हाडे, पंचाळ व अग्रवाल ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी बिनविरोध राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा येथील निवडणूक
हाडे, पंचाळ व अग्रवाल ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी बिनविरोध
राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा येथील निवडणूक
सिंदखेडराजा:- तालुक्यातील राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
आज दि. २० मार्च, रविवारी रोजी बिनविरोध झालेल्या ह्या निवडणुकीत राताळी ग्रामसेवा सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मदन सखाराम हाडे व उपाध्यक्षपदी लक्ष्मण शामराव सोभागे यांची बिनविरोध निवड झाली.
याचवेळी गोरेगाव ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान सखाराम पंचाळ तर उपाध्यक्षपदी परमेश्वर शामराव खिल्लारे यांची निवड झाली.
तसेच साखरखेर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ललीतकुमार जुगलकिशोर अग्रवाल तर उपाध्यक्षपदी बेबीबाई जीवनसिंग राजपूत
यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील देवरे, उदय सुरडकर यांच्यासह रवींद्र शेजुळ विकास अधिकारी साखरखेर्डा, गटसचिव संजय पंचाळ व झोपे अण्णा यांनी काम पाहिले .
सर्व प्रक्रिया बिनविरोध होताच नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते राम जाधव, सिंदखेडराजा कृऊबा समितीचे मुख्य प्रशासक सुरेश तुपकर, गजानन बंगाळे, सुधीर अप्पा बेंदाडे, कमलाकर गवई, सुनील जगताप, डी. एन. पंचाळ, अशोक इंगळे, सचिन खंडारे, दिलीप इंगळे, गणपत आबा अवचार, दिलीप बेंडमाळी, सय्यद रफीक आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नागरे यांनी तर आभारप्रदर्शन रविंद्र शेजुळ यांनी केले.
यावेळी राताळी येथील सोसायटीच्या संचालकपदी शिवदास खरात, अशोक बंगाळे, पंढरी आटोळे, भुजंग पाटील, भरत जाधव, बबन सरकटे, संगीता मारोती बंगाळे, दुर्गाबाई संतोष खरात, समाधान सोभागे, दत्तात्रय खरात, मधुकर बेलोडे तर गोरेगाव सोसायटीच्या संचालकपदी सुभाष पंचाळ, रमेश पंचाळ, रेणुका सुभाष गायकी, साहेबराव पंचाळ, समाधान पंचाळ, ज्ञानेश्वर काळे, दत्तात्रय तुपकर, भीमराव गवई, अनिता कुंडलिक गवई, जुल्फकारखां पठाण तर साखरखेर्डा ग्रामसेवा सोसायटीच्या संचालकपदी चंद्रशेखर शुक्ल, सुधीरअप्पा बेंदाडे, नितीन सावजी, श्रीराम मंडळकर, अमोल गवई, मधुकर पिंपळे, डिगांबर टाले, विवेक खरात, शेख बाबू सुलेमान, आसिकाबेगम शहेजादखां पठाण व अशोक आश्रू इंगळे यांची अविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी देविदास पंचाळ, अशोक इंगळे, सचिन खंडारे, दिलीप लखोटीया, संतोष मंडळकर, जीवनसिंग राजपूत, ओम अग्रवाल, प्रवीण पाझडे, भानुदास लव्हाळे, देवानंद खंडागळे, भगवान बंगाळे, संग्राम राजपूत, इब्राहिम शाह, शफीभाई, भगवानसिंग राजपूत, शुभम ठाकूर, रामदाससिंग राजपूत आदींसह सहकार व पंचायत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏