एसटी महामंडळात कार्यरत जखमी वाहनचालक सतीश उर्फ पिंटू खराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू



 एसटी महामंडळात कार्यरत जखमी वाहनचालक सतीश उर्फ पिंटू खराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू


सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील सतीश प्रल्हाद खराडे उर्फ पिंटू, वय ४२ ह्या एसटी महामंडळामध्ये कार्यरत वाहनचालकाचा आज दि. ३ ऑगस्ट, बुधवारी सकाळी औरंगाबाद येथील इस्पितळात मृत्यू झाला आहे.
सतीश खराडे हा युवक वाहनचालक म्हणून कोकणातील अलिबाग डेपो मध्ये कार्यरत होता. ड्युटीवर जाण्यासाठी बसची साफसफाई करीत समोरील काच पुसतांना तो खाली पडून, त्याच्या मेंदूला मार बसला होता. त्यानंतर वेगवेगळ्या इस्पितळात दाखल करीत प्रकृती गंभीर झाल्याने  शेवटी मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटल व त्यानंतर औरंगाबाद येथील नामांकित अपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान
सकाळी ५ वा. सुमारास सतीश खराडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
दुपारी १२ वा. सुमारास साखरखेर्डा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 
सतीश खराडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, आई, तीन भाऊ, खराडे परिवारासह बराच मोठा आप्त परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला