थंडी वाढणार वगैरे भ्रामक संदेशावर विश्वास ठेवू नका ..

थंडी वाढणार वगैरे भ्रामक संदेशावर विश्वास ठेवू नका ..


पृथ्वी व सुर्यामधील अंतर वाढल्यामुळे तापमान कमी होणार व त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बदल होणार असून थंडी वाढणार असल्याचे व त्याचे विविध प्रकारचे परिणाम होणार आहेत. अशा स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर झळकत आहेत. परंतु, असे काहीही होणार नसल्याचे नासा व इस्रो तसेच सर्व जगभरातील शास्त्रज्ञ सांगत आहेत.

अफेलिअन म्हणजे अप सुर्यस्थिती ही एक प्रक्रिया आहे. इतर सर्व ग्रहांप्रमाणे पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती तिच्या कक्षेत परिभ्रमण करते. ती कक्षा गोलाकार नसून, लंब वर्तुळाकार आहे. पृथ्वी जेंव्हा लंब वर्तुळाकार कक्षेत जास्त दूरच्या बिंदूवर पोहोचते. त्या स्थितीला अफेलिअन म्हणजेच अपसूर्यस्थिती म्हणतात. ही दरवर्षी नेमाने घडणारी घटना आहे. त्यामध्ये सूर्याची पृथ्वीवर पोहोचणारी उष्णता कमी होते. असं कधीही होत नाही.

दरवर्षी घडणारी सूर्य अपस्थितीची प्रक्रिया ४ जुलै पासून सुरु झाली आहे. ती जानेवारी पर्यंत चालणार आहे.

नासा तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार

सूर्य अपस्थिती मुळे पृथ्वीवर पोहोचणाऱ्या उष्णतेत मोठ्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचा बदल होणे शक्य नाही.

त्यामुळे अशा भ्रामक संदेशावर विश्वास ठेवू नये.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा