पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माय मायच असते .. अनुभव कथन

इमेज
 माय भेटली अन मायेचा पाझर फुटलाच .. रात्रीपासूनच  मायचं ध्यान यायला लागलं होतं. त्यामुळेच  मायचं मोठेपण काय असतं? आणि ममत्वाचा मोठेपणा काय असतो, तो खरंच आज अनुभवला आज सकाळी शाळेवरुन सुट्टी टाकली. अन सरळ देऊळगावराजा गाठले. त्यात अगोदर माझी मायची मैत्रीण अन माझी जगण्याची ओळख असलेली श्रीमती सुमनबाई नरसिंगराव खेडेकर ह्यांच्या घरी गेलो. आत जात असतांनाच माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी माझ्याकडे बघितले. परंतु, मी वैचारिक व राजकीय विरोधक असल्याने दुर्लक्ष केले. त्याचवेळी मी व माझा पुतण्या व आजच्या राजकीय परिक्षेत्रातील व्यक्तिमत्त्व चिंटू ह्याला आवाज दिला. अन घराच्या मागच्या दारावर  गेलो तर तिथे साक्षात सुमनबाई उभी होती.  चिंटूला सांगितले की माझी ओळखच देऊ नकोस. ठरले, परंतु, बाईने नाव विचारले, त्यावेळी आईचे नाव सांगितले अन  सुमनबाईने अक्षरशः कोंभ्हाळले म्हणजे कुरवाळले खुशाली विचारली. माझ्या भावनेचा आवरलेला बांध कोसळला. डोळ्यात आसू आले. सुमनबाईने ते आसू पुसले. अन जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. देऊळगावराजा, सावखेड तेजन, देवखेड आदि अनेक  गोष्टींवर खूप काही चर्...

ग्रामपंचायत निवडणुकीत सिंदखेडराजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

इमेज
ग्रामपंचायत निवडणुकीत सिंदखेडराजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व ही घ्या सरपंचपदी निवडून आलेल्या व पराभूत उमेदवारांची यादी  

शिकवताना नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळली पत्नी व मुलीचा मृत्यू तर शिक्षक गंभीर जखमी

इमेज
शिकवताना नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळली  पत्नी व मुलीचा मृत्यू तर शिक्षक गंभीर जखमी सिंदखेडराजा:- दिवाळीची सुटी असल्‍याने शिक्षक आपल्या पत्‍नीला कार शिकवित होते. या दरम्‍यान कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्‍त्‍याच्‍या बाजूला जात  विहिरीत  कोसळली. देऊळगावराजा येथे आज दि. ३ नोव्हेंबर, गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पत्‍नी व मुलीचा मृत्‍यू झाला असून शिक्षकास दवाखान्‍यात भरती करण्यात आले आहे.  सिंदखेडराजा तालुक्यातील डोरवी येथील मूळ निवासी व शिक्षक म्हणून नोकरीत असलेले अमोल मुरकुट हे देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहतात. पत्नी स्वाती मुरकुट यांना कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट ही सुद्धा सोबत होती. दरम्यान कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटला. यानंतर कार सरळ ७० फुट खोल विहिरीमध्ये पडली. झालेल्‍या अपघातात  अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अग्नि...

शैक्षणिक क्षेत्रात वंचितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर - डॉ. शिंगणे वंचित विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत - राजू केंद्रे

इमेज
  शैक्षणिक क्षेत्रात वंचितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर - डॉ. शिंगणे वंचित विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत - राजू केंद्रे सिंदखेडराजा:- राजू केंद्रे यांनी स्वतःचे तसेच गावचे नाव सातासमुद्रापार करीत फोर्ब्स मासिकाने त्याची दखल घेतली आहे. मात्र जागतिक पातळीवर पोहोचूनही त्याची ग्रामीण व वंचितांसाठीची कळकळ रुपी नाळ अजूनही शाबूत आहे. त्यांच्या शैक्षणिक विकासासाठीच्या प्रयत्नासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्र यातील आंतरसबंधात सविस्तर विश्लेषण केले. पिंप्री खंदारे येथे काल दि. १ ऑक्टोबर, शनिवारी सायंकाळी ग्रामपंचायत व एकलव्य फाउंडेशन तर्फे आयोजित आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. शिंगणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कमलबाई मदन चौधर तर माजी जि. प. सभापती अभय चव्हाण, विठ्ठल चव्हाण, एकनाथ बुरकुल, बबनअप्पा हाजबे, भाऊराव पवार, प्रल्हाद ढाकणे आदि प्रमुख उपस्थितीत होते. प्रारंभी लंडन येथून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या राजू केंद्रे, साहित्यिक विशाल इंगोले, पीएचडी स्कॉलर अनंता खरात...

वीज कोसळून साठेगाव येथील विवाहित शेतकरी महिला ठार पती गंभीर जखमी ..

इमेज
  वीज कोसळून साठेगाव येथील विवाहित शेतकरी महिला ठार पती गंभीर जखमी .. सिंदखेडराजा:- आज दि. ४ ऑगस्ट, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात कडकडाट व वीजांचा कहर झाल्याने तालुक्यातील साठेगाव येथील रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० वर्षे ह्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची तर त्यांचे पती गजानन नागरे हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. साठेगाव येथील गजानन संपत नागरे, वय ५५ व त्यांच्या पत्नी रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० हे दोघे पतीपत्नी शेतात काम करीत होते.  त्यातच अचानक दुपारी आलेल्या पावसातुन स्वतःला वाचवण्यासाठी दोघांनी बोरीच्या झाडाचा आसरा घेतला. त्याचवेळी त्या झाडावर वीज कोसळली. ह्या दुर्घटनेत रुख्मिनाबाई ह्या जागीच ठार झाल्या तर गजानन नागरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच किनगावराजाचा पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाला. मृत रुख्मिनाबाई यांच्या मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत ह्या संदर्भात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. मात...

एसटी महामंडळात कार्यरत जखमी वाहनचालक सतीश उर्फ पिंटू खराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

इमेज
  एसटी महामंडळात कार्यरत जखमी वाहनचालक सतीश उर्फ पिंटू खराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील सतीश प्रल्हाद खराडे उर्फ पिंटू, वय ४२ ह्या एसटी महामंडळामध्ये कार्यरत वाहनचालकाचा आज दि. ३ ऑगस्ट, बुधवारी सकाळी औरंगाबाद येथील इस्पितळात मृत्यू झाला आहे. सतीश खराडे हा युवक वाहनचालक म्हणून कोकणातील अलिबाग डेपो मध्ये कार्यरत होता. ड्युटीवर जाण्यासाठी बसची साफसफाई करीत समोरील काच पुसतांना तो खाली पडून, त्याच्या मेंदूला मार बसला होता. त्यानंतर वेगवेगळ्या इस्पितळात दाखल करीत प्रकृती गंभीर झाल्याने  शेवटी मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटल व त्यानंतर औरंगाबाद येथील नामांकित अपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान सकाळी ५ वा. सुमारास सतीश खराडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दुपारी १२ वा. सुमारास साखरखेर्डा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.  सतीश खराडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, आई, तीन भाऊ, खराडे परिवारासह बराच मोठा आप्त परिवार आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात सिंचन साहित्य वाटपात भ्रष्टाचार ..! करोडोंचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता ..?? संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

इमेज
  सिंदखेडराजा तालुक्यात सिंचन साहित्य वाटपात  भ्रष्टाचार ..! करोडोंचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता ..?? संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी सिंदखेडराजा:- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची गंगा असणाऱ्या कृषी विभागात महाडीबीटी व पोकरा ह्या योजनेच्या अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाटपात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा त्या खात्याच्या कर्मचारी,  अधिकारी व संबंधित पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत जोर धरत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी विभाग अंतर्गत सुरु झालेल्या मोका तपासणीची नोंदणी तसेच तुषार व ठिबक सिंचनसाठी शेतकऱ्यांना वाटप केलेले साहित्य ह्यातील तफावत ही ह्यामागाची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोकरा व महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या गावांचा समावेश झालेला आहे तेथील शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. ह्या प्रस्तावानंतर संबंधित खात्यातील कर्मचारी व अधिकारी ह्यांनी मान्यता दिली होती. अनुदान मंजूर होण्यासाठी पदानुसार सर्व्हेक्षण करुन आपल्या जबाबदारी नुसार शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचनासाठी असलेले साहित्य देणे आवश्यक असते. मात्र असे हो...

थंडी वाढणार वगैरे भ्रामक संदेशावर विश्वास ठेवू नका ..

इमेज
थंडी वाढणार वगैरे भ्रामक संदेशावर विश्वास ठेवू नका .. पृथ्वी व सुर्यामधील अंतर वाढल्यामुळे तापमान कमी होणार व त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बदल होणार असून थंडी वाढणार असल्याचे व त्याचे विविध प्रकारचे परिणाम होणार आहेत. अशा स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर झळकत आहेत. परंतु, असे काहीही होणार नसल्याचे नासा व इस्रो तसेच सर्व जगभरातील शास्त्रज्ञ सांगत आहेत. अफेलिअन म्हणजे अप सुर्यस्थिती ही एक प्रक्रिया आहे. इतर सर्व ग्रहांप्रमाणे पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती तिच्या कक्षेत परिभ्रमण करते. ती कक्षा गोलाकार नसून, लंब वर्तुळाकार आहे. पृथ्वी जेंव्हा लंब वर्तुळाकार कक्षेत जास्त दूरच्या बिंदूवर पोहोचते. त्या स्थितीला अफेलिअन म्हणजेच अपसूर्यस्थिती म्हणतात. ही दरवर्षी नेमाने घडणारी घटना आहे. त्यामध्ये सूर्याची पृथ्वीवर पोहोचणारी उष्णता कमी होते. असं कधीही होत नाही. दरवर्षी घडणारी सूर्य अपस्थितीची प्रक्रिया ४ जुलै पासून सुरु झाली आहे. ती जानेवारी पर्यंत चालणार आहे. नासा तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सूर्य अपस्थिती मुळे पृथ्वीवर पोहोचणाऱ्या उष्णतेत मोठ्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचा बदल होणे श...

साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के सहा पैकी चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के ..

इमेज
  साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के सहा पैकी चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के .. साखरखेर्डा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात साखरखेर्डा शहराचा सरासरी निकाल ९६.६९ टक्के एवढा लागला असून, एकूण सहा पैकी चार माध्यमिक विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे. जिजामाता विद्यालयाचे एकूण १५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. या १५३ पैकी ९२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर अवघे १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्री शिवाजी हायस्कूलचे १३६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. अनिकेत इंग्लिश स्कुलचे २७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. सहकार विद्या मंदिरचे ५१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने टक्केवारी १०० आहे. एस. इ. एस. हायस्कुलचे १२८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होऊन त्यापैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण ...

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

इमेज
  तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील एक तरुण पोहतांना पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा करुण अंत झाला आहे. साखरखेर्डा येथील शेख हरुन शेख गुलाब, वय ३३ वर्षे हा युवक काल दि. ५ जून, रविवारी दुपारी स्थानिक महालक्ष्मी तलावात पोहायला गेला होता. पोहण्या दरम्यान पाण्यात तो बुडाला होता. ही माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार जितेंद्र अडोळे, बीट जमादार रामदास वैराळ, लक्ष्मण इनामे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पट्टीच्या पोहणारांनी शर्थीचे प्रयत्न करुनही काल सायंकाळी उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. आज दि. ६ जून, सोमवारी अगदी सकाळीच त्याचा मृतदेह पाण्याच्या वर आला. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार करुन शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे. पोहतांना दम छाटल्यामुळे मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे. ह्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून, पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.

काळीज कोंडीतून अनेक सामाजिक कोंडींची मुक्ती होवो .. प्रवीण, लेखन क्षेत्रात तुझा ठसा उमटणार ..

इमेज
  काळीज कोंडीतून अनेक सामाजिक कोंडींची मुक्ती होवो .. प्रवीण, लेखन क्षेत्रात तुझा ठसा उमटणार ..      दीसना✍️ असं म्हणतात की, एक परिच्छेद लिहिण्यासाठी भरपूर अनुभव, अनेक पुस्तकं वाचलेली असावी लागतात. त्यातल्या त्यात लिहिणे हा प्रांत पूर्वी तथाकथित नोंद असलेल्या बुद्धिवाद्यांचा होता. मात्र आपल्या मातीतील अनेकांच्या वाचनाच्या तसेच अनुभवांच्या कक्षा विस्तीर्ण असल्या तरी लेखन प्रांताकडे त्यांचे दुर्लक्षच असल्याचे आढळून येते. विविध मुद्द्यांवर समाज प्रबोधन करण्यासाठी भोवताली अनेक विषय असतांनाही आम्ही त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. सध्या समाजमाध्यमातून शेंडा बुडूख नसलेल्या कुठलाही संदर्भ नसलेल्या गोष्टी माथी मारल्या जात आहेत. सध्याची शिक्षित असलेली युवापिढी वेगळ्या दिशेला नेत, तथाकथित ज्ञान परंतु वास्तवात घोर अज्ञानाच्या  गर्तेकडे नेल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र ढळढळीत समोर उभे असल्याची परिस्थिती आहे. याचवेळी माझा भाऊ प्रवीण गीते समाज प्रबोधनाचे शिवधनुष्य उचलतो नव्हेतर लीलया पेलतोय, असा आशेचा किरण त्याच्या आतापर्यंतच्या लेखातून ठसठशीतपणे उमटून आलाय. प्रवीणचे वाचन व व्...

राऊत साहेब, कृपा करुन, लोड शेडिंग सुरु करा हो ..! साखरखेर्डा परिसरातील जनतेची मागणी ..

इमेज
राऊत साहेब, कृपा करुन, लोड शेडिंग सुरु करा हो ..! साखरखेर्डा परिसरातील जनतेची मागणी .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील गंभीर परिस्थिती आज जाणवली. जनतेच्या मनातील भावना जाणत वैतागून गेलेल्या काहींच्या लोड शेडिंग सुरु करण्याची भावना पुढे लिहीत आहे. ह्याचा वास्तवाशी किती संबंध आहे? हे त्रास भोगणाऱ्याला विचारले तर निश्चितच कळेल.  आज दि. १४ मे, शनिवारी सकाळीच पेपर वाचला (ज्याचे छायाचित्र वर दिले आहे) मन अगदीच पुलकित झाले. आधी हुश्श .. केलं, आणि नंतर राऊत साहेबांना मनोमन धन्यवाद दिले. त्याचवेळी लाईट गेली, म्हटलं येईल थोड्या वेळात .. पण, कशाचं काय तास, दोन तास, नव्हेतर तीन तास उलटले लाईट आलीच नाही. मग विचार केला की फॉल्ट असेल परंतु, मेहकर ते साखरखेर्डा ह्या मुख्य वहिनीच्या दुतर्फा असलेली अडगळ, झाडे, झुडुपे काढण्यासाठी म्हणा की देयके काढणाऱ्या ठेकेदार साहेबांच्या सोयीसाठी म्हणा वीज प्रवाह बंद केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी बहुतेक चौकशी येणार असल्याचे वृत्त असल्याने ह्याचवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही अनौपचारिक बोलतांना गंमतीत सांगण्यात आले. आज सकाळी ८.३० ...

सिंदखेडराजा तालुक्यात वीजेचा लपंडाव साखरखेर्ड्यात कळस वीज ग्राहक वैतागले समस्या निवारणार कोण?

इमेज
  सिंदखेडराजा तालुक्यात वीजेचा लपंडाव  साखरखेर्ड्यात कळस वीज ग्राहक वैतागले समस्या निवारणार कोण? दीसना✍️ सिंदखेडराजा:- तालुक्यात वीजेचा लपंडाव तसेच कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याने कळस गाठला असून, संबंधित यंत्रणा गेंड्याची कातडी ओढून चुप्पी साधून आहे. याबाबतीत कुणीही लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याने जनतेचा भ्रमनिरास होत आहे. तालुका व वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात चार केंद्रांच्या माध्यमातून १२० गावांचा कारभार हाकलल्या जातो. त्यासाठी उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंते व कंपनीचे तसेच खाजगी वायरमन असा भलामोठा लवाजमा कार्यरत आहे. यंत्रणेचा एवढा मोठा डोलारा असूनही, जनतेच्या सोयीसुविधेची काळजी केल्या जात नसून, मनमानी कारभारामुळे "बडा घर पोकळ वासा अन वारा जाई भसाभसा" ह्या उक्तीप्रमाणे सर्वकाही सुरु आहे. वीज पुरवठा करणाऱ्या सामुग्रीतील अनेक ठिकाणची सामुग्री ही जुनाटच असल्याचे दिसून येते. काही अपवाद वगळता वर्षोगणती सामुग्रीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यातुनच कागदोपत्री तर देखभाल दुरुस्ती केल्या जाऊन नुसती देयके तर काढली गेली नाहीत ना? असाही प...

गुढीपाडवा असला तरी आज आत्मचिंतन दिवस आम्ही चाललो कुठे?

इमेज
 गुढीपाडवा असला तरी आज आत्मचिंतन दिवस आम्ही चाललो कुठे? इशारा .. दीसना. ✍️ पारंपरिक दृष्ट्या आज गुढीपाडवा म्हणजे सणाचा दिन.  पण आजि आनंदाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू असं कधीच वाटलं नाही. कारण सण म्हणजे गोडधोड खाद्य पदार्थ, ही आमची परंपरा असली तरीही आज तिखट का खातात? ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही बालपणापासून शोधत होतो. त्याचं म्हणावं तसं समाधानकारक उत्तर कधीच मिळालं नाही. त्यानंतर शिक्षण घेऊन मोठे होत असतांनाच अशाच सणाच्या एके दिवशी हिंदवी स्वराज्याचे (हिंदू नव्हे) जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र व धाकले धनी संभाजी राजे यांचा मृत्यू अन गुढीपाडवा ह्याचा संदर्भ सोशल मीडियावरुन कळला. मात्र त्यावेळी पारंपरिक मानसिकतेतून हे खोटे असू शकते, असे वाटले. त्याच दरम्यान माझे लहान बंधू व वैचारिक साम्य असलेल्या काहींच्या माध्यमातून एका कार्यक्रमाला उपस्थित राहता आले. तेथे आपल्यात आणि तथाकथित समाज धुरंधरांच्या शैक्षणिक बाबीत हजारो वर्षांचा बॅकलॉग असल्याचे स्पष्ट झाले. तर त्याचवेळी अनेक बाबींचा खुलासा वक्त्यांनी केला. माझ्या पदवी नंतर मी एमपीएससीची तयारी केली होती. त्यात मुख्य परीक्षेला माझ...

हाडे, पंचाळ व अग्रवाल ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी बिनविरोध राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा येथील निवडणूक

इमेज
  हाडे, पंचाळ व अग्रवाल ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी बिनविरोध राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा येथील  निवडणूक सिंदखेडराजा:- तालुक्यातील राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा  ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज दि. २० मार्च, रविवारी रोजी बिनविरोध झालेल्या ह्या निवडणुकीत राताळी ग्रामसेवा सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मदन सखाराम हाडे  व उपाध्यक्षपदी लक्ष्मण शामराव सोभागे यांची बिनविरोध निवड झाली. याचवेळी गोरेगाव ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान सखाराम पंचाळ तर उपाध्यक्षपदी परमेश्वर शामराव खिल्लारे यांची निवड झाली. तसेच साखरखेर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ललीतकुमार जुगलकिशोर  अग्रवाल तर उपाध्यक्षपदी बेबीबाई जीवनसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील देवरे, उदय सुरडकर यांच्यासह रवींद्र शेजुळ विकास अधिकारी साखरखेर्डा, गटसचिव संजय पंचाळ व झोपे अण्णा यांनी काम पाहिले . सर्व प्रक्रिया बिनविरोध होताच नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आल...

अवैध संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

इमेज
  अवैध संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून सिंदखेडराजा:- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या साहाय्याने पत्नीने खून केल्याचा प्रकार काल दि. १५ मार्च, मंगळवारी दुपारी तालुक्यातील गोरेगाव येथे उघडकीस आला.  साखरखेर्डा पोलिसांनी ह्या प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या घटनेचे वृत्त येताच परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. ह्या प्रकरणी गोरेगाव येथील मृतकाची आई तुळसाबाई रुपलाल कव्हळे वय ६५ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मोठा मुलगा दत्तात्रय रुपलाल कव्हळे वय ४० वर्षे हा कुटुंबापासून वेगळा राहत होता. त्याला पत्नी मीरा, दोन मुले व एक मुलगी आहे. सुमारे पंचवीस दिवसांपूर्वी दत्तात्रय कव्हळे ह्याने पत्नी व तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधाची रेकॉर्डिंग पकडली होती. त्यानंतर त्याने पत्नीला तिच्या माहेरी नेऊन सोडले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी मीरा हिला तिचा भाऊ अनिल खनसरे ह्याने गोरेगाव येथे आणून सोडले होते. त्यावेळी दत्तात्रय ह्याला कुटुंबीयांनी समजावून सांगितले होते. तसेच दत्तात्रय व मीरा ह्या ...

२ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन

इमेज
  २ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात तब्बल ३६ जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांची कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. 'महाराष्ट्र पोलीस' आज २ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा ६१ वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती १६६१ साली झाल्याचे आढळते. त्यावेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून त्या भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर १६७२ साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला. भारताच्या १९३६ मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे १९४७ मध्ये, स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव...