचा समयोचित अभिनव उपक्रम मोहाडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा येथील युवकांचा अभिनव उपक्रम .. सर्व गावकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत येथील युवक दरवर्षी शिवजयंती साजरी करतात .. त्यात धांगडधिंग्यापेक्षा समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर असतो. यावर्षी वर्गणी जमा केली व त्याचा समयोचित वापर करीत अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी काय व कसे केले ही घडामोड खाली वाचा त्यांच्याच शब्दांत ◆" * समाजाचा पैसा समाजासाठी....।।" * ◆ _शिवजयंती उत्सव समिती मोहाडी. * नमस्कार मित्रहो ...🙏 *       कोरोनामुळे आज सर्वत्र वाईट परिस्थिती आहे. सर्वत्र विशेषतः ग्रामीण भागात आजही आरोग्य सुविधा आणि संरक्षण साहित्य यांची कमतरता आहे. हे साहित्य अजूनही गोरगरीब पर्यंत पोहोचलेले नाही.अपुल्या मोहाडी गावातही थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती आहे. यासाठी काही करता येईल का, या दृष्टीने.. * शिवजयंती उत्सव समिती मोहाडी * यांनी प्रयत्न करण्याचे ठरवीले.       दरवर्षी अपुल्या गावात १९ फेब्रुवारीला शिवजयंती सामाजिक सलोख्यात आणि अगदी अत्यल्प खर्चात पार पडते. खर्चाचा ...

मळणी यंत्रात ओढणी ओढल्या गेल्यामुळे युवती गंभीर जखमी

इमेज
मळणी यंत्रात ओढणी ओढल्या गेल्यामुळे युवती गंभीर जखमी  सिंदखेडराजा:- सोंगुण आणलेल्या गव्हाची घरासमोर यंत्राद्वारे मळणी करीत असतांना ओढणी गुंतल्यामुळे ओढल्या गेलेली युवती डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. २३ एप्रिल, गुरुवारी दुपारी साखरखेर्डा येथे घडली आहे. साखरखेर्डा येथील प्रभाग क्र. ६ मधील कैलास गायकवाड यांनी शेतातील गहू सोंगुण आणून ठेवला होता. मळणी यंत्राद्वारे त्याची काढणी आज दि. २३ एप्रिल रोजी सुरु होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मजूर मिळत नसल्याने सोंगणीच्या कामात कुटुंबीयच मदत करीत होते. याचवेळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कैलास गायकवाड यांची १८ वर्षांची मुलगी वैशाली हिची ओढणी अचानक मळणी यंत्रात गुंतल्याने ती त्याकडे ओढल्या गेली. परिणामी तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. प्रसंगावधान राखत वेळीच मळणी यंत्र बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. गंभीर जखमी झालेल्या वैशाली हिला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले असता तेथे उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे व डॉ. बेबी रहाटे यांनी उपचार ...

मुख्यमंत्री सहायता निधीला श्रीराम कॉर्पोरेशनची २१ हजारांची मदत

इमेज
मुख्यमंत्री सहायता निधीला श्रीराम कॉर्पोरेशनची २१ हजारांची मदत सिंदखेडराजा:- येथील श्रीराम कार्पोरेशनचे किरण बाळाजी तायडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकवीस हजार रु.चा धनादेश तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सतीश तायडे, ठाणेदार सातव, नगरसेवक बालाजी मेहेत्रे, युवासेना उपजिल्हाध्यक्ष अतिश तायडे आणि गणेश आढाव आदि उपस्थित होते.

रमजानमध्ये सहेरी व इफ्तारिला अजानची मुभा द्यावी - इरफानअली शेख

इमेज
रमजानमध्ये सहेरी व इफ्तारिला अजानची मुभा द्यावी - इरफानअली शेख सिंदखेडराजा:- इस्लाम धर्मामध्ये रमजान महिन्याचे विशेष महत्त्व आहे. रमजान महिन्यात पवित्र कुरआन चे पठण करून ३० दिवस रोजा (उपवास) करत अल्लाहचे स्मरण केले जाते. रोजा सुरू होण्यापूर्वी व समाप्तीनंतर ''अजान''चे महत्त्व इस्लाम धर्मामध्ये अधोरेखित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सकाळी रोजा सुरू होताना व सायंकाळी रोजा सोडवताना प्रशासनाने अजान'ची मुभा देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्ध्याध्यक्ष इरफानअली शेख यांनी केली आहे. तालुक्याची शांतता समितीची सभा पंचायत समिती सभागृह सिंदखेडराजा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सभेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना व अंमलबजावणीसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी इफानअली शेख यांनी ही मागणी केली. या सभेमध्ये पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय अधिकारी डॉ.विवेक काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नलावडे, रा.कॉ. जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी ...

कोरोना पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या फुलशेतीचे नुकसान; पंचनामा करण्यास नकार; वरिष्ठांनी दखल घेत आदेश देण्याची गरज

इमेज
कोरोना पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या फुलशेतीचे नुकसान पंचनामा करण्यास नकार वरिष्ठांनी दखल घेत आदेश देण्याची गरज सिंदखेडराजा:- शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीचे चित्र एक एक करीत समोर येत आहेत. याचवेळी सावखेड तेजन येथील एका प्रकरणावरुन शासकीय स्तरावरुन पंचनामे व सर्व्हे करण्यास नकार देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ स्तरावरुन तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सावखेड तेजन येथील विजय विघ्ने ह्या शेतकऱ्याने यावर्षी सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने, नगदी पिकातील नवीन प्रयोग म्हणून फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या सर्व्हे क्र. ४२ मधील दीड एकर शेती क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर चांगला भाव मिळेल. तसेच उन्हाळ्यात औरंगाबाद, पुणे अगदी मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत फुलांची विक्री करण्याची विजय विघ्ने यांची उमेद होती. मात्र ऐनवेळी कोरोना संसर्गाचे संकट आल्याने संचारबंदी झाली. त्यामुळे यावर्षी थोडी अधिक कमाई करण्याची शेतकऱ्याची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. सुमारे तीन लाख रुपयांच्या या नुकसानी...

सोशल मीडियावर राहणाऱ्या आपण सर्वांनी व्हायरल पासून थोडं सावध राहण्याची गरज

इमेज
सोशल मीडियावर राहणाऱ्या आपण सर्वांनी व्हायरल पासून थोडं सावध राहण्याची गरज ..🙏                          मित्रांनो, जेंव्हा पासून लॉकडाऊन म्हणजे संचारबंदी जरि झाली, तेंव्हापासून जवळपास सर्वच जण सोशल मीडियावर राहू लागलो आहोत. त्याचे महत्वाचे कारण हे वेळ घालविणे जरी असले तरी त्यातून मिळणारी महत्वाची माहिती व विविध प्रकारे होणारे मनोरंजन आदि बाबीही महत्वाच्या आहेत. परंतु आपल्यापैकी अनेक जणांना हे माहीत नाही, की जेव्हापासून सोशल मीडिया तयार झाला आणि सर्वसामान्य व्यक्तिसुद्धा त्याला वापरायला लागला, तेंव्हापासूनच या सगळ्यांना टारगेट करीत काही माथी कामाला लागली. तुम्ही आम्ही नव्हेतर आपण सर्वजण नवीन काही पोस्ट ज्या लिखित, दृश्य फोटो अथवा व्हिडिओ स्वरूपात आल्या की वाचण्याचा, पाहण्याचा किंवा ऐकण्यासाठी आसुसलेले असतो. त्याचा एकदा फडशा पाडला की मग त्या संदर्भातील चर्चा, प्रतिक्रिया, दावे, प्रतिदावे यातून ते मुद्दे सर्वत्र पसरतात. त्यातून समाजमनात घर करतात. आणि त्यातून समाजाची मानसिकता कशा प्रकारचे बनते, याचे प्रात्यक्षिकही ...

बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतातील विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

इमेज
बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतातील विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू सिंदखेडराजा:- शेतात बांधलेल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला १५ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दि. १८ एप्रिल, शनिवारी दुपारी तालुक्यातील वर्दडी बु. येथे घडली. ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वर्दडी बु. येथील रामप्रसाद ज्ञानदेव काकडे, वय ४२ वर्षे यांच्याकडे गट नं ३ मध्ये ३ एकर शेती असून त्यामध्ये विहीर आहे. सर्व कुटुंबीय घरी असले की शेतातील त्यांच्या बैलांना पाणी पाजण्यासाठी १५ वर्षांचा मुलगा धनुर्धर व मुलगी नामे भक्ती यांना ते अधूनमधून पाठवायचे. त्याप्रमाणे काल दि. १८ एप्रिल, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुलगा धनुर्धर यास बैलांना पाणी पाजण्यासाठी पाठविले होते. त्यानंतर काही वेळाने रामप्रसाद काकडे यांच्या शेतशेजारील रस्त्यावरुन त्यांचा मित्र लक्ष्मण निकाळजे हे रस्त्याने जात असतांना त्यांना विहिरीवर फक्त बैलच उभे असलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता धनुर्धर हा बुडत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने रामप्रसाद काकडे यांना...

तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या वितरणात दुसऱ्यांदा गडबडीचा प्रकार; तक्रारीनंतर करण्यात आली चौकशी

इमेज
तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या वितरणात दुसऱ्यांदा गडबडीचा प्रकार तक्रारीनंतर करण्यात आली चौकशी सिंदखेडराजा:- कोरोना संसर्गाच्या आणीबाणी सदृष्य धर्तीवर जनतेला अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून, शासनाकडून केल्या जाणाऱ्या धान्य वितरणामध्ये काही स्वस्त धान्य दुकानदाराकडून गडबड केल्या जात आहे. तालुक्यातील सोनोशी येथील अन्नधान्य वितरणात गडबड प्रकारानंतर पिंपळगाव सोनारा येथून दि. १० एप्रिल, शुक्रवारी दुसरी तक्रार तहसीलदार यांचेकडे करण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी दि. ११ एप्रिल, शनिवारी या प्रकरणाची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे.  पिंपळगाव सोनारा येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आलेले अन्नधान्य लाभार्थ्यांना योग्य भावात देण्याऐवजी चढ्या दराने दिला जातो. तसेच वजनाच्या संदर्भातही काहींना दोन ते तीन किलो धान्य कमी दिल्या जाते. या स्वरूपाची तक्रार गावातीलच रमेश तुकाराम ठोसरे, उद्धव श्रीराम ठोसरे, विश्वास विक्रम ठोसरे, प्रकाश श्रीराम गवई, तुळशीदास दिगंबर बिनोरकर आदि ग्रामस्थांची होती. मात्र लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष तहसीलदार यांच्यापर्यंत जाऊन तक्रार देण्याऐवजी...

खात्यातील रकमा काढण्यासाठी बँकांमध्ये उसळतेय गर्दी ; सोशल डिस्टनसिंगचा उडतोय फज्जा

इमेज
खात्यातील रकमा काढण्यासाठी बँकांमध्ये उसळतेय गर्दी सोशल डिस्टनसिंगचा उडतोय फज्जा  सिंदखेडराजा:- कोरोनाचे सावट घोंगावत असतांना काम असलेच तर सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे निर्देश आहेत. असे असतांनाच विविध योजनांच्या रकमा बँकेत आल्याने बँक परिसरात एकच गर्दी उसळून सोशल डिस्टनसिंगची ऐसीतैसी होत असल्याचे चित्र तालुकाभरात दिसून येत आहे. कोरोना संसर्गाच्या संभाव्य  धोक्यामुळे स्टे होम, स्टे सेफ, कीप सोशल डिस्टनसिंग अशा अनेकविध आवाहनाला तसेच यावर जालीम इलाज असलेल्या संचारबंदीला  मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद वाढतो आहे. जवळपास सर्वच माध्यमातून राज्य, देश व विदेशातील परिस्थिती जनतेपर्यंत पोहचत असल्याने जागृतीही येत आहे. संचारबंदी दरम्यान विविध घटकातील कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडू नये, म्हणून शासनाकडून ऐनवेळी विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात रकमा जमा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवांसाठीची योजना, जनधन खाते, गॅसची जमा होणारी सबसिडी आदि स्वरुपात रकमा बँकेत जमा झालेल्या असल्याचे विविध सूत्रांकडून जनतेला माहीत झाल...

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान; भरपाई देण्याची मागणी

इमेज
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी सिंदखेडराजा:- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सावखेड तेजन येथील एका महिला शेतकऱ्याने घेतलेले भाजीपाल्याचे पीक जागीच सडले आहे. यामध्ये ह्या शेतकरी महिलेचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. गत पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भरपूर पाऊस झाल्याने तालुकाभरात यावर्षी सिंचनाची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे सावखेड तेजन येथील महिला शेतकरी द्वारकाबाई पाटीलबा जायभाये यांनी गट नं. २३२ मध्ये दोन एकर क्षेत्रावर फुलकोबी या भाजीपाला पिकाची लागवड केली. बी बियाणे, लागवड, मशागत, फवारणी आदिंसाठी जायभाये कुटुंबीयांनी शारीरिक मेहनतीसह खर्चही केला. त्याचा परिणाम व निसर्गाची साथ यातून पीकही बहरले. हे भाजीपाला पीक अंतिम काढणीच्या टप्प्यात असतांनाच कोरोना विषाणूच्या साथीने जोर धरला. त्यासाठी लॉकडाऊन केले गेले. त्यामुळे जायभाये कुटुंबियांना फुलकोबी विक्रीसाठी बाजारात नेताच आली नाही. उभ्या उभ्या जागेवरच फुलकोबी सडली गेली. तलाठी ब्रह्मदेव साळवे ह्यांनी व पंच योगेश सुभाष जायभाये, सिद्धेश्वर महादेव वाघ व राजेंद्र एकनाथ जायभाये आदिंनी या ...

खडकपूर्णा नदीतील उपसून साठवलेला रेतीसाठा जप्त करण्याच्या धडक कारवाईला सुरुवात .. रेतीमाफियांंना हादरा ..

इमेज
खडकपूर्णा नदीतील उपसून साठवलेला रेतीसाठा जप्त करण्याच्या धडक कारवाईला सुरुवात ..                         रेतीमाफियांना हादरा सिंदखेडराजा:-  खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसत माफियांनी ती काठांवरील गावांमध्ये ठिकठिकाणी साठवून ठेवली होती. महसूल विभागाने काल दि. ११ एप्रिल, शनिवारपासून ही रेती जप्त करीत ताब्यात घेणे तढेगावपासून सुरु केले आहे. ह्या प्रक्रियेत किती साठा जप्त होतो? तसेच काहींना सुटका मिळते की काय? अशा स्वरुपाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.  तालुक्यातील डिग्रस ते लिंगा - देवखेड अशी २० किमी पर्यंत लांब खडकपूर्णा नदीपात्र आहे. महसूल विभागाच्या पथकांच्या नाकावर टिच्चून त्यातून माफियांनी अवैध रेती उपसा करण्याचा सपाटा लावला होता. नव्हेतर काठावरील परिसरात त्याचे साठेही करुन ठेवले होते. यासंदर्भात दै. दिव्यमराठीने दि. २४ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यावेळी हे साठे जप्त करण्यात येतील तसेच अवैध रेती उपसा करण्यासाठी शेतातून नदीत उतरणारा रस्ता तयार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविण्यात य...

"लॉकडाऊन दरम्यान कोण काय करतंय?"

इमेज
"लॉकडाऊन दरम्यान कोण काय करतंय?" जि. प. सदस्या सौ. सरस्वती लक्ष्मणराव वाघ ह्या जिल्ह्यातील प्रमुख युवा नेत्यांपैकी असलेला मुलगा विनोद वाघ सोबत कॅरम खेळत असतांना राजकीय तसेच संघटनात्मक कामानिमित्त नेहमीच दौऱ्यावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिंदखेडराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष नाझेर काझी पुस्तक वाचनात वेळ घालवतांना मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष  सतीश तायडे वाचनात गुंग असतांना सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदिनीताई विलासराव देशमुख ह्या मुलांचा अभ्यास घेतांना स्वतः वाचनात गुंग झालेल्या असतांना सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ठोके हे भ्रमणध्वनीद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना दुसरबीडच्या सरपंच आबईबाई खंदारे ह्या महामानव पुस्तकाचे वाचन करतांना साखरखेर्डा येथील गवई कुटुंबातील माजी सरपंच कमलाकर गवई, अनिकेत सैनिक स्कुलचे सर्वेसर्वा अर्जुन गवई हे गरजूंना अन्नधान्य वाटप करतांना

कोविड १९ च्या आपत्ती काळात अन्न - धान्य पुरवठ्यात गडबडस्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल दुकानाचा परवाना रद्द

इमेज
कोविड १९ च्या आपत्ती काळात अन्न - धान्य पुरवठ्यात गडबड स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल      दुकानाचा परवाना रद्द सिंदखेडराजा:- सध्या कोविड १९ या साथीच्या रोग प्रसारामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांनाही तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानदाराने जादा दराने तसेच प्रमाणापेक्षा कमी अन्न धान्य वितरण केल्याचा प्रकार काल दि. ८ एप्रिल रोजी उघड झाला होता. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यातून यंत्रणेमार्फत  दुकानदाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. तालुक्यातील सोनोशी येथील  शिवानंद गजानन आघाव ह्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याने स्वस्त धान्य दुकानदार भास्कर वामन साळवे यांचेकडून गहू व तांदूळ घेतले. त्यावेळी साळवे यांनी धान्य कमी दिल्याचे तसेच रक्कमही जादा घेतल्याचा प्रकार घडला. ह्या प्रकरणाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला. त्याची तक्रार पालकमंत्री डॉ. राजेंद्र ...