वीज कोसळून साठेगाव येथील विवाहित शेतकरी महिला ठार पती गंभीर जखमी ..



 वीज कोसळून साठेगाव येथील विवाहित शेतकरी महिला ठार

पती गंभीर जखमी ..

सिंदखेडराजा:- आज दि. ४ ऑगस्ट, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात कडकडाट व वीजांचा कहर झाल्याने तालुक्यातील साठेगाव येथील रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० वर्षे ह्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची तर त्यांचे पती गजानन नागरे हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
साठेगाव येथील गजानन संपत नागरे, वय ५५ व त्यांच्या पत्नी रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० हे दोघे पतीपत्नी शेतात काम करीत होते.  त्यातच अचानक दुपारी आलेल्या पावसातुन स्वतःला वाचवण्यासाठी दोघांनी बोरीच्या झाडाचा आसरा घेतला. त्याचवेळी त्या झाडावर वीज कोसळली. ह्या दुर्घटनेत रुख्मिनाबाई ह्या जागीच ठार झाल्या तर गजानन नागरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच किनगावराजाचा पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाला.
मृत रुख्मिनाबाई यांच्या मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे.
वृत्त लिहिपर्यंत ह्या संदर्भात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.
मात्र ठाणेदार युवराज रबडे , श्रावण डोंगरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल