गुढीपाडवा असला तरी आज आत्मचिंतन दिवस आम्ही चाललो कुठे?
गुढीपाडवा असला तरी
आज आत्मचिंतन दिवस
आम्ही चाललो कुठे?
इशारा ..
दीसना.✍️
पारंपरिक दृष्ट्या आज गुढीपाडवा म्हणजे सणाचा दिन.
पण आजि आनंदाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू
असं कधीच वाटलं नाही.
कारण सण म्हणजे गोडधोड खाद्य पदार्थ, ही आमची परंपरा असली तरीही आज तिखट का खातात? ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही बालपणापासून शोधत होतो. त्याचं म्हणावं तसं समाधानकारक उत्तर कधीच मिळालं नाही. त्यानंतर शिक्षण घेऊन मोठे होत असतांनाच अशाच सणाच्या एके दिवशी हिंदवी स्वराज्याचे (हिंदू नव्हे) जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र व धाकले धनी संभाजी राजे यांचा मृत्यू अन गुढीपाडवा ह्याचा संदर्भ सोशल मीडियावरुन कळला. मात्र त्यावेळी पारंपरिक मानसिकतेतून हे खोटे असू शकते, असे वाटले. त्याच दरम्यान माझे लहान बंधू व वैचारिक साम्य असलेल्या काहींच्या माध्यमातून एका कार्यक्रमाला उपस्थित राहता आले. तेथे आपल्यात आणि तथाकथित समाज धुरंधरांच्या शैक्षणिक बाबीत हजारो वर्षांचा बॅकलॉग असल्याचे स्पष्ट झाले. तर त्याचवेळी अनेक बाबींचा खुलासा वक्त्यांनी केला. माझ्या पदवी नंतर मी एमपीएससीची तयारी केली होती. त्यात मुख्य परीक्षेला माझा विषय भारतीय इतिहास होता. त्यामुळे त्या वक्त्यांचे संदर्भ समजले. मात्र त्याचवेळी हे काहीही सांगतात, नव्हेतर आपल्याला बाटविण्याचा ह्यांचा उद्देश असावा, ह्या पारंपरिक मानसिकतेतून अनेकांनी ते सभागृह सोडले होते. तर भरभक्कम संदर्भांतून आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन होत असल्याचे जाणवल्याने मी मात्र बसून होतो. ऐतिहासिक संदर्भांच्या त्या सभेत संभाजी राजे यांच्या मृत्यू बद्दल मते व्यक्त केली गेली. गुढीपाडवा हा सण फक्त महाराष्ट्रातच का होतो? याचाही उहापोह झाला. त्यानंतर काहीच वर्षांनी सोशल मीडियावर संभाजी राजे यांचा मृत्यू व गुढीपाडवा सण ह्याचा मार्मिक संदर्भ घेऊन पोस्ट आल्या. त्याचा पाठपुरावा म्हणावा की काय? पण गुढीपाडवा ह्या सणाच्या दिवशी युवकांनी संभाजी राजे ह्यांच्या स्मरणार्थ भगवी पताका ठेवत, गुढी अजिबात उभारायची नाही, असा संकल्प केला व तो राबवला देखील.
गेल्यावर्षी पर्यंत सर्व ठीक होते. मात्र यावर्षी फक्त सोशल मीडियाच नव्हेतर मुख्य मीडिया सुद्धा वेगळ्याच दिशेने गेलाय. सगळीकडे गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येत असल्याचे मुद्दामहून दर्शविण्यात आले आहे. ह्या सर्व बाबीतून आपण कुठे निघालो होतो? आणि तेथे पोहचण्याआधीच कसा मार्ग बदलतो आहे? ह्या संदर्भात मनात प्रश्न निर्माण झाला आहे.
वारे बघून धान्य उफणायचे असते, विचार नाही. ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यातल्या त्यात माझ्या काही बंधूंनीही माध्यमांचे वारे बघून, आपल्या विचारांना तिलांजली देत तोच कित्ता राबविला ह्याचे शल्य मनात आहे. इथे कुणाचाही नामोल्लेख नाही. मात्र विचारांना जर तिलांजली द्याल तर याद राखा असा इशाराही आज द्यावासा वाटतो.
हा लेख आपण पूर्ण वाचला असेल तर विचार हे विचारच व ते कायम असतात, त्याच्यवेळी भावना ह्या क्षणभंगुर असतात. भावनांच्या आहारी गेलो तर आपली वाट पुन्हा गुलामीच्या दिशेने होत आहे, असेच समजावे. समझदार को इशारा काफी ..!🙏


अगदी बरोबर आहे पण बाकीच्यांना आवडायचं आणि सावरायचं कसं
उत्तर द्याहटवासर,अत्यंत चुकीचंआहे तुम्ही जे लिहल ते आपण स्वतः या या विषयावर बोलू
उत्तर द्याहटवाअभ्यास पूर्ण लेख सरजी
उत्तर द्याहटवाAgdi barbor ahe
उत्तर द्याहटवापुरोगामी नावाखाली नुसता भुरटेपणा आहे गुरुजी तुमचा. अर्धवट माहिती व परंपरा च्या आधारे काहीतरी मुढासारखे लेखन आहे हे. शुद्ध मुर्खपणा आहे.
उत्तर द्याहटवाबाकीच्यांच्या टिपण्या वाचून मलापण तेच वाटलं की बाकीच्यांना आवरायचं आणि सावरायचं कस , पण मला वाटतं त्याची गरज नाही ..... प्रत्येकाची मानसिकता वेगळी ..... कोणाचा मृत्यू अशाप्रकारे साजरा करणे चुकीचे की योग्य हे ज्याचे त्याला कळायला पाहिजे...
उत्तर द्याहटवामि आपले विचारा चे समर्थन करतो सर
उत्तर द्याहटवाI agree with you sir.
उत्तर द्याहटवा