माय मायच असते .. अनुभव कथन

 माय भेटली अन मायेचा पाझर फुटलाच ..


रात्रीपासूनच  मायचं ध्यान यायला लागलं होतं.

त्यामुळेच  मायचं मोठेपण काय असतं?

आणि

ममत्वाचा मोठेपणा काय असतो,

तो खरंच आज अनुभवला

आज सकाळी शाळेवरुन सुट्टी टाकली. अन सरळ देऊळगावराजा गाठले. त्यात अगोदर माझी मायची मैत्रीण अन माझी जगण्याची ओळख असलेली श्रीमती सुमनबाई नरसिंगराव खेडेकर ह्यांच्या घरी गेलो. आत जात असतांनाच माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी माझ्याकडे बघितले. परंतु, मी वैचारिक व राजकीय विरोधक असल्याने दुर्लक्ष केले. त्याचवेळी मी व माझा पुतण्या व आजच्या राजकीय परिक्षेत्रातील व्यक्तिमत्त्व चिंटू ह्याला आवाज दिला. अन घराच्या मागच्या दारावर  गेलो तर तिथे साक्षात सुमनबाई उभी होती. 

चिंटूला सांगितले की माझी ओळखच देऊ नकोस. ठरले, परंतु, बाईने नाव विचारले, त्यावेळी आईचे नाव सांगितले अन  सुमनबाईने अक्षरशः कोंभ्हाळले म्हणजे कुरवाळले खुशाली विचारली. माझ्या भावनेचा आवरलेला बांध कोसळला. डोळ्यात आसू आले. सुमनबाईने ते आसू पुसले. अन जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. देऊळगावराजा, सावखेड तेजन, देवखेड आदि अनेक  गोष्टींवर खूप काही चर्चा झाल्या. समाधान वाटलं. त्याचवेळी डॉ. शशिकांत खेडेकर हे सुद्धा तिथे आले. आमच्याही राजकारण विरहित प्रचंड गोष्टी झाल्या. माझा विकासदादाच ना तो. त्याच्या लग्नापासून तर आजपर्यंतच्या अनेक गोष्टींना प्रसवाचे दार भेटले. प्रचंड



व्यक्त झालो. सुमनबाईच्या भेटीनंतर आमची  दुसरी माय म्हणजे अशोक, संदीप व दोन्ही मुली, सोबतच आमची नंदा अन लिंबावर प्रचंड जीव असलेली आमची मायाळू, माय अन खुप काही साधी अन भोळी असलेली कासाबाई विठ्ठलराव जायभाये हिच्या भेटीला गेलो. तर संदीप अन कुटुंबीयांचं अगत्य आढळून आले. पण जेंव्हा वर जाऊन कासामाय भेटली. तिने कुरवाळले, त्यावेळी तर संयमाचा बांध फुटलाच. रडत रडत तिच्याशी बोलत होतो.

एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, माय मायच असते.

ह्या दुनियेत तुम्ही कितीही मोठे व्हा.

पण

शेवटी मायचा चरणस्पर्श म्हत्वाचाच ..

त्या मायेच्या भावनिक नगरीत जगणारा मी एक भाग्यवान  ..

पुढली भेट मुक्ताबाईसाठी आरक्षित आहे. तिने मायाळूपणाने कुरवाळावे एवढीच अपेक्षा ..!

मला राजकारण कळत नाही त्यामुळेच प्रचंड मागासलेला मी ..

दीसना🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा