तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू



 तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू


सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील एक तरुण पोहतांना पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा करुण अंत झाला आहे.
साखरखेर्डा येथील शेख हरुन शेख गुलाब, वय ३३ वर्षे हा युवक काल दि. ५ जून, रविवारी दुपारी स्थानिक महालक्ष्मी तलावात पोहायला गेला होता. पोहण्या दरम्यान पाण्यात तो बुडाला होता. ही माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार जितेंद्र अडोळे, बीट जमादार रामदास वैराळ, लक्ष्मण इनामे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पट्टीच्या पोहणारांनी शर्थीचे प्रयत्न करुनही काल सायंकाळी उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. आज दि. ६ जून, सोमवारी अगदी सकाळीच त्याचा मृतदेह पाण्याच्या वर आला. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार करुन शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे. पोहतांना दम छाटल्यामुळे मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे.
ह्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून, पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा